रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्याच्या दृष्टीने सरकारद्वारे वाहतुकीचे कठोर नियम अमलात येणार, हे ऐकून खूप छान वाटले. सरकारने घेतलेले हे पाऊल खरच आवश्यक व प्रशंसनीय आहे.
आता सरकारने ज्या रस्त्यावरून ही वाहने धावतात त्या रस्त्या संबंधातिल देखरेख आणि त्यांची व्यवस्था याला निगडित नियम ही स्थापित करून, रस्त्यातील गड्डे झाड, खांब, गतिरोधक व इतर अनेक कारणांच्या गैर वयवस्थे मूळे होणाऱ्या अपघाता मुळे होणाऱ्या अपघाता समबंधात सरकार वर काय कारवाई आणि दंड कसा राहील, या संबंधात नियमावली प्रकाशित करावीसरकारचे खरच खूप खूप अभिनंदन 💐
Sanjay Ronghe
Monthly Archives: July 2019
” तन वाहाडल वावरात “
पाऊस पडून रायला
करतं का वो भजे ।
झकास करतं व तू
कापतो कांदे मायमाजे ।
झडच लावली पावसानं
होईन का आता सरदी ।
डॉकतर खुश किती पाय
दवाखान्या मंदी लैच गरदी ।
तन वाहाडल वावरात
मजूर न्हाई भेटत कोनी ।
आपल्यालेच करा लागन
संग घेजो पोरं दोनी ।
जाऊ दे न आता शाईच
चार दिस जाईन त्यायचे ।
चार पोते पिकन जास्ती त
पैसे देऊ मंग शिकवनी चे ।
जास्ती इचार तू करू नको
हात जरासा आवर लवकर ।
देवानं देल जास्ती काई त
पोटात जाईन भाकर चोतकर ।
Sanjay R.
” मिळाल्या मज शुभेच्छा वाढदिवसाच्या “
दिवस आजचा बघा
किती किती आनंदाचा ।
नभातून बरसणाऱ्या
संततधार पावसाचा ।
गीत मधुर पावसाचे
उत्साहाने गाण्याचा ।
वाढदिवस आजच
साजरा करण्याचा ।
रिमझिम रिमझिम
किती बरसतोय पाऊस ।
वाढदिवसाची ही
मी पूर्ण करतोय हौस ।
शुभेच्छांचा झाला वर्षाव
मित्र माझे खासम खास ।
ऋणी मी या सर्वांचा,
मलाही त्यांचाच ध्यास ।
Sanjay R.
” म मराठी चा “
बघा म मराठी चा
शब्द किती सुंदर हा ।
लिहितो बोलतो वाचतो
शब्द संग्रह मायबोलीचा हा ।
आई जनक या बोलीची
वर्णावी काय महिमा तिची
बाप भाऊ बहीण सारे
रुजवती नाती जन्माची ।
मित्र मैत्रिण शब्द जीवाचे
ऋणानुबंध आयुष्याचे ।
सुंदर निर्मळ आनंद
सोबती सारे या जन्माचे ।
मराठीची गाथा अफाट
भावार्थ शब्दांचा विशाल ।
ग चा गा होतो जेव्हा
होते थोडी मग धमाल ।
मी मराठी अभिमान माझा
ज्ञानियांचा ज्ञानेश्वर ।
सामावला संसार इथेच सारा
म्हणता ई चा ईश्वर ।
शब्दांची नाही उणीव काही
बरळतो कुणी काही काही ।
मराठीचे तर वैभव मोठे
डंका तिचा दिशा दाही ।
Sanjay R.
” रिमझिम रिमझिम बरस रे आता “
व्यापल आभाळ ढगांनी
सुरुवात केली पावसानी ।
रिमझिम रिमझिम बरसतो आता
पाणी वाहतेय नाल्यांनी ।
हिरवी हिरवी झाडं हसली
हलताहेत कशी झोक्यानी ।
आलास आता बरे झाले
अडवलं तुला कुणी धोक्यानी ।
पड आता तू रे खूप पड
भरू दे नदी तुझ्या पाण्यानी ।
आली होती आसवं डोळ्यात किती
तुझ्या या हट्टी वागण्यानी ।
पड रे आता हवा तितकाच
आनंद फुलू दे तुझ्या येण्यानी ।
Sanjay R.
