पावसात मज भिजायचे आहे

पावसात मला खूप
भिजायचे आहे ।
खेळ पावसाचे मज
खेळायचे आहे ।
साचलेल्या पाण्यात
नाचायचे आहे ।
वाहत्या पाण्यात
नाव सोडायची आहे ।
काळ्या ढगांसह
धावायचे आहे ।
चिखलात थोडे
भरायचे आहे ।
ओल्या मातीत
घसरायचे आहे ।
भिजुन पावसात
ओरडायचे आहे ।
गित पावसाचे
गायचे आहे
Sanjay R.

” रीम झीम पाउस “

रीम झीम रीम झीम
पाउस धारा ।
काळा पडलाय
आसमंत सारा ।
लपला सुर्य
नाही तारा ।
सु सु करतोय
सोसाट्याचा वारा ।
डोलताहेत झाडं
वाहतो झरा ।
कुणी बघताहेत
खिडकीनं नजारा ।
छत्री रेनकोटची
वेगळीच तर्हा ।
ओली ओली चिंब
भिजते धरा ।
ओसंडुन वाहतो
आनंद खरा ।
Sanjay R.

” कोरा लेख “

मी आणी माझ्या कविता
जिवनच झालय ते एक ।
हसणं बोलणं आणी रागावणं
काहीच नाही त्यात फेक ।
मनात आलंच तर लिहीतो
नाहीतर नुसता कोरा लेख ।
Sanjay R.

” मनाचे द्वंद “

मनात चालले द्वंद
नाही मजला ठाव ।
लागला एक छंद
कसा हा मनातला भाव ।

हास्य बघुन तुझे मज
वाटे सोबत तुझ्या हसावे ।
नजरेस देउनी नजर
डोळ्यात तुझ्या बघावे ।

रात्रंदिवस तासन तास
हितगुज तुजशी करावे ।
एक एक क्षण आठवणींचा
हृदयात त्यासी जपावे ।

फुल एक गुलाबाचे
केसांत तुझ्या माळावे ।
हातात घेउनी हात
थोडे तुलाच छळावे ।

तुझे माझे गुफुनी श्वास
एकरुप असे व्हावे ।
निशीगंधेच्या सु गंधात
बेधुंद होउनी गावे ।
Sanjay R.

” आला होता पाउस राती “

आला होता पाउस राती
जमन वाटते आता शेती ।

वाटे आठ दिस झाले आता
खर्च पेरनीचा जाइन मातीत ।

पानीच धावला गावावर पावला
बरं झालं बावा भिजली माती ।

देव आसन तीथं पंढरपुरी पन
जगाची दोरी मातर त्यच्याच हाती ।
Sanjay R.

” मला पण पाउस व्हायचं “

होउनी ढगांवरती स्वार
आकाश भ्रमणाला मज जायचं ।
मला पण आहे पाउस व्हायचं

अचानक येउन तुज कडकडुन भेटायचं
मनात तुझ्या डोकाउन हळुच छळायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

बेधुंद होउन खुप खुप बरसायचं
हळु हळु छान चिंब तुला भिजवायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

केसांमधुन गालावर हळुच खाली ओघळायचं
श्वासातला श्वास होउन कुशीत तुझ्या शिरायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।

गोड गुलाबी फुल होउन स्वप्नातनं तुज जागवायचं
गीत पावसाचे सोबतीनं तुझ्या आहे मज गायचं
मला पण आहे पाउस व्हायचं ।
Sanjay R.

” क्षण हासरा “

लाल तुझा शालु
केसात मोगरा ।
चेहर्यावरी भाव
आहे कीती लाजरा ।
नजरेत तुझ्या मी
शोधतो क्षण हासरा ।
माझे मलाच वाटे
विसरावे तुझ्यात जरा ।
Sanjay R.

” बघतो मी वाट “

बघतो मी
तुझीच वाट ।
मनात कीती
घातले घाट ।
वेळेचा मात्र
अलगच थाट ।
साराच उलटला
मनातला पाट ।
तरीही अजुन
मी बघतो वाट ।
येयील एक
आठवणीची लाट ।
सुर्य उदयाला
होइल ना पहाट ।
Sanjay R.

” आलम “

ऐसे रुठो ना तुम
कैसे मनाये हम ।
मुस्कुराओ थोडा
गुस्सा होगा कम ।
देखो तो अब आखोमे
दिलमे एक आलम ।
तुम हम और यादे
बस यही है सनम ।
Sanjay R.

” जिवन प्रवास “

मनी विचारांचा ध्यास
नजरेत कसला आभास
वाटे शुन्यात आहे श्वास
नको लाउ असा तु मनास
हा असाच जिवन प्रवास
सुख दुःख येती जाती
असे ते फक्त आभास
विसरुन सारे जायचे पुढे
आयुष्य होइल खास ।
Sanjay R.

” सितारा “

वाटे मज तु
रुपाची राणी ।
ओठ गुलाबी
जशी अप्सरा कोणी ।

हसरा चेहरा
सुडोल बांधा ।
झाकला तुझ्या
केसांनी खांदा ।

नेत्रात तुझ्या
एक भाव निराळा ।
शोधतो मज मी
लागला चाळा ।

भुललो सारेच
चंद्र आणी तारा ।
बघतो तुझ्यात
मी माझा सितारा ।
Sanjay R.

” बडीसी दिवार “

हाल दिलका मेरे
मत पुछ मेरे यार ।
जी रहा हु अबभी
गिनके दिन चार ।
रुक गयी शायद
फुलोकी बहार ।
गुमसुमसी हुयी
नदीकी बहती घार ।
रुकसी गइ देखो
सुर संगीतकी तार ।
जानता तो मै नही
फिरभी लगता मुझे है
इसीको कहते है प्यार ।
ओर बिच उसके आइ
एक बडीसी दिवार ।
Sanjay R.

” रिमझीम पाउस “

रिमझीम रिमझीम
पाउस आला ।
गडगड गडगड
नाद निघाला ।
आकाशी विजेचा
लखलखाट झाला ।
भिजल्या मातीचा
सुगंध आला ।
चला पावसात
चिंब भिजायला ।
Sanjay R.

प्रतिलिपि वर वाचा – “” लागले डोळे आकाशाला “”

“” लागले डोळे आकाशाला “”, वाचा प्रतिलिपि वर :
http://marathi.pratilipi.com/pratilipi/4879404558712832?utm_source=android&utm_campaign=content_share
अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

प्रतिलिपि वर वाचा – “” मीही एक फुल व्हावे “”

“” मीही एक फुल व्हावे “”, वाचा प्रतिलिपि वर :

http://marathi.pratilipi.com/pratilipi/5035071353389056?utm_source=android&utm_campaign=content_share

अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

प्रतिलिपि वर वाचा – “” पूजा करू चला वडाची “”

“” पूजा करू चला वडाची “”, वाचा प्रतिलिपि वर :

http://marathi.pratilipi.com/pratilipi/5961554116739072?utm_source=android&utm_campaign=content_share

अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

” सर पावसाची “

लागले डोळे आकाशाला
शोधायचे दुर आभाळाला ।
काळ्या ढगांना बोलवायाला
थेंब पाण्याचा मागायाला ।
धरा हिरवी फुलायाला
जिवन परत हसायाला ।
वार्या संगे डोलायाला
छत्री रेनकोट उघडायाला ।
आसुसली नजर खुलायाला
पावसाच्या सरीत भिजायाला ।
Sanjay R.