कीती रे बघायची वाट तुझी
कासेवीस होतो जीव आता ।
सार्यांनाच लागली आस तुझी
भिजउनी शांत कर मन आता ।
Sanjay R.
फुलांनी करु या स्वागत
तुझ्या माझ्या मैत्रीचे ।
खुप बरस रे पावसा
काम नाही आता छत्रीचे ।
Sanjay R.
” सवय “
नियम तर आहेत सारे ।
पालन त्यांचे होत नाही ।
सवयच अशी जडली ।
शिक्षेच मुळीच भय नाही ।
Sanjay R.
” नको रे धाडु तु आम्हा व्रुद्धाश्रमी ”
नको रे धाडु तु आम्हा व्रुद्धाश्रमी
माया का दीली तुज आम्ही कमी ।
आहेस तु आमच्या पोटचा गोळा
विचार कसा आला असला खुळा ।
कीती रात्री जागल्या आमही त्या काळ्या
बाबांची कष्ट कसा विसरलास रे बाळ्या ।
प्रेमळ तुझ मन का झाल इतक कठोर
थकलो रे आम्ही आता नको होउ निष्ठुर ।
मोठा तु झालास आणी खुप हो मोठा
नशीबच खोट आमच पैसाही खोटा ।
Sanjay R.
” मीस “
मुलं मोठ्यांना कीती मीस करतात ।
थोड दुर होताच खुप रडतात ।
मोठी होताच मात्र स्वता:च दुर होतात ।
आईबाबांना आपल्या त्रास देउन रडवतात ।
Sanjay R.
देउनी जन्म त्यांना
अभागी झालो स्वता: ।
फुलवला जन्म त्यांचा
मरण देताहेत आता ।
sanjay R.
कर्म धर्म संयोगाने
शिकलो आम्ही
जिवनाचा मर्म ।
क्रुतीत आणता आणता
मात्र किती कसे
झालो आम्ही बेशर्म ।
sanjay R.
आभाळ गरजले
विज कडाडली ।
कायरे पावसा
चिंता कीती तु
आम्हा लावीली ।
गरीब श्रीमंत
व्याकळ झाले ।
तुजवीण जिवन
कैसे चाले ।
Sanjay R.
चला जाउ पंढरीला
विठोबाच्या दर्शनाला ।
घोश करु या नामाचा
टाळ म्रुदंग संगतीला ।
झंडे पताके घेउ हाती
हाक देउ चंद्रभागेला ।
हरपली आता तहान भुक
हरी माझा मदतीला ।
विसावत नाही पाय
उचलुन धरीले पालखीला ।
जय जय विठ्ठल
श्री हरी विठ्ठल ।
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल ।
Sanjay R.
कमरेवरी ठेउनी हात
वाट पाहतो विठु माझा ।
वारीसंगे निघालो आता
आनंद कुठे ठेउ माझा ।
Sanjay R.
पत्नीचा आदेश
आणी पती होतो प्रगट ।
होइ पालन आदेशाचे
मग फेरी होइल कशी उलट ।
Sanjay R.
कसा कीती रे तु
छळणार मला ।
मनाची व्यथा कशी
कळणार तुला ।
बंदीस्त काटेरी
कुंपणात मी ।
आसव पुसायचे
सांगु कुणाला ।
Sanjay R.
No hi
No bye
Thoes who try
I do reply ……..
No why
No tie
Just observe
No where sky …..
Every thing here
Hi-Fi Hi-Fi……
Sanjay R.
मैत्री वर तर सारेच बोलतात ।
लिहायच म्हटल तर छान लिहीतात ।
करायच म्हटल तर मात्र सारे
एक पाय पुढ घेउन माग सरतात ।
अशीच असावी कदाचीत मैत्री
थोड दुखावताच खुप रागावतात ।
Sanjay R.
वैतागलो आता उन्हाला
येउदे आता पावसाला ।
घामाच्या धारांत पुर्ण भिजलो ।
सुर्याच्या वणव्यात खुप शिजलो ।
स्वप्नात पावसाला घेउन निजलो
ढगांच्या गर्दीत सुर्यच विसरलो ।
सर पावसाची बघा घेउन आलो
धरेला घेउन चिंब भीजालो ।
Sanjay R.
गोड आंबट चविची
असतात ना संत्र ।
जिवनातही लागु होइ
असाच एक मंत्र ।
सुख आणी दुखिःचे
अनुभवायचे एक तंत्र ।
Sanjay R.
काट्या कुट्यतुन जाइ एक वाट
तिथे असे भरले दुखाःचे ताट ।
कोमळ सुगंधी मनमोहक फुलांची वाट
भरभरुन वाहे तेथे सर्व सुखाचे पाट ।
दुखाःतही सुख लाभे अशीही एक वाट
सुगंधीत होइ जिवन असा तिथला थाट ।
Sanjay R.
दौंश करी कठोर काटा
फुलांच्या कोमल वाटा ।
जाणु या अर्थ यातुनी
जिवनाच्या या दोन वाटा ।
Sanjay R.
कोमळ फुलांची वाट धरायची
परीक्रमा जिवनाची पुर्ण करायची ।
सुख दुखाःची हंडी पुर्ण भरायची
मुक्त ता त्यातुन नाही कुणाची ।
Sanjay R.