” यश अपयश “
” यश अपयश ”
मेहनतीचे फळ
देईल जीवनात यश ।
आळस नेईल दूर
मिळेल अपयश ।
क्षण आनंदाचे
यशाचा पाया ।
अपयश दाखवी
दुःखाची काया ।
यश अपयश दोन
नाण्याच्या बाजू ।
नका बघू वळून
जायचे पुढे अजून ।
Sanjay R.
” पाऊस आला “
आला आला
पाऊस आला ।
परिसर सगळा
ओला झाला ।
रान हिरवे आणि
वारा थंड झाला ।
जाऊ या आता
शेतात कामाला ।
Sanjay R.
” कविता “
” चित्र कविता “
” श्रद्धा की अंधश्रद्धा “
कोण मी कसा
माणूस हा असा ।
बघा थोडे
सोबत माझ्या हसा ।
होईल सुखी मी
घ्या सुखाचा वसा ।
आहे ही श्रद्धा ।।
कोण मी कसा
नाही माणूस असा ।
लुबाडतो तुम्हांसी
जाळ्यात थोडे फसा ।
सोडूनि विवेक बुद्धी
घ्या दुःखाचा वसा ।
आहे ही अंधश्रद्धा ।।
Sanjay R.
” यादे “
लिखना तुम एक लब्ज
अपनी कलमसे….
शायद वह दिल ही होगा
हमारे अंदाज से….
सोचते है बस दिलमे
बैठते जब सुकून से….
खो जाते है युही यादोमे
पुछ्ते हाल यादो से….
Sanjay R.
” कोण मी देव “
माझा मीच देव
थोडा विश्वास ठेव।
विश्वास नसेल त्यास
काय कुणाचे भेव ।
अनाचार अत्याचार
मनात त्याच्या चेव ।
मिटून डोळे थोडे
आठव तुझा देव ।
माणुसकी तुझ्यात रे
आहे तूच महादेव ।
Sanjay R.
” प्रेम जीवनाचा आधार “
” प्रेम ”
जीवन प्रेमाचा सागर
भरायची अपुली घागर ।
द्या थोडे, घ्या थोडे
या करू प्रेमाचा जागर ।
बाप आई भाऊ बहीण
नात्यात या प्रेम अपार ।
परक्याशी लावता थोडे
मिळेलही प्रेम जिवापार ।
माणसं तुम्ही जोडा चार
प्रेम जीवनाचा आधार ।
Sanjay R.
” भरली धडकी मनात “
भीतीचे ढग पसरलेत आकाशात
विचारांनीच भरली धडकी मनात ।
तेच ते विचार मला कसे घाबरवतात
मग लागत नाही लक्ष माझे कशात ।
संपेल पावसाळा पाणी नाही घरात
अमेरिका पोचला आता इराणच्या दारात ।
युद्धाचे सावट दिसत आहे जगात
प्रत्येकच माणूस आता दिसतोय रागात ।
मोह माया मत्सर संचारला अंगात
दहशतवाद पसरला, आला खूप रंगात ।
साधा सरळ माणूस भरडतोय यांच्यात
दुर्धर झालं जगणं, उरलं काय जीवनात ।
Sanjay R.
” माझ्या वऱ्हाडी कवितेचे समीक्षण “
व-हाड बोली📚 समीक्षन 📚
लेखमाला क्र. 59
=✒====✒=====✒====✒=
कविता :- “लय झाली अमिरी”
कवी :- संजय रोंघे, नागपुर
👇
लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।
बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।
नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।
शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मनते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।
पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।
सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।
मुन मनतो गडया …..
लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा
——–@——-
आजकाल अमिरी दिखाव्याची फ्याॅशन चालु हाय. एकानं घर एक मजली बंधलं, त दुसरा दोन मजली बांधते. एकानं पाच लाखाची गाळी घेलती का दुसरा त्याच्या गाळीपेक्षा चंगली दाहा लाखाची गाळी घेते. असी अमीरं लोकात चळाओळ चालु हाय. काई काई लोकं त् पाण्या सारखा पैसा वाया घातात. आपली अमीरी दाखवासाठी लाखा लाखाचे कुत्रे माजरे घीवुन पोसतात. समाजात किती ईशमता हाय. यका ईकडे लोकं पैस्यासाठी तरसतात, त् यकाईकडे पैसा कागदं मनुन खर्च केल्या जाते. या अमीरीच्या समुद्रात डुबेल लोकाईले नागपुरचे कवी संजय रोंघे यायनं ‘लय झाली अमीरी’ या कवितेच्या बायन्यानं आवाहान केलं. कि यक दिवस गरीबी काय असते. हे समजुन घ्याले. तुमचं अमिरीचं जगनं सोळुन जरासेक गरीबाच्या घरी यीवुन पाहा…
लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
कवी मनतात कि पैसा अदला बक्कम असलेले लोकंहो. तुमी पैस्यानं सबन सुखाचे साधनं ईकत घीवु शक्ता. मनुन तुमाले दु:खाची जानीव नाई. गरीबी काय असते. हे मालुम नाई. तुमचं ते अमीरीचं जगनं सोळुन जरा एखांद्याच्या घरी जावुन पा. त्याच्या घरी यखांदा रोज रावुन पा. मंग तुमाले गरीबीची किंमत समजन. कविचं हे मनन सोळ आने खरं हाय. कावुन कि अनुभव घेतल्या शिवाय मानसाले समजत नाई. खरी परीस्थीती दिसत नाई.
