” सुंदर नटली धरा “

“पावसाचा थेंब”

पावसाचा प्रत्येक थेंब
मला अश्रुच भासतो ।
का कुणास ठाउक पण
गडगडाट आभाळात होता
माझा मी मलाच हासतो ।
sanjay R.

“आम्ही”

सौदर्याची किनार
या प्रुथ्वीतलाला ।
आनंदाची धार
प्रत्येक जिवाला ।
दुखाःचा डोंगर
आमच्या जिवाला ।
सुखाची झुळुकही
नको आमच्या मनाला ।
बुद्धीवान आम्ही
विचारांचे धनी ।
जगतो आम्ही
करुन आठवणी ।
sanjay R.

“काहुर”

मनात विचारांचे काहुर
ह्रुदयात आठवणींचा पुर ।
शोधतो मी येक सुर
अजुन चालायचे किती दुर ।
sanjay R.

“वनवास”

चवदा वर्ष ।
रामाच्या वनवासाचे ।
येक वर्ष आता
अज्ञात वासाचे ।
येणार कधी
दिवस सुखा समाधानाचे ।
का येतील दिवस
रामायणा नंतर महाभारताचे।
sanjay R.

“धरा”

सरी पावसाच्या जरा
सुंदर नटली धरा
sanjay R.

” नसेल दात तर “

“नसेल दात तर”

सक्काळी दात घासा
तरच मिळतो चहा ।
नसेल दात तर
आराम कीती पहा ।

नको पेष्ट नको ब्रश
डेँटीश्टला पण स्वाहा ।
कोलगेट पण लुटतो
दुरच त्यांच्या रहा ।

हसतांना दिसणार नाही
मारामारीत पडणार नाही
कोणीच दाखवणार नाही
भोबड्यांचे बोल पहा ।
sanjay R.

“ईथे आम्ही आनंदी फार”

मुंबईच्या जिवनाच्या
आठवणी गोड फार ।
तरीही नागपुर आमचे
ईथे आम्ही आनंदी फार ।
sanjay R.

“जिवन मुंबईचे”

पावसाचा मार
लोकल विरार
ट्रँकवर पाणी
रेल्वेची माघार
उपाशी तापाशी
वेळ जातो फार
जिवन मुंबईचे
हाच येक सार
sanjay R.

“पावसाच्या सरी”

पावसाच्या सरी
ओघळ गाला वरी
सुंदर स्वप्न परी
अवतरली धरतीवरी
शालु हिरवा भरजरी
दरवळ दाटे चहुओरी
मनी उमंग सुखकरी
sanjay R.

“हिंदी है हम”

कहो गर्व से अब
हिंदी है हम ।
ना कोइ हमे गम
मा तेरे सपुत हम ।
जियेंगे तेरे लिये
जब तक है दम ।
sanjay R.

” दिल मे तुम्हारे हम रहते है “

“पाणावले डोळे”

गहीवरले मन माझे
पाणावले डोळे ।
सांगु कुणा आता
येती विचार खुळे ।
sanjay R.

“ना कोई है शिकवा”

आसुओसे हमेभी
ना कोई है शिकवा ।
चेहरेपे आपके आये
येक मुस्कुराहट…….
दिलमे यही है अरमां ।
देख हसी ओठोपे
पालेंगे हम हर जहां ।
sanjay R.

“दिल मे तुम्हारे हम रहते है”

सदा हसती रहो तुम
याद तुम्हे हम करते है ।
आसुओसे दुरही रहना
दिल मे तुम्हारे हम रहते है ।
sanjay R.

“वड सावीत्री”

करुनी वटपुजा
सावीत्रीने आणले
परत प्राण पतीचे ।

नमन करु त्या व्रुक्षांना
देई जिवन आम्हास
त्या वनचरांना ।

लाउनी येक व्रुक्ष
घेउ शपथ आज
जगवु या जिवना ।
sanjay R.

“झाड सोबती तुझे”

उन वारा पाउस
दुर नको ठेउस
झाड सोबती तुझे
नको त्यास
दुर सारुस
sanjay R.

“चक्र हे जिवनाचे”

चक्र आहे हे जिवनाचे
जुने जाणार नवे येणार ।
झालेल्या जखमांवर
हळुच फुंकर घालणार ।
मनही मग आठवणींना
ठेउन येका कोपऱयात
नव्या जोमान जगणार ।
sanjay R.

