आली आणि गेली
आनंदाची दिवाळी
आता पैसा संपला
वाजवा फक्त टाळी
चव अजून जिभेवर
नको पुरण पोळी
सुट्ट्या पण संपल्या
लागा कामाला सकाळी
Sanjay R.
Monthly Archives: October 2019
” आपला दिवाळी अंक 2019 “
‘ नागपूरची संत्री फेसबुक समूह ‘
द्वारा संपादित
“आपला दिवाळी अंक 2019 “
चे प्रकाशन –
नमस्कार मित्रांनो,
दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांसाठी आज एक आनंदाची वार्ता आहे.
आपणा सगळ्यांच्या अथक प्रयासा नंतर आपल्या नागपूरची संत्री समूहाचा ई – संग्रह ” आपला दिवाळी अंक 2019″ प्रकाशित करीत आहोत, आपणा सगळ्यांना हा वाचता यावा या साठी खालील लिंक वर उपलब्ध करून देत आहोत.
अंकात सामील सर्व साहित्यिक, लेखक, कवी, कथाकार, विचारक आणि रेसिपी लिहिणाऱ्या गृहिणींचे नागपूरची संत्री समूहातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि आपला हा ई दिवाळी अंक वाचकांसाठीआज दिनांक 28.10.2019 रोजी प्रकाशित करतो. हा अंक नक्कीच आपणा सगळ्यांना आवडेल अशी आशा आहे.
धन्यवाद…
लिंक :-
https://drive.google.com/file/d/15stmUxEFFFQp0OZeGMEVynYyiIiwXsgQ/view?usp=drivesdk
अंक आवडल्यास आपल्या समुहाच्या https://www.facebook.com/groups/nagpurchi.santri/
लिंक वर जाऊन नक्की कमेंटस् द्या.
पुस्तक स्वरूपात पाहण्यासाठी खाली क्लिक करा
https://www.flipsnack.com/nsaapladiwaliank2019/-.html
पूर्ण अंक डाऊनलोड करण्यासाठी खालील लींक वर जा
https://drive.google.com/file/d/15stmUxEFFFQp0OZeGMEVynYyiIiwXsgQ/view?fbclid=IwAR2Kw58sCQ9k7mc1jMutlIZ0hY1O0EUYnzy4KpQXdw8spkA9k0zetzHLxkA
” दिवाळी तुझी रे बळी “
राहू दे तेवत असाच
दिवा या दिवाळीचा ।
करु नकोस अंधार
प्रकाशित जीवनाचा ।
गेली पावसात दिवाळी
हिरमुसला किती बळी ।
घरात शिरले लोट पाण्याचे
दुःख किती त्याच्या कपाळी ।
लुप्त झालेत आसवं सारी
गंगा यमुनेस आला पूर ।
मदतीला हाक देऊ कुणास
वाट सुखाची किती दूर ।
Sanjay R.
” करू स्वागत दिवाळीचे “
तेज प्रकाशाचे
छोट्याश्या पणतीचे ।
येई घेऊन सौख्य
वेचू क्षण आनंदाचे ।
सरु दे अंधार सारा
भाग्य उजळू दे जीवनाचे ।
हर्षोल्हासात करू स्वागत
सारे आपण दिवाळीचे ।
Sanjay R.
” देवाला पत्र “
चला लिहू या देवाला पत्र
सांग म्हणावं आता
कधी थांबेल पावसाचे सत्र ।
धुवून पुसून झाले ना स्वच्छ
पुराच्या पाण्यापुढे
अश्रूही झालेत किती तुच्छ ।
घर गेले संसार तुटला
नाही छत डोक्यावर
देवा कारे असा तू रुठला ।
काय सांगू मी अजून तुला
देवा करतो तुझाच धावा
कर ना मदत तूच आता मला ।
Sanjay R.