न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।
गरीबाच्या घरी गेल्यावर खरी परीस्थीती मानसाले दिसते. तवाच समजन कि आपुन नरमं नरमं गादीच्या सोप्यावर बसतो. पन गरीबाच्या घरी बसाले पिळे बी नाईत. त्याईच्या घरी रातची झोपाले खाट बी नसते. मनात ईचुकाट्याचं भेव घीवुन खाले मातीवरचं झोपालागते. असी दरीद्री परीस्थीती असल्यावर त्या गरीबाले नवीन कपळेलत्ते बी कुठन भेटन हा सवाल कवीच्या मनात हाय.
या दरीद्री पाई गरीबाचे काय हाल होतात याचं एक चित्र कविनं डोयापुढे मंडलं. ते मंजे आपल्या मथा-या आईचं. वय झाल्याच्यानं ते बिमार पडते. पन तिले दवाखान्यात निवुन ईलाज कराची सोय गरीबाची नसते. कारन दिवसभर मोल मजुरी करुन आनलेले पैसे. चटनी मीठात खर्च होऊन जातात. मंग दवाखाना कुठुन करावं. हा सवाल मनाले सतावत रायते.
पुळे कवि मनतात….
नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।
अमीर लोकं पैस्या पाई चैयनी जीवन जगतात. आपल्या लेकराले तीन-चार हजाराचा यक यक डरेस घेतात. कवीनं गरीबाच्या घरची घरची बाजु आमीर लोकाईच्या कसी ईपरीत हाय. हे दाखुन देलं. कि पैस्या पाई गरीबाले आपल्या लेकराले दुसरे कपळे घेनं होत नाई. थेचं थे थीगय लावुन फाटके कपळे घाल लागतात. अर्ध्या आंगानं ऊघळं राहावं लागते. अन् कई कई मजुरी लागत नाई. काम पायासाठी दारोदार फिरावं लागते. असी परीस्थुती हि गरीबाच्या घरी असते.
पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।
घरात काम करनारे लोकं कमी अन् खानारे लोकं जास्त असतात. त्यानं मजुरीचा पैसा सांजीले बी पुरत नाई. मनुन गरीबाले शिल्लक खर्च कराले पैसा नसते. त् मंग शिक्षनावर कुठुन खर्च करीलं.. त्याच्याच्यानं शिक्षन बी गरीबाच्या झोपळी पासुन कोसो दुर रायते. दोन टिकल्या मजुरीनं घर चालत नाई. लेकराचं शिक्षन होत नाई. त्याईले कपळे लत्ते घोनं होत नाई. लेकराले ऊघळं राहावं लागते. घरात मथारी माय असुन तिचा दवाखाना कराले पैसा नाई. या ईचारानं गरीबाले जगनं मुस्कील होते. अन् रोज मरमर काम करुन या परीस्थीतीच्या ईचारानं संध्याकाई झोप बी लागत नाई. सपनात नुस्त मरनचं दिसते. असं काईजं चिरनारं गंभीर चित्र गरीबाच्या घरात असते. ते आपुन त्याच्या घरी गेल्या शिवाय. त्याची परीस्थीती आपल्य डोयानं दिसनार नाई. हे बी तीतकचं खरं हाय.
कविनं समारोपीय कळव्यात सांगतलं कि त्या गरीबाले परीस्थीती पाई जर मरनं आलं. त् त्याच्या मरनाच्या सरणाले लाकडं ईकत आनाची बी आयपत नसते. समाजात यकाईकळे जो मानुस अमीर हाय. तो अमीरचं होत चालला. अन् जो गरीब वर्ग हाय. तो गरीबच रावुन रायला. कवीनं यकदम पद्धतशिर आपल्या लिखानात हा गंभीर ईशय मांडला. गरीबीची रस्त्यावर टांगलेली लक्तरं अमीराले दिसत नाईत. मनुन प्रत्यक्ष गरीबाच्या घरी जावुन ते परीस्थीती अनुभवाचां आग्रह कवीनं केला.
