गरीब बिच्चारा रावण
जळायला झाला तय्यार
ईतिहासाची फळं भोगतो
बदललेत आता आचार
माणसं झालेत रावण आता
पुरूषोत्तमचाही आला नकार
सीता माता उरली कुठे
पसरला चोहिकडे फक्त विकार
दशासनाचे दहाच अवगुण
माणसात आले सारेच प्रकार
राक्षस हरला देव सरला
पृथ्वीतलावर नुसता विखार
Sanjay R.
Monthly Archives: September 2017
” अंतरंग “
” रेशीम गाठी “
” जीवन सागराच्या लाटा “
” अंबा तु जगदंबा “
तूच दुर्गा तू पार्वती
देवी तू तर आदी शक्ती ।
तूच ब्रम्हांड तुच सृष्टी
चरा चरात या तुझीच शक्ती ।
तुच माता तुच भक्ती
तुच आहेस शिवाची शक्ती ।
शांती रुपेण तु कधी काली
दुष्ट नाशीणी देसी मुक्ती ।
ज्ञान विद्या तु आहे भगवती
तुझीच गाथा तुज पुजिती ।
अंबा तु जगदंबाही तु
जगत जननी आहेस विधाती ।
भक्ती शक्ती तु आदि माया
चरणी तुझिया अर्पितो काया ।
Sanjay R.
” माणुसकी “
माणसांनीच लावायचं
माणसाचं झाड ।
माणसांनीच माणसांना
म्हणायचं ते पाड ।
कशाला हवेत
फाजिल असले लाड ।
उपटुन टाका दुनिया सारी
आली अंगात राक्षसी धाड ।
सरली माणुसकी उरला
दगडांचा नुसता पहाड ।
भावनांचा ओलावा
कुठे उरला काही ।
रक्तपात व्याभीचार
पसरला दिशा दाही ।
नाती गोती सारेच सरले
पैसाच आता सर्व काही ।
Sanjay R.
कोन पराया
शाम शाम
ओठी प्रभुचे नाम
मनात शाम शाम ।
मनमोहना तुज विण
जिवा नको विश्राम ।
तुझ्या भक्तीची आस
घेउ कसा आराम ।
रंगले नामात तुझ्या
चरणी तुझ्या दे विराम ।
कन्हैय्या तु राधेचा
मी मीरा तु शाम शाम ।
Sanjay R.