आज आला होता
आमच्या गावी
पाउस मोठा ।
पावसाळा गेला
आला नाही तेव्हा
कीती तो खोटा ।
सिझन गेला अक्खा
पिकल नाही काही
सांगा तुम्हीच
येतील कुठुन नोटा ।
नेहमीचच झालं
यंदाही भोगु
नशीबाचा खेटा
Sanjay R.
लाभेल मज आता
सहवास कविंचा ।
स्फुरतील शब्द
आनंद मनीचा ।
Sanjay R.
गार गार थंड थंड वारा
पावसाचा हलका फवारा ।
मधेच गेला पावर
पडताहेत आता गारा ।
Sanjay R.