कवीनं कवीतेसाठी निवळलेला ईशय यकदम गंभीर हाय. तो त्याईनं तसा मांडाचा प्रयत्न केला. पन थोळोशीक ताकद कमी पडली. पयल्या कडव्यात कवीनं सांगतलं का गरीब हा यक गडी हाय. गडी मंजे यखांद्या आमीराच्या घरी मयन्यानं नाई त् सालानं काम करनारा. अन् चौथ्या कडव्यात सांगतलं कि तो दारोदारी कामासाठी फिरते. अथी असं वाटते का तो गडी नसुन मजुरी करनारा यक गरीब व्यक्ती हाय. हे दिसुन येते. याच कडव्यात त्याईनं मटलं कि परीस्थीतीनं ऊघळे पागळे लेकरं लय भारी लळतात. आपुन भारी हा शब्द तथी वापरतो जथी यखांद काम लय चांगलं नाईत् जबरदस्त झालं असनं. पन अथी हा शब्द जरासाक ईसंगत वाटते. शिवाय एकदोन जागी प्रमान बोलीतले शब्द आलेले दिसतेत. कवीनं अजुन जराशी मेयनत घेतली त् त्यायची लेखनी बहरु शक्ते. त्यासाठी त्याईले व-हाडी लिखानात सातत्या राखनं जरुरी हाय. ईशय निवडाची जब्बंर नजर कवी जौळ हाय. त्याचा फायदा अस्या परीस्थीच्या कविता लेयाले त्याईले नक्कीच फायदा होईनं.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*समीक्षक*
*प्रा महादेव पाटिल लुले*
तिवसा/बार्शीटाकळी
9923085311
devlule@gmail.com
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🙏डबल भेटु,एका नविन कवितेसंग🙏
।।बोलु व-हाडी,लिहु व-हाडी,जगु व-हाडी।।
” बाप पाठीवर द्यायचा थाप “
वाटायचा मला बाप
का डोक्याला ताप ।
ओरडायचा जेव्हा तो
लागायची श्वासाला धाप ।
ओरडणे त्याचे भल्यासाठी
वाटायचं रोजचाच हा जाप ।
कधी प्रेमाची कधी रागाची
पाठीवर द्यायचा थाप ।
आज कळतंय मनाला
होतो काळजाचा मी काप ।
आयुष्यभर उपसले कष्ट
नव्हता कुठलाच आलाप ।
विसरू नका धावपळ त्याची
घडवलं त्यांनी तुम्हा निष्पाप ।
म्हातारपण सांभाळा त्याचे
दूर लोटून घेऊ नका शाप ।
Sanjay R.
” क्या पुछे हाल उनका “
हाल उनका क्या पुछे
जो दिलमे रहते है ।
जब याद आती है तो
दिलसे ही पुछ लेते है ।
कभी दूर उनसे ना होते
खुदही महसुस कर लेते है ।
पराये तो दूर बहोत होते
अपने तो अपनेही होते है ।
जो ना हो कभी अपना
उसे याद क्या करना है ।
अपना तो सपनाभी हो अगर
साथ उसीके जिना मरना है ।
Sanjay R.
” कष्टाचे काय दाम “
नाही क्षणाचा आराम
पोटासाठी चाले काम ।
कष्टाचे सांगा किती दाम
गाळायचा रक्ताचा घाम ।
परी कुणास त्याचे नाम
थांबेल श्वास , काम तमाम ।
खाली धरा वरती आकाश
स्वप्नात बघतो चार धाम ।
Sanjay R.
” कुणास ठाऊक “
असाच किती वेळ जाइल
कुणास ठाऊक ।
बसेल मी निरखत फोटोत तुला
मलाच ठाऊक ।
स्वप्न तूच माझे ,अप्सराही तूच
तुलाही ठाऊक ।
दूर नको जाऊस, प्रेम तू माझे
हृदयास ठाऊक ।
Sanjay R.
” साहित्य चोर “
चोरो की फौज यहा भारी
किताबे तक छपवा लेते सारी ।।
अब तो जित जाता है चोर
दुनिया बस इसिसे है हारी ।।
प्रतिभा तो है लिखाने वालोकी
सम्मान चोरका यही दुनियादारी ।।
Sanjay R.