” आवाज “


मिलता है दिलको सुकुन
देखकर तस्वीर तुम्हारी ।
होती अगर साथ तो
सवरती जिंदगी हमारी ।

गुनगनाते कभी मनही मन
जब याद तुम्हारी आती ।
कवी तो हम है नही पर
नजाने कैसे कविता हो जाती ।

दिलकी बाते दिलही जाने
मोहब्बत कैसे होती ।
शायद दिलकी आवाज
तुम तक पहुच जाती ।
Sanjay R.

” घरटे सुखाचे “

देवु कसा मी ओ
तुझ्या आर्त हाकेला ।
मनाच्या खोलात तु
आहेस सदा साथीला ।

आठवणींच्या विश्वात
वीणले प्रीतीचे जाळे ।
भरुन आले बघ अंबर
ढग निळे काळे ।

साठला पूर आसवांचा
भिजले तयात डोळे ।
पुसाया शोधतो मी आता
उघड तुच ताळे ।

तुझ्या शिवाय नाही काही
माझा मीच म्हणायला ।
साथ मज तुझी हवी
घरटे सुखाचे विणायला ।
Sanjay R.

” आनंदानं झुलावं “

खुप वाटतं मला
डोळ्यात तुझ्या बघावं ।
चांदण्या रात्री छान
चंद्राखाली बसावं ।
अंतरात डोकाउन
हितगुज थोडं करावं ।
हास्यात गोड तुझ्या
खळखळुन हसावं ।
रातराणीच्या सुगंधात
विसरुन सारं रमावं ।
स्वप्नांच्या दुनियेतलं
सत्यात सारं जगावं ।
तुझ्या माझ्या प्रितीचं
फुल सुंदर उमलावं ।
वार्याच्या झुळकीसह
आनंदानं झुलावं ।
Sanjay R.

” हकिकत पुरी “


मेरे ख्वाबो की है
तु एक परी ।
कम कब होगी
हमारी यह दुरी ।
हातोमे हात हो
यही चाहत मेरी ।
वक्त तुही बता
कब होगी हकिकत पुरी ।
Sanjay R.

” बाते तस्वीरसे “


क्या कहु मै दिलसे
यादोमे तडपता ऐसे ।
आखेभी तरस गयी
मिलने उनकी हसीसे ।
दिन बीत गये कइ
मिल न पाये उनसे ।
वक्त अबतो रुक जा
झुमने दो खुशीसे ।
चाहत तो है बहोत
मिला दो बस उनसे ।
लब्ज इकठ्ठा कर रखे है
कह देंगे सब उनसे ।
हो न हो मुलाकात कही
तब होगी बाते तस्वीरसे ।
Sanjay R.

” विसरलो हसणं “


खरच का विसरलो
आम्ही हसणं ।
आपलसं केलय
तणावात असणं ।
प्रगतीच्या वाटेवर
का नुसतच जगणं ।
कपाळावर आठ्या
आणी विचारात फसणं ।
जगाच्या यादीत
कुठेच नसणं ।
चिंताच सार्या आणी
श्वास ढकलणं ।
कुठवर चालायचं
खोलात रुतणं ।
द्याना कोणी
हास्य उसणं ।
नाहीतर होइल
असुन नसणं ।
Sanjay R.

” वय म्हातारं “


तुटला संसार
मोडले घर ।
सारे जिवन
झाले अधर ।

पाणावलेले डोळे
झुकली नजर ।
त्राण सरले
मनात थरथर ।

टेकले हात
झुकले अंबर ।
वय वर्ष
झाले शंभर ।

जगलो वाचलो
कुणास कदर ।
नाही उरला
शेला पदर ।

नाती गोती
मायेची पाखरं ।
नको कुणालाच
घरात म्हातारं ।

इच्छाच सरल्या
नको वाटतं सारं ।
वेध लागले आता
जायचे वर ।
Sanjay R.

” प्रदक्षीणा विश्वाला “


अनंताच्या प्रवासात
सारेच आहेत सोबतीला ।
मार्ग क्रमण करता करता
टेकला रवी क्षितीजाला ।
सोपवुनी साम्राज्य चंद्रासी
चालला सुर्य अस्ताला ।
होइल रजनी सम्राज्ञी
चांदण्या तिच्या दिमतीला ।
खेळ स्वप्नांचा परत एकदा
होइल प्रदक्षीणा विश्वाला ।
Sanjay R.

” पाउस वारा “


रीम झीम रीम झीम
पावसाच्या धारा ।
सोबतीला आहे
सोसाट्याचा वारा ।
गडगडतं आभाळ
लखलखाट सारा ।
गव्हाच्या पिकाला
बसलाय मारा ।
शेकर्याची व्यथा
नाही उरणार थारा ।
Sanjay R.

