कसा हा गारवा

कसा हा गारवा
झाली थंड हवा ।
निसर्गाने ओढला
नव रंग नवा नवा ।
दूर तिथे आकाशात
दिसे पाखरांचा थवा ।
चिव चिव त्यांची जशी
वाटे वाजतो पावा ।
Sanjay R.

पोटाची आग

भुकेचा उसळला डोंब
कळली पोटाची आग ।
चौत कोर पोळीसाठी
होते किती भागम भाग ।

कष्टासाठी पुढे येती हात
सोसतो कुणाचाही राग ।
झेलतो किती शब्दांचे वार
असतो तो सर्स्वाचा त्याग ।

अन्न पाणी अन् निवारा
गरजांचा घेतो मी माग ।
अंताचा होतो अनंत
विझते कुठे ती आग ।
Sanjay R.

झालो मी शून्य

तुझा असेल जो निर्णय
असेल मलाही तो मान्य ।
चला रे उचला मिळेल ते
घेऊन गेले सारे धन धान्य ।
बघतच राहिलो त्यांच्याकडे
कोण बोलणार तिथे अन्य ।
शब्दात पकडले त्यांनी मज
म्हणणार कसे मज हे अमान्य ।
सहजच गेलो बोलून मी सारे
आता बघा नजर झाली शून्य ।

Sanjay R.

अपेक्षा

नाही उत्तराची अपेक्षा
नको प्रश्नाचा अनर्थ ।
मनच कुठे उरले आता
त्यासी न कशाचा स्वार्थ ।

सारखा चालतो विचार
शब्दांचे जुळावितो अर्थ ।
जीवनाची हीच व्यथा
ऐकतो हाक ती आर्त ।
Sanjay R.

निर्णय

आली निर्णयाची घडी
संपलेत विचार आता ।
सुचेना मनास काही
डोळ्यापुढे जन्माची गाथा ।

नकळे काही मजला
सांगू कुणास माझी व्यथा ।
नशिबाशी जुळली आहे
जीवनाची ही दीर्घ कथा ।

गरिबिशी गाठ इथे
श्रीमंत कोण आहे दाता ।
पैशाचेच आहे मोल
ठरवते पैसा सारी प्रथा ।
Sanjay R.

होईल प्रभात

एक वाट सुखाची
झाड प्रेमाचे त्यात ।
नाही दुःखाची छाया
फक्त हवे खुले हात ।

बघ वळून मागे
आहे तुलाही साथ ।
संपेल हा अंधार
मग होईल प्रभात ।

टाळू नको तू दुःख
ती सुखाची सुरुवात ।
दुखा पाठी येते सुख
मग होते बरसात ।
Sanjay R.

असत्य कुठे लपवू

सत्य किती शांत
हसते ते गालात ।
ना कुणाची भीती
नाही काही मनात ।

निर्विकार ते असे
दिसे साऱ्यास क्षणात ।
उजळून होई स्पष्ट
मिरवेल चार चौघात ।

असत्याला लपवू कुठे
दिसे ते कणा कणात ।
जगणेच होते कठीण
ठेवू कुठल्या गुणात ।
Sanjay R.

असत्याचा बोलबाला

शोधू कुठे मी सत्य
होतो जरी विजय ।
पराजयाची झाली सवय
मन आतच जळतंय ।
असत्याचा बोलबाला
वाटे तोच अजय ।
विचारांना लागली कीड
मनास कुठे कळतंय ।
Sanjay R.

विजय

असत्य कसे जिंकेल
होईल सत्याचा विजय ।
सत्यवचनी सदा असे
पदोपदी तोच अजय ।
असत्याला कुठे आसरा
होतो त्याच्या पराजय ।
त्रिलोकी फडके निशाण
सत्याचाच होई विजय ।
Sanjay R.

