” माझ्या वऱ्हाडी कवितेचे समीक्षण “

व-हाड बोली📚 समीक्षन 📚
लेखमाला क्र. 59
=✒====✒=====✒====✒=
कविता :- “लय झाली अमिरी”
कवी :- संजय रोंघे, नागपुर
👇
लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।

न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।

बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।

नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।

शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मनते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।

पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।

सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।

मुन मनतो गडया …..

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा
——–@——-
आजकाल अमिरी दिखाव्याची फ्याॅशन चालु हाय. एकानं घर एक मजली बंधलं, त दुसरा दोन मजली बांधते. एकानं पाच लाखाची गाळी घेलती का दुसरा त्याच्या गाळीपेक्षा चंगली दाहा लाखाची गाळी घेते. असी अमीरं लोकात चळाओळ चालु हाय. काई काई लोकं त् पाण्या सारखा पैसा वाया घातात. आपली अमीरी दाखवासाठी लाखा लाखाचे कुत्रे माजरे घीवुन पोसतात. समाजात किती ईशमता हाय. यका ईकडे लोकं पैस्यासाठी तरसतात, त् यकाईकडे पैसा कागदं मनुन खर्च केल्या जाते. या अमीरीच्या समुद्रात डुबेल लोकाईले नागपुरचे कवी संजय रोंघे यायनं ‘लय झाली अमीरी’ या कवितेच्या बायन्यानं आवाहान केलं. कि यक दिवस गरीबी काय असते. हे समजुन घ्याले. तुमचं अमिरीचं जगनं सोळुन जरासेक गरीबाच्या घरी यीवुन पाहा…
लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
कवी मनतात कि पैसा अदला बक्कम असलेले लोकंहो. तुमी पैस्यानं सबन सुखाचे साधनं ईकत घीवु शक्ता. मनुन तुमाले दु:खाची जानीव नाई. गरीबी काय असते. हे मालुम नाई. तुमचं ते अमीरीचं जगनं सोळुन जरा एखांद्याच्या घरी जावुन पा. त्याच्या घरी यखांदा रोज रावुन पा. मंग तुमाले गरीबीची किंमत समजन. कविचं हे मनन सोळ आने खरं हाय. कावुन कि अनुभव घेतल्या शिवाय मानसाले समजत नाई. खरी परीस्थीती दिसत नाई.
न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।
गरीबाच्या घरी गेल्यावर खरी परीस्थीती मानसाले दिसते. तवाच समजन कि आपुन नरमं नरमं गादीच्या सोप्यावर बसतो. पन गरीबाच्या घरी बसाले पिळे बी नाईत. त्याईच्या घरी रातची झोपाले खाट बी नसते. मनात ईचुकाट्याचं भेव घीवुन खाले मातीवरचं झोपालागते. असी दरीद्री परीस्थीती असल्यावर त्या गरीबाले नवीन कपळेलत्ते बी कुठन भेटन हा सवाल कवीच्या मनात हाय.
या दरीद्री पाई गरीबाचे काय हाल होतात याचं एक चित्र कविनं डोयापुढे मंडलं. ते मंजे आपल्या मथा-या आईचं. वय झाल्याच्यानं ते बिमार पडते. पन तिले दवाखान्यात निवुन ईलाज कराची सोय गरीबाची नसते. कारन दिवसभर मोल मजुरी करुन आनलेले पैसे. चटनी मीठात खर्च होऊन जातात. मंग दवाखाना कुठुन करावं. हा सवाल मनाले सतावत रायते.
पुळे कवि मनतात….
नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।
