माझी कविता प्रकाशित

आज दिनांक 30.12.2018 ला माझी कविता ” माझ्या मनातली कविता ” तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणीत प्रकाशित झाली .
संपादकांचे खूप खूप आभार .

” जिंदगी क्या हैं तू “

देखी जब तस्वीर उनकी ।
न जाने दिलको क्या हुवा ।
खो गये तस्वीरमे और लगा
जिंदगी है आग और हम धुवा ।

हर कदम हर वक्त बस
जलते रहे हम ।
ना आखो मे असू
ना दिल मे गम ।
फिरभी लागता
जिंदगीमे कुछ तो है कम ।

रास्ता लंबा कितना
चालते राहना है अब ।
सुख दुःख तो साथी है
पर कोई न होगा तब ।
Sanjay R.

” इयर एन्ड “

सरले हे वर्ष आता
मनात बरेच उरले ।
झाले किती पूर्ण आता
निश्चय जे जे धरले ।
जिकण्याचे स्वप्न होते
परी तेचि हरले ।
वर्षाचे दिवस किती
मोजून पूर्ण भरले ।
अजूनही मन हे रिते
ठाव कुणास किती उरले ।
जगायचे आनंदात अजून
निश्चय मनाशीच ठरले ।
Sanjay R.

” नका विचारू वय “

प्रश्न एक भारी
ग वय काय पोरी ।
म्हणू नका काकू
उत्तर मिळेल सॉरी ।
मी नाही काकू
यंगच मी नारी ।
झाले थोडी जाड पण
वळून बघतात सारी ।
बघ जरा तिकडे
दुसरी कोणी म्हातारी ।
मी तर आहे अजूनही
इंद्राघरची परी ।
परत नको करुस
असली चौकशी सारी ।
वय कुणी सांगतं का
फालतूचिंच हुशारी ।
Sanjay R.

” चार ओळींचे दार “

” ” चार ओळी ” ”

” दार ”

न्हाई भीती न्हाई छत
सताड उघडं दार ।
आनंदी सारे झोपळीत माह्या
ह्याच जीवनाचा सार ।
Sanjay R.

” अतूट बंध ”

तुझ्या आणि माझ्यातला
एक अतूट बंध ।

जसा अंगणात फुलला मोगरा
आणि दरवळतो सुगंध ।

चल वेचू या दोघेही यातून
मैत्रीचा आनंद ।
Sanjay R.

———– ——————

” नातं ”

तुझं माझं नात
गीत मंजुळ गात ।
स्वर अंतरातले त्यात
आहेत ते सात ।
Sanjay R.

——————————

” प्यार मेरा ”

तू क्या जाने प्यार मेरा
याद करता हु चेहरा तेरा
खो जाता हु यादोमे तेरे
लागती तुम हो हर सितारा
गालोमेही सही हसदो थोडी
झूम उठेगा आसमान सारा ।
Sanjay R.

———————————–

” सरली रात ”

सरली रात
उजिडल आता
पडलं झाकटं ।
उठ ना बाबू
शिवाचं हाये
पूरच घर फाटकं ।
Sanjay R.

——————————–

” गुलाब ”

गुलाबाचा रंगच किती न्यारा
वाटते साऱ्यायलेच प्यारा ।
संग काट्यायच्या रायते तरी
देते कोमय मनाचा इशारा ।
Sanjay R.

————- ———————

” माझ्या मनातले आभाळ “

” माझ्या मनातले आभाळ ”

मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
कधी होई रिते सारे
नसे विचार मनात ।

कधी नजर गगनात
दाटे अंधार अंतरात ।
होई घालमेल मनाची
थेंब पाण्याचा डोळ्यात ।

कधी वाटे घेउन भरारी
जावे दूर आकाशात ।
तोडून चंद्र आणि तारे
पेरावे अंगणात ।

बाग फुलेल चांदण्यांची
चंद्र हसेल नभात ।
निरखावे रूप त्याचे
बसावे गीत आनंदाचे गात ।

मन आभाळ आभाळ
येई भरून क्षणात ।
नाही होणार रिते सारे
ठेवले आहे एका कणात ।
Sanjay Ronghe
Nagpur

” वृद्धावस्था “

काय आलेत दिवस
झाली कशी अवस्था ।
मुलं मुली गेलेत दूर
डोळे पाहताहेत रस्ता ।

हात पाय थकलेत आता
थरथरते अंग, वाटते भीती ।
म्हातारे झालेत डोळे
आसवही गळणार किती ।

कान अधू डोळे अधू
नाही कुणाची साथ ।
विसरू नको देवा मला
तुझाच रे मदतीला हात ।

आठवणींचा डोंगर उलटतो
होते विचारातच पहाट ।
नकोच वाटतो सूर्योदय
शोधतो अंधारातच वाट ।
Sanjay R.

mhatarpan

” वा रे कांदा “

किती रडवी हा कांदा
कित्येकांचा झाला वांदा
कुणी घालतो गळ्यात फंदा
घासही खाली उतरत नाही
फोडणीला हवा एकच कांदा
नसेल तो तर होतो वांदा
Sanjay R.

