” शुभेच्छा नव वर्षाच्या “

हवेत आहे आज थोडासा गारवा
झुळ झुळ वाहते मस्त ही हवा ।
परतिला निघाला पक्षांचा थवा ।
संपतय उद्या हे वर्ष सोळा आणी
वर्ष सतरा घेउन येयील दिवस नवा ।
शुभेच्छा नव वर्षाच्या संगे आनंदाचा ठेवा ।
Sanjay R.

” विदर्भ माझा “


विदर्भाचा थाटच न्यारा
कधी निघतात घामाच्या धारा ।
तर कधी गार गार वारा
चढ उतार करतो पारा ।

बोली इथली वर्हाडी
तुया माह्यात आहे गोडी ।
सच्चा मनाचे प्रेमळ गडी
लिन होउन हात जोडी ।

निसर्गानं दिली हिरवी वनराई
वाघोबाची इथे नाही नवलाई ।
संत महात्म्यांची होती पुण्याई
इथल्याच मातीतली थोर जिजाई ।
Sanjay R.

” नको रे धाडु आम्हा वृद्धाश्रमी “

नको रे धाडु तु
आम्हा वृद्धाश्रमी ।
माया दीली तुज
आम्ही का कमी ।

आहेस तु आमच्या
पोटचा गोळा ।
विचार कसा आला
मनात असला खुळा ।

किती रात्री जागल्या
आम्ही त्या काळ्या ।
बाबांचे कष्ट कसा
विसरलास रे बाळ्या ।

प्रेमळ तुझ मन का
झाल इतक कठोर ।
थकलो रे आम्ही आता
नको होउस निष्ठुर ।

मोठा तु झालास
आणी खुप हो मोठा ।
नशीबच खोटं आमचं
पैसाही रे हा खोटा ।
Sanjay R.

” गंध मोगर्याचा “

असेल वादळ
जरी या मनात ।
आहेस तुच सखे
माझ्या ह्रुदयात ।
असतील चांदण्या
कीतीही गगनात ।
तु चंद्रिका जशी
एकच आकाशात ।
गंध मोगर्याचा जसा
पसरला अंगणात ।
शोधतो तुज मी
माझ्या प्रत्येक श्वासात ।
सुहास्य वदन तुझे
ठेवीले मी नेत्रात ।
शब्दनी शब्द तुझा
कोरला मी काळजात ।
Sanjay R.

” निंद ना आवे “

निंद न आवे मोहे
याद तोहरी सताये ।
काहे दुर न जावे
मेरे सपनेमे आये ।
इक नजर देख तुझे
दिल चैन मेरा पाये ।
तुझ बिन मोहे
कुछ भी न भाये ।
Sanjay R.

” जा ना तु “

असच असतं काहो
माणसाचं हे म्हातारपण ।
थरथरत असतं शरीर
आणी उदास असतं मन ।
थकलेल्या शरीराला
आधाराची असते चणचण ।
नसते उरलेली हिम्मत
टाळतात सारेच म्हणुन ।
उलटलेत कष्ट ज्यांच्यासाठी
तेच म्हणतात जाना तु मरुन ।
नकोसा होतो जिव तरी
तरी वाटतं घ्यावं थोडं जगुन ।
कधी कधी मात्र वाटतं
देवा नेना लवकर उचलुन ।
इच्छा तर असतात खुप
पण नसतं माहीत दिवस
उरलेत कीती अजुन ।
Sanjay R.

” धाव “

बघता डोळ्यातले तुझे भाव
उलटली माझ्या जिवाची नाव
नाही उरला मनास मनाचा ठाव
आवरु कशी मी विचारांची धाव
Sanjay R.

” मोसम थंडीचा “


प्रिये तुझा मी दिवाना
सायंकाळ थंडीची
वाटे मोसम सुहाना ।
तिर तुझ्या नजरेचा
साधतो ह्रदयी निशाना ।
भेटण्यास तुज आता
शोधतो मी बहाना ।
अधिर झाले मन
शब्द कवितेस मिळेना ।
सपव ओढ मनाची
उमलु दे आता फुलांना ।
Sanjay R.

” थंडी फार आहे “

सकाळी उठुन
बाहेर निघाल्यावर कळतं ।
थंडी फार आहे
शरीर थंडीत कसं कळवळतं ।
म्हणतात ना गरम रक्त
फारच सळसळतं ।
आणी थंड
काय हळहळतं ।
ज्याचं जळतं ना
त्यालाच कळतं ।
आणी हो ज्याला कळतं
त्यालाच पोळतं ।
जास्तच झालं तर
मात्र मळमळतं ।
Sanjay R.

” कवितेच्या गावात “

जाउ या चला
कवितेच्या गावात ।
खुप सारं आहे
लिहायला मनात ।
तरंग उठतात
ह्रुदयाच्या खोलात ।
सरसावतात शब्द
उतरायला कागदात ।
दुःखाचे क्षण
भिजुन जाइ आसवात ।
मात्र आनंद कसा
मावेना गगनात ।
Sanjay R.

” येकच आहे वाट “


मनातल्या स्वप्नांची बघ
एकच आहे वाट ।
चढ उतार वेड्या वाकड्या
वळणांचा आहे हा घाट ।
निसर्गाची किमया न्यारी
जंगलं आहेत दाट ।
रम्य किती मनोहारो
झुळ झुळ वाहतात पाट ।
आनंद उत्साह सुख शांती
सुंदर किती हा थाट ।
समुद्र इतका विशाल इथे
सुख दुःखाची येते लाट ।
जिवनाची ही हिच तर्हा
रात्री नंतर होते पहाट ।
Sanjay R.

” पहाट “


चमकत होते चंद्र तारे
रात्र होती काजव्यांची ।
रातराणी देउन गेली
पाकळी दुर सुगंधाची ।

पहाट होताच अंगण न्हाले
किलबील किलबील पाखरांची ।
रम्य झाली धरा सारी
होताच बरसात किरणांची ।
Sanjay R.