अमीर लोकं पैस्या पाई चैयनी जीवन जगतात. आपल्या लेकराले तीन-चार हजाराचा यक यक डरेस घेतात. कवीनं गरीबाच्या घरची घरची बाजु आमीर लोकाईच्या कसी ईपरीत हाय. हे दाखुन देलं. कि पैस्या पाई गरीबाले आपल्या लेकराले दुसरे कपळे घेनं होत नाई. थेचं थे थीगय लावुन फाटके कपळे घाल लागतात. अर्ध्या आंगानं ऊघळं राहावं लागते. अन् कई कई मजुरी लागत नाई. काम पायासाठी दारोदार फिरावं लागते. असी परीस्थुती हि गरीबाच्या घरी असते.
पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।
घरात काम करनारे लोकं कमी अन् खानारे लोकं जास्त असतात. त्यानं मजुरीचा पैसा सांजीले बी पुरत नाई. मनुन गरीबाले शिल्लक खर्च कराले पैसा नसते. त् मंग शिक्षनावर कुठुन खर्च करीलं.. त्याच्याच्यानं शिक्षन बी गरीबाच्या झोपळी पासुन कोसो दुर रायते. दोन टिकल्या मजुरीनं घर चालत नाई. लेकराचं शिक्षन होत नाई. त्याईले कपळे लत्ते घोनं होत नाई. लेकराले ऊघळं राहावं लागते. घरात मथारी माय असुन तिचा दवाखाना कराले पैसा नाई. या ईचारानं गरीबाले जगनं मुस्कील होते. अन् रोज मरमर काम करुन या परीस्थीतीच्या ईचारानं संध्याकाई झोप बी लागत नाई. सपनात नुस्त मरनचं दिसते. असं काईजं चिरनारं गंभीर चित्र गरीबाच्या घरात असते. ते आपुन त्याच्या घरी गेल्या शिवाय. त्याची परीस्थीती आपल्य डोयानं दिसनार नाई. हे बी तीतकचं खरं हाय.
कविनं समारोपीय कळव्यात सांगतलं कि त्या गरीबाले परीस्थीती पाई जर मरनं आलं. त् त्याच्या मरनाच्या सरणाले लाकडं ईकत आनाची बी आयपत नसते. समाजात यकाईकळे जो मानुस अमीर हाय. तो अमीरचं होत चालला. अन् जो गरीब वर्ग हाय. तो गरीबच रावुन रायला. कवीनं यकदम पद्धतशिर आपल्या लिखानात हा गंभीर ईशय मांडला. गरीबीची रस्त्यावर टांगलेली लक्तरं अमीराले दिसत नाईत. मनुन प्रत्यक्ष गरीबाच्या घरी जावुन ते परीस्थीती अनुभवाचां आग्रह कवीनं केला.
कवीनं कवीतेसाठी निवळलेला ईशय यकदम गंभीर हाय. तो त्याईनं तसा मांडाचा प्रयत्न केला. पन थोळोशीक ताकद कमी पडली. पयल्या कडव्यात कवीनं सांगतलं का गरीब हा यक गडी हाय. गडी मंजे यखांद्या आमीराच्या घरी मयन्यानं नाई त् सालानं काम करनारा. अन् चौथ्या कडव्यात सांगतलं कि तो दारोदारी कामासाठी फिरते. अथी असं वाटते का तो गडी नसुन मजुरी करनारा यक गरीब व्यक्ती हाय. हे दिसुन येते. याच कडव्यात त्याईनं मटलं कि परीस्थीतीनं ऊघळे पागळे लेकरं लय भारी लळतात. आपुन भारी हा शब्द तथी वापरतो जथी यखांद काम लय चांगलं नाईत् जबरदस्त झालं असनं. पन अथी हा शब्द जरासाक ईसंगत वाटते. शिवाय एकदोन जागी प्रमान बोलीतले शब्द आलेले दिसतेत. कवीनं अजुन जराशी मेयनत घेतली त् त्यायची लेखनी बहरु शक्ते. त्यासाठी त्याईले व-हाडी लिखानात सातत्या राखनं जरुरी हाय. ईशय निवडाची जब्बंर नजर कवी जौळ हाय. त्याचा फायदा अस्या परीस्थीच्या कविता लेयाले त्याईले नक्कीच फायदा होईनं.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*समीक्षक*
*प्रा महादेव पाटिल लुले*
तिवसा/बार्शीटाकळी
9923085311
devlule@gmail.com
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🙏डबल भेटु,एका नविन कवितेसंग🙏
।।बोलु व-हाडी,लिहु व-हाडी,जगु व-हाडी।।

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.