गहीवरले मन माझे
पाणावले डोळे ।
सांगु कुणा आता
येती विचार खुळे ।
sanjay R.

” देउन टाक येक श्वास “

“देउन टाक येक श्वास”

मनातली तुझी आस
देइ मजला आभास ।
क्षणो क्षणी आठवतो
करतो तुझाच ध्यास ।
कीती रोखु सांग तु
देउन टाक येक श्वास ।
sanjay R.

“पाउस”

यंदा पाउस
खुप सुखावतोय ।
बळीराजा ही
गालात हसतोय ।
नदी नाले
दुथडी भरुन वाहताहेत ।
धरती ही
हिरवा शालु लेउन मिरवतेय ।
sanjay R.

” आई बाप “

आई बाप आपल संपुर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी लावतात ।
त्यांची खुशी, शिक्षण हव नको ते सार सार अगदी खुशीन करतात ।
आणी जेव्हा त्यांना त्यांच्या म्हातारपणी मुलांची गरज भासते तेव्हा
मात्र मुल पाठ फिरवतात । आणी व्रुद्धाश्रमात पाठवुन मोकळे होतात ।
कींवा घरात खुप दुःख देतात । नोकरांपेक्षाही वाइट वागणुक देतात ।
का आम्ही आमची कर्तव्य विसरलोत की आमचे संस्कार संस्क़्रुती
विक्रुत होत आहेत ।

हे कुठेतरी थांबायला हवं ।

आम्हीच आमचा विचार करायला हवा ।

sanjay R.

“येक शब्द पुरे मला”

“नको मला”

स्वच्छ सुंदर
व्रुत्तीचा मी ।
मज आमीषांचा
प्रभाव नको ।
साधे सरळ
जिवन माझे ।
विपरीत असा
स्वभाव नको ।
भोग भोगतो
आनंदाने ।
मला कशाची
हाव नको ।
आहे जसा
बरा मी ।
मला कशाचा
ठाव नको ।
sanjay R.

“येक शब्द पुरे मला”

नको इतके प्रयास
शब्दांची ही रास ।
येक शब्द पुरे मला
घेण्या जिवनाचा श्वास ।
sanjay R.

“सामान्यांचे बघा मरण”

राज कारण
त्यांचे असे
खीसा भरण ।
नको कुणा
कार्य करण ।
पेटवतात ते
रोज सरण ।
सामान्यांचे
बघा मरण ।
sanjay R.

” मजा पावसाची “

“मजा पावसाची”

खरच खुप मजा यायची
तेव्हा पावसाची ।
आता तर तसा पाउसही
पडत नाही ।
सारखा पाच सहा दिवस
पडायचा ।
सुर्याचे दर्शन मुश्कील
व्हायचे ।
पाण्यात भिजायचे ।
कागदाची नाव बनवुन
वाहत्या पान्यात सोडायचे ।
सोबत सोबत पळायचे ।
आणी घरी आल्यावर
पावसात भिजलो म्हणुन
आईचे धपाटे खायचे ।
मग तीच्याचकडुन अंग पुसुन
घ्यायचे नी कपडे बदलायचे ।
धपाट्या सोबत प्रेमही
मिळायचे ।
किती छान होत ना लहानपण।
sanjay R.

“लहान पण दे गा देवा”

आता कस म्हणायच
लहान पण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा
शाळेत आम्हाला ठेवा
ढीग अभ्यासाचा हवा
नको ते खेळणे बुवा
sanjay R.

“सत्कार करा त्यांचा”

क्रिकेटच्या खेळात
सट्टेबाजांची चाल ।
मालक आणी खेळाडु
होताहेत मालामाल ।
लुटारुं झाले राजे
आम्ही मात्र बेहाल ।
सत्कार करा त्यांचा
देउन श्रीफळ आणी शाल ।
sanjay R.

” ओझ दप्तराच सांभाळायच “

“ओझ दप्तराच सांभाळायच”

हसायच खेळायच
वय त्या बालकांच ।
ओझ दप्तराच सांभाळत
शाळेत त्यांना जायच ।
बालपण विसरुन
अभ्यासात मन लावायच ।
आयुष्याच्या सुरवातीलाच
हास्य दुर सारायच ।
संपुर्ण आयुष्य मग
चिंता अणी दुखाःत काढायच ।
शिक्षाप्रणालीच अशी आमची
कोणास काय घेण त्याच ।
sanjay R.

