” चालना राया थोडे भिजायला जाऊ “

चलाना राया थोडे भिजायाला जाऊ
रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।

आकाशात ढगांनी किती गर्दी केली
भरून गेले आभाळ खाली सावली आली ।
चलाना राया थोडे भिजायाला जाऊ
रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।

गार झाला वारा मनी फुलला पिसारा
आठवणींच्या डोहात तुमचाच किनारा ।
चलाना राया थोडे भिजायाला जाऊ
रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।

चमचमली वीज कसा लख्ख झाला प्रकाश
अंतरात बघा कसे भरून आले आकाश ।
चलाना राया थोडे भिजायाला जाऊ
रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।

प्रीत तुमची माझी राया तोडू सारे पाश
येऊ द्या मिठीत मज घेऊ मोकळे श्वास ।
चलाना राया थोडे भिजायाला जाऊ
रिमझिम पावसात आपण दोघेही न्हाऊ ।
Sanjay R .

” आसवं कशी पुसायची “

पावसाचा रंग कसा उफाळून आला
काळ्या ढगांनी सूर्य झाकून दिला ।।

वाऱ्यालाही बघा किती जोश आला
सळसळती झाडं कशी घेताहेत झुला ।।

सर सर आल्या सरी आसमंत ओला
लोट निघाले पाण्याचे कुठे नदी नाला ।।

रिमझिम पावसाने कहरच केला
पुराच्या पाण्यासंगे गाव वाहून गेला ।।

नाही उरले घरदार कुठे आडोशाला
पाणीच पाणी जिकडे तिकडे जीवाचा काला ।।

निसर्गाच्या करणीचा नशिबावर घाला
आसवं कशी पुसायची पदरही ओला ।।
Sanjay R.

” वट सावित्री “

सावित्रीने दिला वसा
नवरा तुला हवा कसा ।

आज मिळाला जसा
जन्मोजन्मी हवा तसा ।

माणसा तुही सांग जरा
बायको तुला हवी कशी

आत्ता आहे ना ती जशी
तीच हवी जशीच्या तशी ।
Sanjay R.

” हे दिल मेरे सून जरा “

हे दिल मेरे तू सून जरा
शब्द मेरे तू सून जरा
बस तू सून जरा

जो भी कहूँगा अब मै
ध्यान तू अब दे जरा
तू सून जरा

कौन सुनता यहा किसीकी
फट गये है परदे कानके
बस तू सून जरा

न रहा लगाम जुबापे
चाहे जो कह दो कुचभी
बस तू सून जरा

नही पता धमनीयो मे
बहता रक्त या पानी
तू सून जरा

मरने मारनेमे उतारू सब
चैन कबका खो गया
तू सून जरा

बंधी है आखोपे पट्टी
दिखता नही अब कुछ
तू सून जरा

मीट गयी मिट्टीमे इज्जत आब्रू
शरम बचेगी कैसे तू बता
बस तू सून जरा

सोच भी खो गई कबकी
आत्मा भी तो मर गयी
तू सून जरा

लाश बन गया हू अब मै
न जाने दिलभी कब मर गया
बस अब तू सून जरा
Sanjay R.

” जाऊ थोडं पावसात “

चल ना ग सखे
जाऊ थोडं पावसात ।
पावसाच्या सरी बघू
कशा त्या धावतात ।

बघ जरा आकाशी
ढग आलेत भरून ।
नाचू या दोघंही
हातात हात धरून ।

बरसणार्या या सरीत
घेऊ थोडं भिजून ।
ये ना मिठीत माझ्या
मन घेऊ रिझवून ।

गडगडतय आभाळ किती
चमचमणारी वीज बघ ।
हृदयात होतेय धडधड
नेत्रात दिसतंय जग ।
Sanjay R.

