” भावना अंतरीची “

अजाण या माझ्या मना
जाण भावना अंतरीची ।

एकच विचार मनी परततो
नाही उसंत का क्षणाची ।

सदा पुढ्यात तुझीच छवी
ही ओढ तुझ्या आठवांची ।

क्षण नी क्षण मंतरलेला
उणीव तुझ्या अस्तीत्वाची ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” मनातली कळी “

बघुन फोटोत का तुजला
सुचतात मज चार ओळी ।

चेहर्यावरील बघुन आनंद
खुलते मनातली कळी ।

शांत चीत्त मनोहारी रुप
गालावरची खुलते खळी ।

शोधते नजर जेव्हा तुजला
मनात उठते भावना वेगळी ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

‘ मनातले द्वंद “

रिकाम्या डोक्याचा
एकच छंद ।
कवितेत होतो
मी बेधुंद ।
मनी उडतात
अनेक गंध ।
झुगारुन देतो
सारे बंध ।
लिखाणात उतरते
मनातले द्वंद ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” दोस्ती “

काय असते दोस्ती
करायची फक्त मस्ती
जेही करायचं ते जास्ती
मग आफत येते नस्ती
डोक्यात शिरते धास्ती
शमल्यावर वादळ येते सुस्ती ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” एक सुंदर स्वर “

मनात तुझ्या मज
करायच घर ।
आनंदाची त्याला
द्यायची भर ।
कधी ह्रुदयाच्या आत
तर कधी मनाच्या वर ।
सा असो वा ग म प
एक सुदर स्वर ।
Sanjay R.

जब तु मुझसे
दुर चली जाये
तेरी याद मुझे
दिन रात सताये ।

दिल ढुंढता तुझे
और कही
दुर जाती हवाये
मनही मन मेरी
आखे फीर रोये ।

तेरी अदाये
तनहा साये
तु मुझमे पर
दिल कहा है ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” वाहु दे पाणी संथ “

भरु दे नभांनी
सारा आसमंत ।
निळ्या काळ्या ढगांना
देउ नको उसंत ।

पड रे पावसा
नको पाहुस अंत ।
फुटु दे पालवी
पाणी वाहु दे संथ ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” योग सुयोग “

चला करु या रोज योग
ठेउनीया दुर होउ निरोग ।
ज्यासी म्हणतो आपण भोग
होतील ते सारे सुयोग ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” वड पुजा “

बांधला आज सुताने
वडाच्या झाडाचा घेरा
मागते ती देवा तुजपाशी
दे साता जन्माचा फेरा ।
राहीले खुप मनातच त्यासी
पुढच्या जन्माचा आसरा ।
धरुन हात आलो इथवर
घडु दे प्रवास अनंताचा ईश्वरा ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” पावसाची गडगड “

पावसाचही काही
खरं नाही ।
नको तिथे पडेल ।
हवा तीथे नडेल ।
खुप गडगडेल
आणी
दुर जाउन उडेल ।
बाहेर जायचं असेल ना
नेमकी वेळ तीच धरेल ।
प्लानींगचा तुमच्या
सत्यानाश करेल ।
वाट पाहणार्याला
खुप तडपवेल ।
नको म्हणणार्यास
पुरात बुडवेल ।
आम्ही आहोत हताश
आणी व्हायचे निराश ।
आहेच काय हातात
रडतो सावकाश ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” मन उदास “

मनास
नका करु दास ।
करील ते उदास ।
फक्त एक श्वास ।
जिवनाचा प्रवास ।
फुलांचा सुवास ।
कधी मनात भास ।
कधी दिवस खास ।
कुणावर विश्वास ।
मनी देवाचा ध्यास ।
कधी गळ्यात फास ।
नको सहवास
अंताचा आभास ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

मनास
नका करु दास ।
करील ते उदास ।
फक्त एक श्वास ।
जिवनाचा प्रवास ।
फुलांचा सुवास ।
कधी मनात भास ।
कधी दिवस खास ।
कुणावर विश्वास ।
मनी देवाचा ध्यास ।
कधी गळ्यात फास ।
नको सहवास
अंताचा आभास ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” पाणी “

पाणी पाणी कीती ते गुणी
मोजमाप त्याचे केले कुणी 
माणुस नेहमीच राहील रुणी ।
नाहीच आला पाउस तर
पृथ्वी सारी होइल सुणी ।
म्हणुनच नाव पाण्याचे
आहे ठेवले जिवणी ।
आहे ते कीती गुणी ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” साथ “

कभी उनकी
याद कर लेते ।
कभी उनकी
बात कर लेते ।
तमन्ना दिलमे
और है लेकीन ।
कह दो दिलसे
साथ कर लेते ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” पडु दे पाउस “

तुझ्या माझ्या मनाची
किती सारखी हाउस ।
अरे आकाशातल्या ढगा
आता पडु दे पाउस ।
सुर्यानं केला दुरावा
आता दुर नको राहुस ।
पहील्या सरींचा आनंद
तु नको दुर जाउस ।
ये ना  हळुच वार्यासंगे
आता नको रे अंत पाहुस ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” प्रेम “

शब्दात प्रेम
प्रेमाचे बोल ।
मनाचे द्वार
हृदयाचा रोल ।
विचारांची माळ
सुगंधी फुल ।
मनाची आतुरता
आनंदाची झुल ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” बरसात “

कभी उनके साथ ।
कभी हातोमे हात ।
कभी करते इंतजार
दो बुंद की बरसात ।
तरस जाती आखे
ना होती मुलाकात ।
छुट जाती जब यादे
दिलही दिलमे दिलकी बात ।

Sanjay R.

रंगानं लाल पांढरा
काय त्यांचा नखरा ।
जसा केसात माळला
गुलाब आणी मोगरा ।
सुगंध करतो बेधुंद
फिरवतो तोची नजरा ।
कधी सजे हार तुरा
कधी हातात गजरा ।
Sanjay R.

image

” चार ओळी “

डोळ्यात काजळ
ओठांना लाली ।
गुलाबी हास्य
खुललय गाली ।

Sanjay R.

आला आला पाउस
चल जाउ भिजायला ।
सरीं मधे न्हाउ
आनंदानं नाचायला
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

#sixwordstory

सहा शब्दांची ओळ
त्याला अलंकारांची खोळ ।

मोडक्या संसाराची एक कहाणी
रोजचीच रडगाणी ।

कीती करणार चुका
घेउ दे मुका  ।

रोज करायचं शिवण
यालाच म्हणतात जिवन ।

काय असणार नवीन
प्रेमात मीच प्रवीण ।

Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” गजरा “

ल्याली बघ तु
सुंदर गजरा ।
सुगंधानं फुलला
डोइवर मोगरा ।
चेहरा तुझा गं
गोड हासरा ।
डोळ्यात दिसतो
भाव लाजरा ।
Sanjay R.

image

Posted from WordPress for Android

” लागली मनात रुख रुख “

लागली मनात
रुख रुख ।
दुःखात शोधतो
सुख ।
अंतरात लागली
भुक ।
वेड्या मनाची
काय चुक ।
चमचमतो तारा
लुक लुक ।
थोडी आशा
अंधुक ।
अंतरात शब्द
झाले मुक ।
जगतो मी
विन्मुख ।
Sanjay R.

image