“शक्य आहे का”

तुझ हे काय
विचारण झालं
काय कीती कसे
शक्य आहे का ।

स्वप्नावीना रात्र
सुर्यावीना दिवस
शक्य आहे का ।

विचारांवीणा मन
तुजवीणा जिवन
शक्य आहे का ।
sanjay R.

“तो चंद्रच”

स्वप्नाच्या दुनीयेत
तु आणी मी दोघच
चांदणीच्या संगतीला
येक तो चंद्रच
sanjay R.

ya ya ya…
shining shining
no timing……,..
every time……
smiling smiling
sanjay R.

” आली आनंदाला भरती “

“गंध रात राणीचा”

गंध रात राणीचा
धुंद मज करुन गेला
सोबतीचा क्षण तुझ्या
बंध माझे घेउन गेला
आस मनी तुझीच आता
आठवण येक ठेउन गेला
येउन सावर मजला आता
जिव माझा तुझाच झाला
sanjay R.

“ह्रुदयातल्या जखमा”

बदलल्यात सवयी
वगळल्यात आठवणी
ह्रुदयातल्या जखमा
बघीतल्या का तुनी
sanjay R.

“आहे तुच ग माझी सगुणा”

माझ्या अबोल्यात
दिसत असेल अलीप्तपणा
मनातुन मात्र असतो
त्यत येक आपलेपणा ।
तु मी का वेगळे आहोत ।
विचार तु तुझ्या मणा ।
आहे तुच ग माझी सगुणा ।
sanjay R.

“जिवन व्यर्थ प्रेमावीणा”

खर आहे
प्रम आहे येक भावना ।
धागा जोडी मना मना ।
द्रुढ करीतसे आपलेपणा ।
देइ दीशा जग जिवना ।
मात्रुप्रेमान का सोडलय कुणा ।
मनात जपायच्या खाणाखुणा ।
जिवन व्यर्थ प्रेमावीणा ।
sanjay R.

“आली आनंदाला भरती”

कीती अधीर झाली होती
पावसा तुझ्यासाठी धरती ।
रखरखत्या उन्हात माझा
जीव झाला वरती खालती ।
येउन तु कीती भिजवलेस
आली आनंदाला भरती ।
sanjay R.

” सलतो मनात काटा “

“सलतो मनात येक काटा”

शब्दांना जुळवता जुळवता
साकारते येक सवीता ।
लेखणीने सवारताच
पुढे येते येक कवीता ।

सजुन धजुन येते तेव्हा
फुलतात हास्याच्या वाटा ।
ह्रदयात डोकावले तर
सलतो मनात येक काटा ।
sanjay R.

“स्वप्नांच्या बाजारात”

उभा आहे मी
स्वप्नांच्या बाजारात
इथ खरेदीदारही मी
आणी विक्रेताही मीच

स्वप्नांना रचणारही मी
आणी भोगणारही मीच
स्वप्न माझी असल्यान
कुणास अभिनय द्यायचा
ते ठरवणारही मीच

निशा आशा आकांक्षा
करतात मला सोबत
चित्रा सपना कल्पना
स्वप्न गोड रंगवतात

मनही माझ विचीत्र
वाट्टेल तस भटकत
अतीच झाल तर
धक्का देउन उठवत
sanjay R.

“प्रेम आंधळ असत”

पण प्रेम आंधळ असत ।
दुसर काही दिसतच नसत ।
मन नकळतच हसत ।
तर कधी अकारणच रडतं ।
का हे अस घडत ।
मनालाच ठाउक नसत ।
म्हणुनच ते जिव्हाळा लावणार
प्रेम असत ।
sanjay R.

“वेदनेला जपायचे”

हळुवार पणाने
वेदनेला जपायचे
संग वेदनेच्या
खुप खुप जगायचे
sanjay R.

“कान्हा तेरी मुरली”

कान्हा तेरी मुरलीने
मेरा दिल चुरा लिया
अब धुंडु मै कहा
तुने कहा छीपा दीया
sanjay R.

” अंग थोडे भिजवा “

“अंग थोडे भिजवा”

काऴया नभा संगे
जिव झाला हळवा
हळुच ओथंबला
पावसाचा शिरवा
अंग अंग फुलवतो
हवेतला गारवा
मन होइल आल्हादीत
अंग थोडे भिजवा
sanjay R.

“छोटी बिटीया”

बिटीया हमारी
सुंदर प्यारी ।
सारे जगकी
राज दुलारी ।
करे पापाकी
घुड सवारी ।
मम्मी को दे
खुशीया सारी ।
छोटी बिटीया
तु है न्यारी ।
sanjay R.

