वेळ बघुन बदलायचे असतात रंग ।
काळानुरुप अनुसरायचे असतात ढंग ।
सांगुन जातो सरडाही खुप काही ।
अतीरेक केला माणसाने चढलाय आता जंग ।
Sanjay R.
Monthly Archives: May 2014
” बोका माझा लाडाचा “
काय हो काका
बघितला का तुम्ही माझा बोका ।
सक्काळी सक्काळी दुधात तोंड घातले
दिला मग जोरात एक चांगला ठोका ।
विचार आला मनात
पाळायचा कशाला असला धोका ।
दिला फेकुन मग
त्याचा झोपायचा खोका ।
टाॅमीच्या जिवावर उठला म्हणे आता
दिसला कुणाला तर त्यला तिथेच रोका ।
देउन पोलीसात
हळु हऴु ठोका ।
जिव माझा त्याच्यावर
लाडाचा माझा आहे तो बोका ।
Sanjay R.