” रिमझिम पाऊस “

रिमझिम झाला पाऊस
आनंदी आनंद झाला ।

वृक्ष वेली हर्षित सारे
रंग हिरवा धरतीला ।

गीत मधुर पक्षी गाती
रंग काळा आभाळाला ।

पेरणीची लगबग आता
अंकुर फुटतील शेताला ।

सरसर सरसर सरी येऊ दे
दे उधाण या उत्साहाला ।
Sanjay R.

” निघाली माऊलीची वारी “

निघाली पंढरपुरास
माऊलीची वारी ।
दुमदुमला आवाज मुखी
विठ्ठल विठ्ठल, जय हरी ।

नाद चिपळ्यांचा संगे
भगवी पताका खांद्यावरी ।
मनी भाव भक्तीचा
पावले पंढरीच्या वाटेवरी ।

ओढ लागली दर्शनाची
विठ्ठल उभा कर कटावरी ।
माय रुकमाई मागे उभी
लोटला जन इंद्रायणी तीरी ।

अवघा आनंद ओसंडला
विठ्ठलमय झाली पंढरी ।
विठ्ठल विठ्ठल, माझा विठ्ठल
दिसे मजला तो दिशा चारी ।

जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल ।
Sanjay R.

” होते सारेच धूसर “

वाट तुझी मी पहातो
रोजच तुझ्या वाटेवर ।

काटा घडयाळीचा थांबतो
मोजतो तू किती अंतरावर ।

वेळ होताच तुझ्या येण्याची
मनात होतो मग एक गजर ।

वाढते गती माझ्या श्वासांची
शोधते नजर तुज दूरवर ।

प्राण येतात मग कंठाशी
आणि होते सारेच धूसर ।
Sanjay R.

” छळतेस तू किती “

तू फुलातला सुगंध
दरवळतेस मंद मंद ।
होतो किती मी वेडा
आणी मन माझे बेधुंद ।

पाकळी तू फुलाची
कोमळ किती मनाची ।
वेडावते मला कशी
नजरा नजर क्षणाची ।

झुलते कशी वाऱ्यासह
थांबून मधेच खुणावते ।
बघतो मागे मी परतून
आठवणीत मन गुंतते ।

नवरंगी परिधान तुझा
भासे मज तू स्वप्नपरी ।
छळतेस मज किती तू
नजर भिरभिरते तुझ्यावरी ।
Sanjay R.

” मी ही तरलो “

थोडा हसलो
थोडा रडलो ।
बालपण माझे
आज विसरलो ।।

थोडा उठलो
थोडा पडलो ।
आई बाबा
संगे मी घडलो ।।

थोडा झुकलो
कधी हुकलो ।
समाजात या
खूप शिकलो ।।

कधी उपाशी
कधी तापाशी
झेलून सारे
आता उरलो ।।

जिद्द अजूनही
हद्द दूर ती ।
संग्राम सुरू हा
नाही हरलो ।

माणूस माणूस
जगतो मरतो
अनंतात या
मी ही तरलो ।
Sanjay R.

” बरसात “

झाली पावसाला सुरुवात
पण जास्त सुर्याचीच बरसात ।

लोट घामाचे कसे वाहतात
अस्वस्थ होतो दमट वातावरणात ।

भिजव रे तूच आता पावसा
करू नकोस असा तू आघात ।

वाट बघते छत्री अजूनही
होईल कधी पावसाळी प्रभात ।
Sanjay R.

” वृक्ष तोडीचे बंड “

झाला थोडा पाऊस
हवा झाली थंड ।
ढगा आडून सूर्य म्हणतो
आहे मी अजून इथेच
भरावा लागेल दंड ।
पाऊस यायला बघा
ढग हवेत अखंड ।
वारा आहेच कुठे
पुकारलं ना तुम्हीच
वृक्ष तोडीच बंड ।
झेला आता परिणाम
नुकसान तुमचेच प्रचंड ।
Sanjay R.

” आयुष्य तुझे रे पोळपाट “

नेहमीचेच झाले आता
लागते पेरणीची विल्हेवाट ।

झलक थोडी दाखवतो
पाहायला लावतो वाट ।

काय सांगावा कसा हा
मोसमी वाऱ्यांचा थाट ।

निळे निळे आभाळ सारे
ढग काळे लावतात काट ।

खिसा होतो रिकामा सारा
जीवनालाच लागलंय नाट ।

सांग बळी झेलतो कसा
आयुष्य तुझे रे पोळपाट ।

आशेवरच जगतोस तू
कधी उगवेल सुंदर पहाट ।
Sanjay R.

” पहिला पाऊस “

पहिल्या पावसाचे आज
थेंब चार बघा पडले ।
रस्ता अंगण झाले ओले
ढगही थोडे गडगडले ।

गन्ध मातीचा सुटला
वारा बेधुंद झाला ।
समोरच घोळका मुलांचा
आनंदी कसा झाला ।

सळसळ झाली पानांची
वृक्ष लागले डोलाया ।
बरस रे अजून पावसा
मन मोर लागले नाचाया ।
Sanjay R.

