चिंता सांग तुझी कुणाला
लहान तू रे असताना
चिंता आई बापाला ।
विवाहित होताच तू
काळजी तुझी पत्नीला
धागा आयुष्याचा बांधलेला ।
होतोस तू बाप जेव्हा
असते काळजी लेकरांना
तुही त्यांच्याशी जुळलेला ।
समाजाशी तुझे देणे घेणे
आठवतो तू ज्यांना ज्यांना
असते तुझी काळजी त्यांना ।
नाती गोती ही जवळची
करतात तेही काळजी तुझी
विचार थोडे तू मनाला ।
घे थोडी काळजी तुही
जीव लाव तू जीवाला
लाभेल अर्थ या जीवनाला ।
Sanjay R.