” आली दिवाळी “
दिवाळीचा आज
पहिला दिवस ।
आहे आहे
आज धनतेरस ।
नरकचतुर्दशी आणि
होईल लक्षमीपूजन ।
आनंद उत्साहात
बघा सारेच जण ।
बलिप्रतिपदा आणि
मग भाऊबीज ।
ओवाळेल बहीण
रे भावा तुज ।
लाडू अनरसा खाऊ
चिवडा चकली ।
नवीन कपड्यात
हसेल रे छकुली ।
Sanjay R.
” प्रश्नाला असतो प्रश्न “
प्रश्नाला असतो प्रश्न
उत्तराला उत्तर ।
डोके विचारांचे घर
प्रश्न त्यात सत्तर ।
लागेल ठेच बघा
वाटेत सारेच पत्थर ।
कुणी मवाळ त्यात
कुणी बहुत कट्टर ।
वाट धरा सुखाची
शिंपडा थोडे अत्तर ।
सुखी सारेच होतील
आनंदाचे हेच उत्तर ।
Sanjay R.
” फुल पाखरू स्वच्छंदी “
मी असाच आहे
बघतो आनंद इतरांचा
होतो थोडा आनंदी ।
बघून दुःख मात्र
होतो दुःखी आधी ।
आहेच मी थोडा
परमानंदी ।
मात्र मनात माझ्याही
आहे एक धुंदी ।
नाहीच जमत मला
करायचे अंतराला बंदी ।
मान डोलावतो ना
असतो तो नंदी ।
मी पण होतो कधी
फुल पाखरू स्वच्छंदी ।
Sanjay R.
” लग्न “
लग्न एक विश्वासाचा बंध
आयुष्यभर दरवळतो सुगन्ध ।
वाट जरी असेल ही रुंद
फुलतो संसार करतो धुंद ।
जगतो जीवन मंद मंद
परंपराच ही देई आनंद ।
Sanjay R.
” चला करू या मतदान “
नेत्यांना तर सत्तेचा माज
नाही उरली कसलीच लाज ।
मिरवतात डोक्यावरती
भ्रष्टाचाराचा ताज
नाहीच यायचे हे असे बाज ।
दाखवू इंगा , पाडू गाज
चला करू या मतदान आज ।
Sanjay R.
” अंत माणसाचा “
बापू तुम्ही महान संत
मंत्र तुमचा अहिंसेचा
पण माणूसच करतो
का माणसाचा अंत ।।
दहशतवाद नाव ज्याचे
विचार झाले हिंसेचे
राग द्वेष धर्मांधता कशी
पसरले सावट युद्धाचे ।।
निरपराधी देतो प्राण
उघड्यावर येतो संसार
नाही कुणाचा आधार
आकाशी हे कुठले निशाण ।।
Sanjay R.
” आली दिवाळी “
झाली सुरू साफ सफाई
आली दिवाळी , करा घाई ।
गर्दी पाई रस्ते झाले जाम
दिवाळीचा किती तामझाम ।
दिवे पणत्या कपडे खरेदी
आभाळास टेकले सोने चांदी ।
मंदी चा हा दौर आला
खिशावरती महागाईचा घाला ।
फटाक्यांना सरकारी बंदी
गरिबांना कुठे दिवाळीची धुंदी ।
Sanjay R.
” सांगा कसं करायचं “
कधी आठवायचं
कधी विसरायचं
कळतच नाही ना
काय कसं करायचं ।
सांगा कसं वागायचं
कानांनी ऐकायचं
डोळयांनी बघायचं
पटेल मनाला तेच
फक्त करायचं ।
दुःखाला सरायच
आनंदाला घ्यायचं
जीवन हे अनमोल
आहे ना जगायचं ।
Sanjay R.
