” गळी सजवीतो माळा ”

“गोट्यातही देव भासे”

संस्कार आमचे असे
गोट्यातही देव भासे ।।
गळी सजवीतो माळा
घेउन लुटारुंचे फासे ।।
sanjay R.

“रिटारमेंट”

वयाची जाणीव
करुन देणारा
प्रथम क्षण रिटारमेंट ।
सुरुवात होते
इथुन थोड
अडखळत चालण्याची ।
जमेल तीतक
पण कमीत कमी
हलक खाण्याची ।
आजारी पडल तर
अंथरुणात येकट
पडुन राहण्याची ।
जाणीव पुर्वक
दुर्लक्ष करणाऱया
नजरा न्याहाळायची ।
देवा पांडुरंगा
घेउन चल रे बाबा
म्हणुन आळवणी कराण्याची ।
sanjay R.

जिवन सार्थक”

कुणा पोट भरायची चिंता ।
कुणा ते कमी करायची ।।
चिँतेवीणा जिवन निरर्थक ।
सोबत हास्य जिवन सार्थक ।।
sanjay R.

” प्रवास अंताचा “

“प्रवास अंताचा”

सत्य जिवनाचे
अंत देहाचा ।
सोबत नाही कुणाची
प्रवास अंताचा ।
मी मी माझेपण
कोण इथे कुणाचा ।
सुटती सारे बंध गंध
बुडबुडा क्षणाचा ।
sanjay R.

“जोडी जन्मो जन्मीची”

सख्या सोबत मला तुझी
जोडी जन्मो जन्मीची ।
तुजवीण जगायचे म्हणजे
होते थरथर मनाची ।
sanjay R.

” सुर्यही गालात हसतो “

“मन असे खुळे”

अगणीत विचारांची गाठोडी
आणी त्यात मन असे खुळे ।
शब्द सरसाउन पुढ़यात येता
क्षणात मन मनाशी जुळे ।
sanjay R.

“सुर्यही गालात हसतो”

आज तर सुर ताल
छान लागलेला दिसतो ।
ढगांच्या आडुन
सुर्यही गालात हसतो ।
पावसाचा मुड मात्र
काही वेगळाच दिसतो ।
सोबतीला छत्री असुनही
चिंब चिँब मज
भिजवायच दिसतं ।
sanjay R.

“काही उरतच नाही”

देवा अजब
तुझी माया
जे व्हायच ते
घडतच नाही ।
कदाचीत खरही
असेल तुझं ।
पापाचा घडा
भरतच नाही ।
मुकाट्यान
सोसण्या शीवाय
काही उरतच नाही ।
sanjay R.

” जय हरी विठ्ठल “

“जय हरी विठ्ठल”

देव राया
सावऴया विठ्ठला
माझ्या विठुराया ।

चरणी तुझे
अर्पीतो
माझी काया ।

भुकेला मी
दे मजला
तुझी माया ।

वसे पंढरपुरी
जगताची
जिवन छाया ।

निघता वारी
दाटे उल्हास
पंढरी जाया ।

टेकीतो माथा
देवा पांडुरंगा
तुझीया पाया ।

जय हरी विठ्ठल
श्री हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल
जय हरी विठ्ठल ।
sanjay R.

“रंगांचा हा खेळ”

काऴया पांढऱया
रंगांचा हा खेळ ।
दिसेल रंगतदार
जरी त्यांची भेळ ।
व्यर्थ होइल सारे
घालुन त्यांचा मेळ ।
इतीहास साक्षीला
पारतंत्र्यात गेला
कीती वेळ ।
sanjay R.

“लहानपणातले दिवस”

ते लहानपणातले दिवस
कधीच परत ना यायचे ।
फक्त काढुन त्या आठवणी
मनास खुप रीझवायचे ।
शोधुन दुखातही क्षण सुखाचे
वर्तमानात आता जगायचे ।
sanjay R.