याद


देखकर तस्वीर तुम्हारी
दिल मेरा बहक जाता है ।
सारा दिन फिर यादोमे
वक्त युही चला जाता है ।
झलक भी कही दिखे तुम्हारी
दिलको सुकुन मिल जाता है
Sanjay R.

” डर “


लेकर क्या आये थे हम
जो लुटनेका डर सताता है ।
लुट जाने दो सारा जहां
अभी दुनिया बहोत बाकी है ।
Sanjay R.

तारे तुटे तुटे


है दिलके अरमान
कुछ छोटे छोटे ।
है दुनिया हसीन
क्यु हो तुम रुठे रुठे ।
सपने भी होते है सच
लगतेतो तारेभी तुटे तुटे ।
Sanjay R.

मनात मन


प्रेम असतं
मना मनात ।
तुझ्यात आणी
माझ्यात ।
वेचायचे भाव
बघुन डोळ्यात ।
हळुच घ्यायचा
हातात हात ।
तारे मोजायचे
काळ्या नभात ।
बेभान व्हायचं
रातराणीच्या गंधात ।
न्हाउन निघायचं
बेधुंद श्वासात ।
Sanjay R.

दिवस एक एक


मलाही वाटतं
बघत तुला राहावं ।
डोळे न मिटता
खुप खुप जगावं ।

नेहमीच चिर तरुण
वय असच थांबावं ।
नकोच म्हातारपण
सारं जग हसावं ।

आनंदी जिवनात
सार्यांना सोबत घ्यावं ।
येयील यम तेव्हा
हाकलुन त्याला लावावं ।

आकाशी जितके तारे
सार्यांना मोजावं ।
दिवस एक एक
सह आयुष्य घालवावं ।

असेल देव कुठेतरी
दुःख त्याला द्यावं ।
जिवनभर अमृत
एक एक घुट प्यावं ।
Sanjay R.

अनजानी रात

ढलता सुरज
अनजानी रात ।
कह दो कुछ
दिलकी बात ।
काला अंधेरा
न रहा उजाला ।
चमकते सितारे
बेचैन है चांद ।
Sanjay R.

परछाइ


दिल हमारा कहता यही
चलो चले दुर कही ।
बस तुम और हम
न हो और कोइ ।
खो जायेंगे प्यारमे
मेरी तुम परछाइ ।
Sanjay R.

” रणरणतं उन्ह “


तळतळता सुर्य आणी
रणरणतं किती ते उन्ह ।
चटचट झोंबतात किरणं
निघतो माणुस भाजुन ।

शोधतो झाडाची सावली
वाटतं घ्यावं थोडं बसुन ।
पाणी पाणी जिव होतो
मन गेलं किती त्रासुन ।

बाहेर आगीच्या ज्वाळा
नकोच वाटतो उन्हाळा ।
घामासह रक्तही आटतं
येउ दे लवकर पावसाळा ।
Sanjay R.

” हास्य “


डोळ्यात बघुन तुझ्या
चढते मजला नशा ।
चित होतो दिमाग
शोधतो तुज दस दिशा ।

मन होतं प्रसन्न
बघुन तुझं हास्य ।
बघत तुझ्या डोळ्यात
करायचं मज भाष्य ।
Sanjay R.

” ग्रिष्माची अदा “


ग्रिष्माची काय ती
अनोखी अदा ।
पहाट असते
रम्य सदा ।
होताच दुपार
न भागे क्षुधा ।
सायंकाळ होताच
आईस क्रीम शोधा ।
रातराणीच्या गंधात
चंद्रावर चांदणी फिदा ।
Sanjay R.

” सुर संगीतके “


हो तुम कितनी
दुर फिर भी
लगता मुझे
हो पास मेरे ।
करता हु जब
याद तुम्हे
झिलमिलाते है
चांद सितारे ।
ओठोसे फिर
गुनगुन करते
ख्वाबो के ही
गीत प्यारे ।
तु मुझमे
मै तुझमे
संगीत के वो
सुर सारे ।
Sanjay R.

” कहानी अधुरी “

तुम तो हो मरे
व्खाबो की परी ।
कैसे सोचु मै बता
अपने दिलकी दुरी ।
तुम ही कर दो अब
मेरी चाहत पुरी ।
रह न जाये प्यारकी
कहानी यह अधुरी ।
Sanjay R.

” नको दुरावा “


समोर घेतलेले
तुझे काळे केस ।
आणी गोड हसरा
तुझा सुंदर फेस ।

वाटतं मला
तुलाच बघतच रहावं ।
आणी तुझ्यासह
मीही खुप हसावं ।

रुसणं तुझं
मलाही बघायचं ।
थोडं रागावणं
मलाही अनुभवायचं ।

मनातलं माझ्या
कळणार कसं तुला ।
बोल अंतरातले
सांगणार कसे तुला ।

नको घलुस बंधन
वाहु दे प्रेमाचा झरा ।
तझ्या माझ्या ओठांना
भेटु दे जरा ।

तुझ्या माझ्या प्रेमात
नको आता दुरावा ।
जगतो तुझ्या आठवणीत
यालाही का हवा पुरावा ।
Sanjay R.

” मण भर ओझं “


जिवन म्हटलं की
तणाव हा आलाच ।
आनंदाच्या सोबत
दुर त्याला साराच ।

मण भर ओझे
करी डोक्याला भार ।
नौका जिवनाची
होयील कशी पार ।

आहे सुरेख जिवन
भरलय त्यात सुख: ।
चविला थोडं हवंच ना
क्षणभराचं दुखः ।
Sanjay R.