” आभास “


हास्याची एक कोर
नजरेत तीर ।
मनात आहेस तु
झालो मी अधीर ।

असच असतं का
प्रेमाचं नातं ।
मनाच्या देव्हार्यात
जळती वातं ।

प्रेम आहे अनोखा
चमचमता तारा ।
मनास सुखावणारा
हलकाच वारा ।

प्रेम आहे श्वास
नाही नुसता भास ।
कोपर्यात मनाच्या
अखंड चाले ध्यास ।
Sanjay R.

” एक प्याला “

फासुन रंग चेहर्यावर
बरेच काल फिरत होते ।
ओळखीचे असुनही सारेच
अनोळखीच भासत होते ।
लाल पिवळ्या निऴ्या रंगात
सारे आनंदाने हसत होते ।
पिउन भांगेचा एक प्याला
कुणी फक्त रडत होते ।
Sanjay R.

” उजाड धरा “

तोच चंद्र तोच तारा
झोंझावत येणारा
वादळी वारा ।
सागराचा कधी
तर नदीचा किनारा ।
पक्षांची किलबील
सृष्टीचा नजारा ।
जिकडे तिकडे त्यात
माणसांचा पसारा ।
जशा ओसंडुन वाहणार्या
पावसाच्या धारा ।
सोबतीला जिवघेण्या
टप्पोर्या गारा ।
थकली भागली
उजाड धरा ।
थोडासा विचार
सारेच करा ।
संपलं हे सारं तर
काय असेल तर्हा ।
थांबवा पर्यावरणाशी
खेळणे जरा ।
Sanjay R.

” मन बेचैन “


बघुन तुला माझं सखे
का गं मन होतं बचैन ।
वाटत घ्याव तुला कवेत
नी टिपावा कणन कण ।

धडधडतं ह्रुदय माझं
श्वासही होतात मंद ।
आठवणीनही तुझ्या मी
स्वप्नात होतो बेधुंद ।

फिरवाचे बोट केसातुन
प्यायचा मधु ओठातुन ।
वाटतं संपुच नये ही रात्र
निघवत नाही मिठीतुन ।

फुलली बहरली रातराणी
दरवळलेलं सुगंधीत वारं ।
तु आणी मी दोघच आपण
व्हायचं एक विसरुन सारं ।
Sanjay R.

” माझे घर “


इमारती चढताहेत आकाशी वर
रहायला नाही आम्हा छोटेसे घर ।

तुटके फुटके नावाला छप्पर
भिजउन जाते पावसाची सर ।

नाहित भिंती झोपडी ही अधर
झुळकीनं वार्याच्या होते थर थर ।

दोन हात जागेत चललाय बसर
गरिबाच्या जगण्याची कुणास कदर ।

दिवस रात्र चालतो कष्टाचा नागर
तरी फाटकाच आहे साडीचा पदर ।

दोन हजार विस पर्यंत सार्यांना घर
लाउन बसलोय तिकडेच मी नजर
Sanjay R.

” आईचा तान्हा “


आईचं हेच मनोगत
मुलांसाठी काहिही ।
प्रेमापोटी करते सारे
अपेक्षाही मुळीच नाही ।

बाळ तिचा मोठ्ठा व्हावा
प्रभुचरणी एकच धावा ।
आनंदाने सोसते सारे
मनात नाही उजवा डावा ।

दिवसा मागुन दिवस जाता
मोठा होतो तिचा कान्हा ।
बळ पंखात येताच त्याचे
शोधते आई तिचा तान्हा ।
Sanjay R.

” जगत्दात्री मी “

” जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ”

कोण मी काय नाते तुजशी माझे
होउनी अर्धांगिणी जपते स्वप्न तुझे ।

कुणाची मी बहिण कुणाची माता
त्यागाची धरुनी मशाल जळते स्वताः ।

जगत्दात्री मी या धरेची गाथा
सोसते दुःख सारे पदरात व्यथा ।

आसवांच्या सागरातले मी कमळ
झेलुनी मार लाटांचा आहे अढळ ।
Sanjay R.

” चला चला जाउ “


चला चला आता
दुर दुर जाउ या ।
सोबत कवितेच्या
तिकडेच राहु या ।
गीत आनंदाचं
सोबत गाउ या ।
चादण्या रात्री
चंद्रात न्हाउ या ।
दुड दुड दुड दुड
हलकेच धाउ या ।
मिटुन डोळे हलकेच
स्वप्न मनीचे पाहु या ।
Sanjay R.