” मन विचारात आहे अंतरात “
मन असते कुठं
खूप खोल अंतरात ।
मन असतं कसं
सूक्ष्म की विशाल ।
मात्र असत ते
नेहमीच विचारात ।
क्षणात इथे तर
क्षणात तिथे ।
स्वतः माणूस पोचणार नाही
आधीच ते पोचते तिथे ।
कधी साक्षात
तर कधी स्वप्नात ।
फिरून फिरून
येईल परत अंतरात ।
तिथूनच घेईल झेप
दूर अंतराळात ।
नसेल जीथे मर्यादा
विचार मनाचे अमर्याद ।
न भाषा न शब्द
नसते कधीच स्तब्ध ।
जीवनाचा चाले विचार
हेच मनाचे प्रारब्ध ।
Sanjay R.
” ते आहे क्षितिज “
ते समोर दिसतंय ना
ते आहे क्षितिज ।
वाटतं किती जवळ
पण आहे किती दूर ।
सांगायची आई लहानपणी
ते ना आहे फार दूर ।
असा होऊ नकोस आतुर
आज वाटतं किती ते फितूर ।
नाहीच कुठे अस
जमिनीला टेकलेलं ।
आकाश दूरच असतं
अंतर त्यानं राखलेलं ।
मनही असच असतं
क्षणात इथे तर
माहीत नाही क्षणात कुठे ।
असतो नुसता आभास
त्यातच रामयचं ।
सागर दुःखाचा इथे
दुःख आपली विसरायचं ।
चल जाऊ थोडं पुढे
आहे अजून खूप जगायचं ।
Sanjay R.
” मन किती हे वेडं “
मन किती हे वेडं
धावते पुढं पुढं ।
चाल त्याची दुड दुड
नाही थांबत थोडं ।
पुढे नाविण्याचं घोडं
मनी कुतुहलाची खोड ।
शोधी साऱ्यावर तोड
मिरवी मीच मोठा लोड ।
करी कधी धर सोड
चाले मनात तोडफोड ।
दुःखाला आनंदाची जोड
वाटे मग सारेच गोड ।
Sanjay R.
” चार ओळी “
चार ओळी
(1)
जंजिर से बांधे
वह कैद होती है ।
बंधन हो दिलका
वह तो प्यार होता है ।
(2)
बंधन एक धागेका
तुटता है जरूर ।
दिल तूट जाये तो
कहेना दिलका कसूर ।
(3)
असेल शब्द तीक्ष्ण हत्यार
करतही असतील ते घायाळ ।
पण तितकीच ताकद त्यांची
बघा बोलून थोडे मधाळ ।
(4)
शांतता असतो
एक संकेत वादळापूर्वीचा ।
हवे कशाला वादळ
नकोच त्रास मग शांततेचा ।
Sanjay R.
” शरद पौर्णिमा “
निघाला चंद्र जेव्हा
भ्रमणाला आकाशात ।
खुदकन हसली चांदणी
गोड कशी गालात ।
मात्र चंद्र होता तेव्हा
आपल्याच नादात ।
दिवस शरद पौर्णिमेचा,
सारेच किती आनंदात ।
निरखत होता चंद्र
रूप चांदणीचे दुधात ।
दुधाचे झाले अमृत
हसली चांदणी गालात ।
Sanjay R.
” प्लास्टिक विना भारत स्वच्छ “
स्वप्न एक आमचे
भारत स्वच्छ ।
करायचे प्लास्टिक
इथून गच्छ ।प्लास्टिकचे जीवनात
स्थानच उच्च ।
मग प्लास्टिक
आहे कुठे तुच्छ ।शोधा पर्याय
कुठला तरी अच्छा ।
मगच सांगा…….
प्लास्टिक सोडा
करा भारत स्वच्छ ।
Sanjay R.
” बांध फुटतो मनाचा “
दिवसा मागून दिवस जातात
मनाला मनाचे कळत नाही ।
जाग येते सूर्याला आणि
तेव्हाच सुरुवात होते काही ।
आठवणींचा मोठ्ठा पसारा
सहजच येतो मग पुढ्यात ।
एकच थेंब पाणी कसे
वसते डोळ्याच्या घड्यात ।
अंतरातली जखम खोल
सहजच दुखावते कधी ।
वाहू लागते भळभळून
बांध मनाचा फुटतो आधी ।
Sanjay R.