” काला अंधेरा “

क्या मोहब्बत क्या इष्क
चाहतमे उनके भूल गया सब कुछ ।

जहाँ भी देखू नजर आये वह
हाल दिलका तु मुझसे ना पुछ ।

खो गयी राते निंदकी
दिन का भी तो आलम वही ।

धुंडती है बस नजरे तुम्हीको
मिट न जाये ये पलके कही ।

जी रहा हु अब मै तुम्हारी यादोमे
हसता मुस्कुराता तुम्हारी ख्वाबोमे ।

न जाने यूही बिते कितने दिन
सोचता क्या बचा अब तुम्हारे यादोमे ।

देख रहा अब मै एक तुटता तारा
चमचमता वह खूबसूरत सितारा ।

बादलोमे न जाने कैसे गुम हुवा
अब तो बचा सिर्फ काला अंधेरा ।
Sanjay R.

” ये ना रे पावसा “

कसा रे तू पावसा
ये ना जरा दाखव तुझा रंग ।

केलेस तू ढग जमा
पडना जरासा या वाऱ्यासंग ।

बघत आहे शेतकरी
वाट तुझी किती तरी ।

नाकोरे सोडूस असा
बळीराजास तू असा अधांतरी ।

जगतो तुझ्याच तो आशेवर
होऊ दे रे आता पेरणी ।

चिंब चिंब भिजू दे
होऊ दे तृप्त तप्त धरणी ।
Sanjay R.

” तुझ्यातला तू आणी माझ्यातला मी “

का हवा मला सांग,
इतका का हव्यास
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

मी मी म्हणणारे आहेत बरेच,
असेल का कळला त्यांना
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

मीच तर करतो घात,
शेवटी मात्र रिकामा हात
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

वाढतायेत अजून मनातले वेध,
अजून अजून ची आकांक्षा
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

लालसा म्हणावी का ओढ,
की चुंबकाची शक्ती
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

नाहीच भरत मन,
सरतात मर्यादा उरते नुसती हाव
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी

कधी होणार अंत,
विचार थोडे निवांत, सगळे शांत शांत
तुझ्यातला तु आणी माझ्यातला मी
Sanjay R.

” मौत “

आज अलगसा कुछ करते है
चलो जी कर थोडा मरते है

न जाने कितने रोज मरते है
और कुछ जीते जी मरते है

भूक प्यास दवा दारू
और कभी हालात
कारण तो और भी बहोत होते है

किसीका जुनून किसीकी हवस
कही लढाई कही झगडा
कुछ तो मरते है बिना कोई लफडा

सस्ती है मौत यहा मरनेवाला मरता है
कोई अपना रोता है अपनेको खोता है

और मारनेवाला लाशोके ढेर पर सोता है
पता नही कैसे चैन की सास लेता है

खुदको आतंकवादी कहता है
मौत से वो भी तो डरता है
Sanjay R.

रोजची खबर

काश्मीरची ऐकतो रोजच खबर
पावलागणिक सापडेल कबर ।

नाही जिथे युद्धाचे मैदान
नाही कुणाला कुणाचे आव्हान ।

लपूनच होतो तिथे हल्ला
देशद्रोह्यांचा असतो सल्ला ।

त्यातही शिजते राजकारण
झाकतात डोळे पाहून मरण ।

नरम धोरणास कोण घालतो भीक
मत पेट्यांचीच तर काळजी अधिक ।

कितीक झाले सरकारी इशारे
अंकात मोजायचे तिथे मरणारे ।

सांगा कुणी कधी लढणार
भेकडांची कंबर तोडणार ।

झुकवाल काहो तिरंगा तेथे
बोलघेवडे हे आमचे नेते ।

मरणाऱ्यांची किंमत कुणाला
फौज उभी का फक्त मरणाला ।

का होईल बंद पडतील खंड
राहील हातातच तुमचा दंड ।

उठा थोडे सारे जागे व्हा
घेऊन निर्णय करा स्वाहा ।
Sanjay R.

कमळ

सांगू कसं तुला
मनात उठलं रान ।

रूप तुझे मनात भरले
भासे सौंदर्याची खाण ।

गुलाबी ओठ तुझे
नाक डोळे छान ।

हास्य गालावर तुझ्या
सुचते प्रेमाचे गाणं ।

अंतरात तूच माझ्या
जसं कमळाच पान ।
Sanjay R.