सुरुवात

आरंभ म्हणू की प्रारंभ
सुरुवात हीच असते ।
वेळ काळ हवा थोडा
मग तर सारेच सरते ।
विचारांना नाही सीमा
सर्वस्व तिथेच हरते ।
अंत कुठे कसा थांबतो
माप ऐक दिवस भरते ।
Sanjay R.

ऊन असते खायला

ऊन असते खायला
थंडी थोडी प्यायला ।
गर्मी व्हायला
आणि हवा द्यायला ।

नको बाकी काहीच
वेळ होतो जायला ।
शिव्या द्यायच्या तर
म्हणा च्या आयलां ।

सुंदर असेल दिसायचं
तर या फक्त पाहायला ।
गालावर दिसेल खळी
येईल मग हसायला ।
Sanjay R.

मन अधीर

मन होते अधीर
नजर भिर भिर ।

माझे माझे करी
ठेव थोडा धीर ।

लढाईत सैनिक सारे
सारेच इथे वीर ।

जगण्याची ही लढाई
चल करू नको उशीर ।
Sanjay R.

आरंभ तिथे अंत

आरंभ तिथे अंत
आहेच कोण कोण निवांत ।
मार्ग सत्याचा हवा
विचार साऱ्यांनाच  अनंत ।
जगा आणि जगू द्या
मनात नसेल कुठली खंत ।
Sanjay R.

स्वप्नाचा असर

ते गावाच्या अगदी बाहेर
निर्जन जागी ऐक घर ।
आजूबाजूला दाट जंगल
होता रात्रीचा तो प्रहर ।

अमावस्येची रात्र काळी
वातावरणात वेगळाच स्वर ।
मधेच फडफड पाखरांची
वाटले मज यतोय कोणी अधर ।

काळी ती छावि लोंबता झगा
हसण्याचा आवाजात जोर ।
अंग माझे मग कापू लागले
आभास की  स्वप्नाचा असर ।
Sanjay R.

भूत

भूत मनातली भीती
घाबरतात सारे किती ।
अमवसेला येतात म्हणे
का असते तीच तिथी ।

भूत म्हणजे निव्वळ भ्रम
नकोच ते शोधण्याचे श्रम ।
विचारांनी च लागतो रोग
जातो त्यातमाणसाचा दम ।
Sanjay R

घर

माणसाचा एक सहारा
घर देते आसरा ।
प्रपंचासी ठेवी बांधून
नसतो तिथे पहारा ।
सुरक्षित वाटते किती
घरात आपलेपणा खरा ।
Sanjay R.

माणसाचा आला अंत

नशिबाने घेतले वळण
गरीब झाला श्रीमंत ।
पैशाला नाही किंमत
कोणी झाला संत ।
युद्धाचे वादळ इथे
माणसाचा आला अंत ।
रक्ताचा वाहतो पाट
नाही कुणाला खंत ।
Sanjay R.

माणसाचा आला अंत

नशिबाने घेतले वळण
गरीब झाला श्रीमंत ।
पैशाला नाही किंमत
कोणी झाला संत ।
युद्धाचे वादळ इथे
माणसाचा आला अंत ।
रक्ताचा वाहतो पाट
नाही कुणाला खंत ।
Sanjay R.

नशिबाचा खेळ न्यारा

नशीबच असते असे
वळण त्यात किती कसे ।
वर खाली मागे पुढे
रस्ता सरळ कधीच नसे ।

दुःखाचा कधी येतो पूर
कधी कुणासाठी मन आतुर ।
आसवांचा वाहतो लोट
काळाकुट्ट समोर धूर ।

हळुवार पावलांनी येते सुख
कशाची तरी मनात रुख रूख ।
मोह माया अनेक ज्वर
संपता संपेना मग भूक ।

नशिबाचा खेळच न्यारा
अचानक येतो कधी वारा ।
होत्याचे नव्हते होते
उडून जातो सारा पसारा ।
Sanjay R.

संधी

मिळते कुठे परत परत
संधी चे करावे सोने ।
डोक्यात नको विचार
द्यावे सोडून जुने ।
Sanjay R.