” योग डे “

आहे आज योगा डे
शरीर करायचं मागे पुढे ।

स्वस्थ शरीर , मन स्वस्थ
बघायचं थोडं स्वतः कडे ।

एकच दिवस पुरेल का
वेळच कुठे कोणा कडे ।

जगलो वाचलो चिंता नाही
पैसे मोजायचे डॉक्टर कडे ।

देव आठवायचे बेड वर
वाट दिसते मग मरणाकडे ।

नाही होणार एक दिवसात
रोज करायचा योगा पुढे ।

स्वस्थ शरीर मन निरोगी
चला करू या मागे पुढे ।
Sanjay R.

” बाप “

माय माझे जीवन
बाप जीवनाचा आधार ।
राबतो घरासाठी
उचलतो सगळाच भार ।

माय लोण्याचा गोळा
बाप कठोर वाटे फार ।
झिजवी देह सारा
घराला कष्ट त्याचे अपार ।

होता तान्हुला बिमार
मायेला लागे आसवांची धार ।
ठेऊन दगड छातीवर
बाप निभवी सारे आचार ।

प्रसंग येता कसा कसा
बाप करी संकटाशी हात चार ।
आच हृदयात त्याच्या
परी चेहरा त्याचा निर्विकार ।

येता वादळ किती कशाचे
होई उभा तो होऊन दार ।
झाड वडाचे जसे तो
सांभाळी आपुला परिवार ।
Sanjay R.

” Shadow “

If you need me,
See in your heart….

I was there…If I need you,
I will close
my eyes….
And you are
in front of me….

Really its beautiful
thing in between
You n Me…..

Love you
my shadow……
Sanjay R.

” काय ठाव “

कुणास ठाऊक
कोणाला काय ठाव ।

विचारलं काही तर
खातात किती भाव ।

नका जाऊ उन्हात
नाहीतर लागेल झाव ।

बिघडली तब्येत तर
सगळीच काव काव ।

घ्यावी लागेल मग
डॉक्टर कडे धाव ।

खिशाला चंदन
काळजाला घाव ।
Sanjay R.

” लय तपुन रायलं “

लय तपुन रायल बा
दिसभर आज ।

घामानं भिजलो अन
गेला मुखवरचा साज ।

पेउन कच्च्या आंब्याचं पनं
व्हाच थंड गार आज ।

उनिमंदी फिराची बावा
हाये मलेच खाज ।

काया कुताड पल्लो
आता यते मले लाज ।

येऊ दे ना आता पानी
पावसामन्दिच हाये
निसर्गाच राज ।
Sanjay R.

” कुचिन “

जिकडं पहाव तिकडं
कुचिन लोकायचं कारस्थान ।

आपलीच करतेत जीद
आन मांडतेत आपलं बस्तान ।

शेंडा ना बुड त्यायले
मंग घेते आपलं करून नुसकान ।

लेक मऱ्हाटी माय वर्हाडी
लेका उलीसा करना तिचा सन्मान ।
Sanjay R.

” बरस बरस रे मेघा तू “

झालेत दिवस किती
तापतो सूर्य अजून ।
रोजच घेतो आम्ही
घामात चिंब भिजून ।

सरले दिवस तुझे रे
का अजून तू तळपतो ।
सारून आभाळ दूर
एकटाच असा मिरवतो ।

या ढगांनो तुम्ही या
पावसास थोडे बरसू द्या ।
सुगन्ध या मातीचा
चहुओर थोडा पसरू द्या ।

तहानला हा निसर्ग सारा
हिरवळ ही सुकून गेली ।
बरस बरस रे मेघा तू
होऊ दे सारी धरा ओली ।
Sanjay R.

” गीत सुरांचे “

मुरली वाजे राधा नाचे
मन बेधुंद गीत सुरांचे ।

सळसळ वारा मधुर धारा
फुलून गेला निसर्ग सारा ।

मन मोहक कृष्ण सावळा
मुग्ध राधा रंग वेगळा ।

सुरांची ती मैफिल सजली
कृष्णा सांगे राधा भिजली ।
Sanjay R.

” राधा “

सूर बासरीचे पडता कानी
अधीर होते राधा मनी ।

शोधत निघते यमुना तीरी
प्रेमात पडते राधा गोरी ।

सखा सावळा राधेचा हट्ट
नाते दोघातले किती घट्ट ।

राधे विना कृष्ण कसा तो
राधेसाठी बासरी गातो ।
Sanjay R.

” राधा “

सूर बासरीचे पडता कानी
अधीर होते राधा मनी ।

शोधात निघते यमुनातीरी
प्रेमात पडते राधा गोरी ।

सखा सावळा राधेचा हट्ट
नाते दोघातले किती घट्ट ।

राधे विना कृष्ण कसा तो
राधे साठी बासरी गातो ।
Sanjay R.