जीवनाचा सार

काय असेल सांगेल कोणी
जीवनाचा या सार ।
सहजच आला मनात माझ्या
नकळत एक विचार ।

पडलो उठलो परी लढलो
कितीक झेलले प्रहार ।
अंतलाच असा मग इतका
का काळा अंधार ।

मागे पुढे आणि आजू बाजू
दिशा असती चार ।
खाली धरती वर आकाश
मधला मीच का निराधार ।

सुख दुःखाच्या वाटा कितीक
कुठे जायचे नव्हता विचार ।
चालत चालत थकलो आता
थांब जरासा सरला आहे बाजार ।

कुणी कुणाचा कोण लागतो
हसतो फुलतो येतो कसा बहार ।
सांज होता परतून फिरतो
ठेऊन जातो उघडे हे दार ।
Sanjay R.

ढगांची गडगड

चालली ढगांची
नुसती गडगड ।

वाढली छातीत
कशी धडधड ।

बंद बघा झाली
साऱ्यांची बडबड ।

सगळीकडे शांतता
वाऱ्याची सळसळ ।

थेंब पावसाचे
करताहेत तडतड ।

मनात चुकचुकली
पालीची फडफड ।

कोसळली का वीज
झाली तडफड ।

जोर वाढला पावसाचा
घडा भरू दे घडघड ।

देवा शेतं पिकू दे
आभाळ भर ।

शेतकरी राजाला
आता सुखी कर ।
Sanjay R.

दिवस आले पावसाचे

दिवस आलेत पावसाचे
मनसोक्त त्यात भिजायचे ।

थेंब पाण्याचे मोजायचे
ढगांच्या खाली नाचायचे ।

चमचमत्या विजेला बघायचे
गडगडाट होता पाळायचे ।

कांदा भाजीचे बेत आखायचे
टाकून आलं चहा प्यायचे ।

घेऊन छत्री बाहेर निघायचे
पावसाच्या रंगाला थोडे बघायचे ।

सर्दी खोकल्याला थोडे जपायचे
डॉक्टर ला दूरच ठेवायचे ।

पावसाला एन्जॉय करायचे
आनंदाच्या सोहळ्यात फुलायचे ।
Sanjay R.

गडगडाट

बघता बघता आज पाऊस आला
उष्ण वारा गार झाला ।
थोड्याच वेळात पावर गेला
सगळीकडे अंधार झाला ।
ढगांचाही गडगडाट झाला
आनंद सगळ्यांना अफाट झाला ।
नभा आड सूर्य बाद झाला
झाडा झुडपात ही प्राण आला ।
Sanjay R.

एक ढग तू

फक्त एकदा
वळुन थोडं बघ तू ।
सुंदर हे आकाश
त्यातलाच एक ढग तू ।

आसुसले सारेच इथे
दे एक थेंब तू ।
फुलेल हसेल धारा सारी
बदल सारे जीवन तू ।

थेंबे थेंबे साचेल तळे
सागराचा कण तू ।
वाऱ्या सांगे बरस थोडा
ओल्या मातीचा सुगंध तू ।
Sanjay R.

सहज जाता जाता

सहजच सरळ जाता जाता
तिरक्या नजरेनं बाजूला बघायचं
कोण बघतेय आपल्याला
जाणुन थोडं फुलायचं ।

सहजच सरळ जाता जाता
खाली थोडं बघायचं
धोंडे माती रस्ता कसा तो
संभाळूनच थोडं चालायचं ।

सहज सरळ जाता जाता
वर आकाशात थोडं बघायचं
गर्दी ढगांची बघून
चालण्याच्या गतीला थोडं वाढवायचं ।

सहज सरळ जाता जाता
वळून मागे नाही बघायचं
भुतकाळ मागे सारा
पुढे अजून पुढेच बघायचं ।

सहज सरळ जाता जाता
विचारात नाही गुफटायच
भविष्याचा गढ उंचच उंच
शिखरावर जाऊन पोचायचं ।
Sanjay R.