” मागणं “

जीवन हेच
एक रडगाणं ।
नको वाटे ते
रडकं जिणं ।
थोडं हसणं
थोडं रुसणं ।
सहजच सरेल
हसत जगणं ।
देवापाशी माझं
काय मागण !
बदलून टाक
साऱ्यांचं वागणं ।
Sanjay R.

” पिवशी “

चाल ना मावशी
घे तुयी पिवशी ।
जाऊ आता जत्रेले
लय तिथं हाउशी ।
काय काय घ्याचं
गंज आन पावशी ।
सेनीमा बी रायते
जत्रच्या दिवशी ।
चाल ना लवकर
घे तुयी पिवशी ।
मिरवून घेजो
जशी हौशी नौशी ।
Sanjay R.

” प्रभात झाली “

उगवला सूर्य
प्रभात झाली ।
प्रकाशली धरती
बहुरंगात न्हाली ।

प्रखरता सूर्याची
दिसे तुझ्या भाली ।
फुलला आनंद
झळकला गाली ।

चिवचिव पाखरांची
मधुर झाले गाणे ।
ओठात तुझिया भासे
सुरेल ते ताराणे ।

बघून थाट धरेचा
तारे दिपून गेले ।
नेत्रात बघून तुझ्याच
मन फुलून गेले ।
Sanjay R.

” आभाळ रिते “

भावनांचा हा वेग किती
विचारांचा आवेग किती ।

मनात बघ वादळ किती
अंतरात सळसळ किती ।

सर एक पावसाची येता
परडी आभाळाची रिती ।
Sanjay R.

” काय कसे “

काय लिहावे,कसे लिहावे,
न शब्द सुचे मजला….
आठवण तुझी होताच क्षणी,
शोधतात डोळे तुजला….

नसतेस ना तू तिथे
शोधतो मी तुला जिथे ….
मिटतो डोळे मी मग
असतेस तू अंतरात इथे….

तुझ्या वीना सांग मी कसा
आहेस तू माझा श्वास जसा…
आयुष्यभर असेल सोबत
घेतला मी तर हाच वसा….
Sanjay R.

” आधार “

मन विचारांचे भंडार
किती पेलायचा तो भार ।
ओळी होतील चार पण
शब्दच सांगतील सार ।
त्यात कवितेचा आकार
मग उघडे अंतराचे दार ।
कधी वाटे तेचि प्रहार
परी जीवनाचा आधार ।
Sanjay R.

” काहूर “

वाटेवर तुझ्या मी
मीही किती आतुर ।
बघ सखे आलोच मी
मनात माझ्याही काहूर ।
अंतरात तू माझ्या
नाहीस तू फार दूर ।
लावू नकोस अशी तू
हृदयास हूर हूर ।
घे पुसून आसवे थोडी
नको अणु पापणीत पूर ।
मन माझे तुटते किती
करू नकोस चुर चुर ।
Sanjay R.

” हूर हूर “

मनास लागे हूर हूर
सांग तू किती दूर ।
आठवण तुझी येत
मन होते आतुर ।
डोळे शोधतात तुला
येई पापणीत पूर ।
Sanjay R.

” रंग हिरवा “

शोभला रंग हिरवा
गालावर तुझ्या ।
हसते गुलाब कळी
दिसे ओठावर तुझ्या ।
भाव आनंदाचा फुलला
डोळ्यात तुझ्या ।
नवं रंग उधळला जणू
अंतरात माझ्या ।
Sanjay R.

” चाल ना बावा “

नागराचं हाये वावर
चाल ना बावा ।
न्हाई उन्हाची फिकीर
तू म्हनशीन तवा ।
वली होईन माती
घाम गळन जवा ।
येईन पीक जोमानं
आटन रगत तवा ।
पैका येईन हाती
घेऊ शर्ट नवा ।
पयले आना लागन
माय साठी दवा ।
पाहू मंग सपन
चाल ना बावा ।
Sanjay R.

” आली होळी आली “

ये ना गं सखे
आली होळी आली ।
रंग गुलाबी
लावायचा तुझ्या गाली ।
भिजवून रंगात
करील पिचकारी खाली ।
आली होळी आली
भिजून रंगात रंग तू झाली ।
Sanjay R.

” शेतकऱ्याचं जीनं “

सुकले झाडं
वायले पानं ।
शेतकऱ्याचं
एकच गानं ।
रडते बिचारा
काय त्याचं जीनं ।
पिकवून सारं
सावकाराले देनं ।
फाटक फुटक
सोताले घेनं ।
चिल्लावला कितीबी
तरी होनं ना जानं ।
मुकाट्यानं सोसते
आपलं जीनं ।
Sanjay R.

