सूर्य चंद्र आणि तारे

सूर्य चंद्र आणि तारे
करा कितीही इशारे ।
आपल्याच ते तालात
आम्ही आपले बिचारे ।

विना रेषांचे हे हात
बदलतील कसे सितारे ।
बांधून मुठी मी ठेवतो
पण जाते निघून सारे ।

असतो बघत मी वाट
ठेऊन उघडी दारे ।
इकडून तिकडे होतात
नशिबात वादळी वारे ।

भाग्याचा अस्त इथेच
उदयाला असती पहारे ।
विझल्या ज्योती मनात
शांत अंतरात निखारे ।
Sanjay R.

कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या जानेवारी 2024 च्या मासिक अंकात माझी कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

खरा आनंद

पाहता तुला मी
नकळे मला काही ।
शोधतो तुला मी
उरले कुठे काही ।

हरपले भान आता
धुंद मनात काही ।
कळेना काय ते
मनात काही काही ।

वाटते स्वप्न ते
डोळ्यात झोप नाही ।
अंधार वाटतो बरा
अंतरात बरेच काही ।
Sanjay R.

परत तीच गर्दी

कर्तव्य पळताना
गेली भिजून वर्दी ।
नियम कोण पाळतो
बेफाम असते गर्दी ।

रिकामेच कोणी तिथे
कोणी कशाचे दर्दी ।
घामाने ओला होतो
मग येतो घेऊन सर्दी ।

असते काय उशालारिचवतो पोटात अर्धी ।
होतो तयार सकाळी
परत तीच तिथे गर्दी ।
Sanjay R.

रिचवतो पोटात अर्धी ।
होतो तयार सकाळी
परत तीच तिथे गर्दी ।
Sanjay R.