” निमंत्रण “

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ , कविकट्टा काव्य मंचावर माझी वर्हाडी कविता “माह्या वऱ्हाडाची माती ” ही कविता सादर करण्या साठी निमंत्रण प्राप्त झाले
आयोजकांचे खूप खूप आभार

” शब्द अंतरातले “

शब्दा विन कुठली वाचा
अंतरात त्याचा ढाचा ।

जोडी मानाचे बंध
देई शब्दच आनंद ।

फुलवी मुखावरी हास्य
देई नेत्रात अश्रू ,भाष्य ।

कधी वाटे कर्णास गोड
कधी तुटे नात्याची जोड ।

शब्द शब्दातले अंतर
प्रवाह शब्दांचा निरंतर ।

मुखातून ध्वनित शब्द होती
कागदावरी ते अवतारती ।

गुणगान शब्दांचे गावे
अंतरात तेचि विसावे ।

सारेच आहे आपुल्या हाती
घात शब्दच करून जाती ।

फुलवू चला शब्दांची बाग
सापडेल आनंदाचा माग ।
Sanjay R.

index 111

” प्रश्न “

परीक्षेचे दोन भाग
प्रश्न आणि उत्तर ।

का ! एक प्रश्न
म्हणून एक उत्तर ।

प्रश्नाला परत प्रश्न
नसतेच मग उत्तर ।

आयुष्य पडे अपुरे
प्रश्न सतराशे बहात्तर ।

विचारांचा खेळ सारा
नसे कुठलेच उत्तर ।

जीवन होई प्रश्न
जगतोय हेच उत्तर ।
Sanjay R.

i111

” याद “

तू क्या जाने
प्यार मेरा ।

याद करता हु
चेहरा तेरा ।

खो जाता हु
यादोमे तेरे ।

लागती तुम हो
गगन का तारा ।

गालोमे ही सही
मुस्कुराओ थोडी ।

झूम उठेगा
आसमान सारा ।
Sanjay R.

” ओम शांती “

होते किती
डोक्याले ताप ।
तोंडातून निघते
शिव्या शाप ।
ह्रीदयाले लागते
मोठी धाप ।
नकाच मारू
फालतू थाप ।
दवडू नका
अंतरीची वाफ ।
भानगळच नको
करा शांतीचा जाप ।
Sanjay R.

” माझ्या मनातली कविता “

” माझ्या मनातली कविता ”

मन माझे निराकार
कधी घेइ ते आकार ।

बांधी सुमनांचे हार
फुलती पुष्प हजार ।

कधी वाटे सारा अंधार
अंतरी मग होई प्रहार ।

मनाला मनाचा होकार
कधी मनच देई नकार ।

आनंदाची होता बहार
अंतरात उडती तुषार ।

दु:खाचा होता आजार
मग ह्रुदय होई तार तार ।

लेखणी भरता हुंकार
संगे शब्दांचा आधार ।

घेई जन्म ओळी चार
त्यात जिवनाचा सार ।

असंख्य झेलुनही वार
जशी गीत गाते सतार ।

लेउन सुख दु:खाची विजार
पेलतो मी आयुष्याचा भार ।

Sanjay Ronghe
Nagpur

” राम कृष्ण हरी “

मानसाचं जीवन
लयच भारी ।
खटपट केली का
होते काय तरी ।
बसून रायल्यानं
काय भेटन घरी ।
मेहनत कराले
फिरा दारोदारी ।
देव बी भेटते
केली का वारी ।
करा खटपट
राम कृष्ण हरी ।
Sanjay R.

” पोट्टे इचित्तर “

गावचे आमच्या
पोट्टे भाय इचित्तर ।
पोऱ्यायच्या नावानं
लिहे थे पत्तर ।
थातूर मातूर कागद भरून
लावे त्याले अत्तर ।
तिकीट नसे लिफाप्याले
दंड पडे बत्तर ।
पोट्टे आमच्या गावचे भौ
लायच इचित्तर ।
Sanjay R.

” नदी “

आमच्या गावले
होती एक नदी ।

तपते लयच ना
उन्हाया मधी ।

होत न्हाई पाऊस
पावसायात कधी ।

पार आटून गेली
रायली न्हाई सुदी ।

वाटन बी नाई तुमले
होती नदी कधी ।

लय हाल उन्हायाचे
पानी दिसते डोयामदी ।
Sanjay R.