सहजच उलगडता आयुष्याची पाने
आज का कसे आठवण देऊन गेले ।
जन्मापासूनचा तो इतिहास पहा
ते दिवसच कुठे हरवून गेले ।
मातीच्या भिंती त्याला कवलांचे छत
घर म्हणायचो ज्याला ते पडूनच गेले ।
अंगणात असायची बाग आणी बागेत फुलं
परसातली तुळसही सूकूनच गेली ।
गडबड गोंधळ, चाले मुलांचा कल्लोळ
सगळीकडे आता शांत शांत झाले ।
कंचे विटी दांडू धापाधुपी लपाछपी
कसे किती ते खेळ सारे लुप्त झाले ।
आपल्याच धुंदीत डोळे फोडून बघा आता
मोबाईल साऱ्यांच्या हाती आले ।
ऊन थंडी पाऊस वारा नी वेचायच्या गारा
बसल्या जागेवर आता शीण येतो सारा ।
अंतर असो कितीही पायी पायी चालायचे
लपून छापून कधी सायकलवर बसायचे ।
गॅस कुकर पंखा एसी बसायला सोफा
नव्हते यातले काहीच, पाटावरच बसायचे ।
दंगा मस्ती, गप्पा गोष्टी, आनंद सारा
सारेच कसे मोठमोठ्याने हसायचे ।
बालविहार गीतमाला रेडिओ आकाशवाणी
आरामात बसून कान लावून ऐकायचे ।
सारच संपलं आता, गेले जुने दिवस
सांगेल का कोणी काय आता सरस ।
Sanjay R.