” गर्मीचा कहर “

सुरू झाला आता
गर्मीचा कहर ।
पाळासाला आला
फुलांचा बहर ।
तापून किती निघतय
गाव आणि शहर ।
कोरडे ठण ठण
नद्या आणि नहर ।
पाण्याविना होईल
आयुष्य जहर ।
Sanjay R.

” दूर किती तू “

धडधडते हृदय माझे
सळसळतो वारा ।
होता आठवण तुझी
चमचमतो तारा ।

दूर किती तू आहेस
त्या पर्वतांच्या पल्याड ।
अंतरास मात्र वाटे
इथेच तू पापणीच्या अल्याड ।
रिमझिम रिमझिम होते जेव्हा
पावसाची बरसात ।
बेधुंद होऊन घेतो भिजून
हातात तुझाच हात ।

ठेवले मी डोळ्यात जपून
नजरेचे ते इशारे ।
वाटेवर तुझ्याच थांबले
माझे श्वास सारे ।

करू नकोस उशीर आता
प्राण माझे कंठाशी आले ।
जगेलं कसा तुझ्याविना मी
स्वप्न माझे तूच झाले ।
Sanjay R.

” आभास “

आठवण आली ना
की व्हायचे भास ।
अंतरातच मग थोडे
थांबायचे श्वास ।

आजही कशी मज
आली तुझी आठवण ।
मन झालं थोडं अधीर
जीव झाला कण कण ।

उचकीने मांडला उच्छाद
कानांनी घेतली साद ।
नजर झाली भिर भिर
वाटले व्हावा थोडा संवाद ।

मनात तुझाच ध्यास
नव्हते काहीच लक्षात ।
स्वप्नच अवतरले जणू
पुढ्यात तूच साक्षात ।

बघितले तुझे लाजनें
गालात थोडे हसणे ।
नेत्रांचा तुझ्या दिवना
रूप तुझे किती देखणे ।

सुखावून गेला तो क्षण
भान माझे हरपले ।
फुल गुलाबाचे जणू
मी हृदयात माझ्या जपले ।
Sanjay R.

” निवडणूक 2019 “

आली आली
निवडणूक आली ।
राजनेत्यांची धावपळ
सुरू झाली ।

हुशार किती हे नेते
वाटे मतदार सारे मूर्ख ।
खरे खोटे सारेच ठाव
फेकतात काढून सारा अर्क ।

होळी यांची झाली सुरू
माखून जातील चिखलात सारे ।
इलेक्शन म्हणजे सावळा गोंधळ
भिनले अंगात वारे ।

बेशरमकीची करतील हद्द
जिवंतपणीच घालतील श्राद्ध ।
मान सन्मान तुडवत पायी
बरबटलेले सारेच दाखवतील शुद्ध ।

दगडास लावतील शेंदूर
टाकून तेल चपा चप ।
मांडून दगड होतील फरार
लुटतील देश मग झपा झप ।
Sanjay R.

” करू किती गुण गान “

कोमळ मनाचे पान
आहेस किती छान ।

घराची तू आन
तूच कुटुंबाची शान ।

सागरा इतके ज्ञान
कर्तृत्वात विज्ञान ।

आई ची माया
बहिणीची छाया ।

अर्धांगिनीचे आहे
तुजला किती भान ।

अंबा तू जगदंबा तू
देवतेचे तूच निशाण ।

झाशीची राणी तू
कृष्णाची राधा तू ।

विचारांची तू खाण ।
किर्ती तुझीच महान ।

रूप तुझे गं हजार
करू किती मी गुणगान ।

वंदन करतो तुज पूजितो
तूच आमुचा सन्मान ।
Sanjay R.

” एक नजर “

बस एक नजर
जब देखु तुझे ।
राहत दिलकी
तब होगी मुझे ।

तुम हो चांद
मै हु असमान ।
तुम एक सपना
और मै अरमान ।

है याद तुम्हारी
हर पल की आस ।
धडकती है अब
दिल की सास ।
Sanjay R.

” अशीच एक सायंकाळ “

अशीच एक सायंकाळ
पक्षी निघाले घराला ।
मावळतीच्या सूर्याने
तांबडे केले आकाशाला ।
हळूच डोकावून बघते रात्र
निमंत्रण गेले अंधाराला ।
चांदणी शोधते चंद्र
येईल कसा तो अमावसेला ।
हिरमुसली चांदणी मनात
उरलेत दिवस किती पौर्णिमेला ।
Sanjay R.