“बर्थडे मेरा”

रखा पापा ने बर्थडे मेरा
मम्मी का हु मै सितारा
दादा दादी का भी प्यारा
झुमेगा शामको आसमा सारा
sanjay R.

” अश्रुंना मात्र महापुर आला “

“अश्रुंना मात्र महापुर आला”

का म्हातारपण
इतक वाइट असतं
दिवसभर पप्पा पप्पा करत
अवती भवती वावरणारा
छोटा चिंटु मोठ्ठा झाला
आँफीसातला रुबाब
घरातही घेउन आला
पप्पा मात्र त्याचा
खचुन खंगुन येकाकी झाला
पोराच्या प्रेमाला
पोरका झाला
व्रुद्धाश्रमात जाउन
थोडा मोकळा झाला
अश्रुंना मात्र महापुर आला ।
sanjay R.

“मैत्री झाली की”

मैत्री झाली की
आठवण येणारच ।
त्याला उत्तर देण
का इतक
कठीण असत ।
फारच जर
कठीण असत
तर मैत्रीच रोप
कुणी लावलच नसत
sanjay R.

“शहरात माणुसही क्रुर आहे”

गाव जरी दुर आहे
आठवणीत तो सुर आहे ।
तिथ मनशांती भरपुर आहे
शहरात माणुसही क्रुर आहे ।
sanjay R.

“भरारी”

गाता गाता जिवनगाणे
जिवनालाच तुझे विसरणे
उंच भरारी घेण्यासाठी
पाखराचे ते पंख पसरणे
मलाही वाटत कराव काही

“बाप लेकाच ते प्रेम”

तोतडे बोलणारा
दोन वर्षाचा चिंटु
आपल्या पप्पाला
तु मी करतो

पप्पाही मग
चिंटु येवढा
दोन वर्षाचा होउन
तोतडा बोलतो ।

बाप लेकाच ते प्रेम
कीती छान वाटतं
का चिंटु मोठा झाल्यावर
हे सगळ आटतं ।

sanjay R.

“प्रेम”

प्रेम घ्यायचे का
द्यायचे असते
ओढ मनाची
जाणायची असते

“गीत खुशी का गा पाउ”

यादो मे तेरी
मै खो जाउ ।
सपनो के शहरमे
कही दुर ले जाउ ।
हसी का येक तोफा
मै तुझे दे पाउ ।
संगना तेरे मै
उम्रभर के लिये जि पाउ ।
याद मे तेरी
गीत खुशी का गा पाउ ।
sanjay R.

” भाव हळुच टिपावे “

“भाव हळुच टिपावे”

मला नेहमीच असे वाटते
हळुच तुझ्या जवळ यावे
डोऴयातले भाव हळुच टिपावे
चुंबन तुझ्या ओठांचे घ्यावे
अम्रुतकुंभातले अम्रुत प्यावे
केसांतुन तुझ्या बोटांना न्यावे
छातीशी तुला घट्ट धरावे
श्वास नी श्वास येक करावे
मधु मिलनात रंगुन जावे
बेचैन मनाला त्रुप्त करावे
थेंबा थेंबातुन जिवन फुलवावे
sanjay R.

“चित्त चोर”

मनाला माझ्या
लागला घोर ।
जिवात नाही
उरला जोर ।
न्याहाळत असतो
चंद्राची कोर ।
स्वप्न परी तु
माझी चित्त चोर ।
sanjay R.

“सबकुछ पालो”

रहते समयके
साथ चलो ।
गित खुशीका
गाते चलो ।
अब तो अपना
दील खोलो ।
खोने के पहले
सबकुछ पालो ।
sanjay R.

“दीये आसु हमे”

मांगी थी हसी हमने
रबने दी खुशी हमे
दुर थे गम हमसे
आपने दीये आसु हमे
sanjay R.

“सोचता क्यु है”

रखो समझ को
दुर येकबार
खो जाओगे यादोमे
दिल होगा बेकरार
हे मुसाफीर
सोचता क्यु है
क्या कितना है बाकी
देख डुबके जरा
सासो मे दम
जितना है बाकी
sanjay R.

ये इश्क नहीं आसान
फुरसत नहीं तो
मत करो अरमान
अकेले चलते रहो
ले जायेगा आंधी तूफान
sanjay R.