दिलने जब तुम्हे
याद किया ।
तब तब हमने
तुमको पाया ।
दिलमे है रक्खा
बस एक साया ।
हो वह तुम या
तुम्हारी छाया ।
कौन अपना
कौन पराया ।
तुमही तुम हो
मेरी काया ।
Sanjay R.
बघुन तुझे हास्य वाटतं
मीही खुप हसा्वं ।
लटका राग बघुन तुझा
मीही थोडं रुसावं ।
सुंदर किती नयन तुझे
त्यातच सारखं बघावं ।
गालावरची खळी तुझ्या
हलकेच त्यासी जपावं ।
ओठ तुझे मधुघट जसे
मध ओठांनीच टिपावं ।
शब्द तुझे लाघवी किती
सतत तुलाच ऐकावं ।
सुडोल कसा बांधा तुझा
घेउन मिठीत तुज छळावं ।
श्वास तुझा माझे जिवन
श्वासां मधेच जगावं ।
Sanjay R.
मैत्रीची हो ही
दुनीयाच न्यारी ।
एकाहुन एक इथे
आहेत लय भारी ।
सुख: दुखाचे
सारेच साथी ।
उरेल कशाची
हो मग भीती ।
तरीही खंत
होतीच मनात ।
दुर गेले सारे
नाही उरले गावात ।
सगळेच लागले
आपल्या कामी ।
वाटे विसरलेत तर
नाही ना मित्रभुमी ।
आता मात्र किती
हो झाले बरे ।
उघडा मोबाईल
दिसतात सारे ।
मिटला दुरावा
जवळीक झाली ।
हास्य परतले
दिसतय गाली ।
Sanjay R.
“” असा कसा मी हा असा “”, read it on Pratilipi :
Read unlimited stories, poems, articles in Indian languages for FREE!
” माझा शेती प्रपंच ”
बाबा तुम्ही गेलात आणी मग
आली शेती माझ्या हाती ।
फिरुन फिरुन बघीतली सारी
काळी भोर तीची माती ।
तोलुन मापुन बोलुन सारी
आपलीशी केली सगळी नाती ।
डोंगर वाढला कामाचा
कळले मज वळायच्या वाती ।
नागरण वखरण पेरणी डवरण
सगळी कामं पावसाच्या घाती ।
शोधायचे आकाशात ढग काळे
आणी मोजायचे झाडावर बोंडपाती ।
मजुरांचा प्रश्न किती आहे भारी
धाप लागते जिवाला भरुन येते छाती ।
डोक्यावर असतो काळजीचा डोंगर
सांगा कशी येयील हो झोप राती ।
पावसाचे असते वेगळेच नाटक
नको तेव्हा पडुन धरतो छाती ।
बी बियाणे औषध खते
पै पै लागतो हिशोब तरी कीती ।
बाजारात मालाला मिळत नाही भाव
फळफळतात नुसत्या व्यपार्यांच्या जाती ।
हाती आलेल्या पिकाची हो
बघावी लागते माती ।
नका मोजु तुम्ही राजेहो
फाटक्या शर्टाला ठिगळं कीती ।
Sanjay R.