भिजली धर्ती
आली किरणं
फुटली पालवी
आल्हादीत
माझ जगणं
sanjay R.
मनी उठले वादळ
अडकलो त्यात मी
घेउनी हात हाती
दुर ते सारील मी
sanjay R.
का आशी मला
ओढ तुझ्या सोबतीची
का हिच असावी आस
मनी फुललेल्या प्रेमाची
sanjay R.
व्याकुळ मन माझे
चिंब पावसात भिजायचे
घेउन तुला सोबतीला
अंकुर मनाचे रुजवायचे
sanjay R.
प्रेम सुखाचा सागर
पौर्णीमेचा जागर
भरलेली घागर
तरीही
अत्रुप्त मनाचा नागर
sanjay R.
तान मनाचा
का वयोमानाचा
दिवस येक येक
कमी होतोय
क्षण सुखाचा
का आनंदाचा
जगण्याची इच्छा
वाढवतोय
sanjay R.
खुप कंटाळल की
काय हो करायचं ।
नाचायच का गायचं
वाट्टेल ते करायचं ।
मणभर राबायचं
आणी क्षणात मरायचं ।
आनंदात राहायच
आणी खुप जगायचं ।
sanjay R.