” गजरा “

” स्मीत हास्य ”
नावात तुझ्या हास्य
गालात तुझ्या हास्य
शोधतो मलाच मी
मलाही दे हास्य ।
Sanjay R.

“याद आती मुझे ”

याद तो रोज आती है ।
मुलाकात कहा होती है ।
हम बिझी आप बिझी ।
यही बात होती है ।
Sanjay R.

” गजरा ”

केसात तुझ्या गजरा
दिसतो किती साजरा
दरवळला दुर सुगंध
भाव चेहर्यावर लाजरा ।
Sanjay R.

” झालो मी बंदी “


काय तुझी अदा
मनात तुच सदा ।
गालावर हात
तुझी माझी साथ ।
ओठांची लाली
परी गीत गाली ।
काळे तुझे डोळे
आभास आगळे ।
नजरेत ओढ
रुप तुझे गोड ।
भुरळ मनाला
सांगु कुणाला ।
विचार तुझाच
माझीया मनात ।
लागली धुंदी
झालो मी बंदी ।
Sanjay R.

” सौंदर्य ज्योती “


नाकात नथनी
केसात गजरा ।
वाटे डोइवरी
फुलला मोगरा ।
कोर काजळाची
नजर खाली ।
गालांना शोभे
ओठांची लाली ।
कपाळी बिंदी
गळ्यात मोती ।
रुपानं खुलली
सौंदर्य ज्योती ।
Sanjay R.

” काम काम काम “

हात धरुन पाठीमागे
लागलय काम ।
बसल्या बसल्याच
कसा निघतो घाम ।
मनात विचारांचा
लागलाय जाम ।
श्वास घ्यायलाही
नाही फुरसत
जिवाचा होतो बाॅम ।
जाउ दे फुटु दे एकदाचा
होइल सुम साम ।
Sanjay R.

” श्वास का ठेचाळला “


येताच आठवण तुझी
लागते मज उचकी
शब्द नी शब्द आठवतो
नी ह्रुदयास लागते टिचकी ।

स्वप्न झालेत ते दिवस
मनात माझ्या मी केले नवस ।
हवे मज तुझे एक हास्य
वाटेल मला मी गाठलाय कळस ।

कानास आहे ओढ माझ्या
तुझ्याच एक शब्दाची ।
नेत्रांनाही आहे आस
झलक तुझ्या असण्याची ।

शोधण्या मी अस्तीत्व तुझे
एकेक कोपरा धुंडाळला ।
आहेस तु ह्रुदयात माझ्या
प्रत्येक श्वास का ठेचाळला ।
Sanjay R.

” ह्रुदयाचे दार “


वाढली कशी थर थर
पडतोय थंडीचा मार ।
वाटे रात्र महा कठीण
तरीही उघडे ह्रुदयाचे दार ।
दुर असे मिणमीणती पणती
वाटे मनास तिचाच आधार ।
विचारांची होताच गर्दी
ह्रुदयात पेटतो विखार ।
Sanjay R.

” मनातला बंध “

अजुनही याद आहे मज
तुझा तो पहीला स्पर्श ।

केसात माळला गजरा त्या
बहरलेल्या मोगर्याचा गंध ।

उत्सव आकाशी तारकांचा
हलका गारवा नी मन बेधुंद ।

शोधतो अजुनही ती रात्र
आणी मनात गुंफलेला बंध ।
Sanjay R.

” माझे आई “

जगती थोर
माझी आई ।
गीत गाते
गोड अंगाई ।
निज रे बाळा
गाई गाई ।
कवेतले तान्हुले
झोपी जाई ।
ममता तीची
तिच्याच ठाई ।
प्रेम वात्सल्य
माझे आई ।
Sanjay R.

” रात्र अंधारी “

फुटता पहाटेचे तांबडे
वाट काळोखाची लागली ।
सुर्य येता डोइवर
लपे पायाखाली सावली ।
रात्र होताच अंधारी
येती चांदण्या जागली ।
चंद्र कधी सोबतीला
कधी नुसत्याच मशाली ।
हौस चांदणीची पुनवेला
चंद्रा सवे ती भागली ।
Sanhay R.

” नोटा झाल्या दफा “


नोट हजार पाचशेची
झाली दफा ।
बातमी ऐकुन सारेच
टाकताहेत धापा ।
काळ्या पैशान कशा
उडवल्या झोपा ।
गरीब श्रीमंत मारताहेत
बॅकेच्या खेपा ।
बाजार मंदावला
रुसला नफा ।
रुपयाही झाला महाग
खिसा झाला सफा ।
कुणी सांगा सरकारला
कमी पडतोय ताफा ।
Sanjay R.

” दिलकी कश्ती “

कब उनसे
मुलाकात होगी ।
लब्ज दो चार
पर बात होगी ।
हो किस्मत तो
जिंदगी साथ होगी ।
वरना दिलमे
वही याद होगी ।
निकले जब
अरमानोकी कश्ती
सवार उसमे
दिलकी आहत होगी ।
Sanjay R.

” मनातलं गुज “


कुणास ठाउक का
वाटतं मला असच
खुप तुझ्याशी बोलावं ।
मनातलं गुज माझ्या
न सांगता तुला कळावं ।
दुर त्या आकाशात
घेउन हातात हात
सोबत तुझ्या पळावं ।
कधी मी तुला तर
कधी तु मला
हलकेच थोडं छळावं ।
घालवुन मग राग
मनानं प्रेमात वळावं ।
Sanjay R.

” रजईची सोबत “


अशी ही सायंकाळ
आली घेउन गारवा ।
हवीशी वाटे उब
निशेला थोडे थांबवा ।
रजईची सोबत बघा
देइ मायेचा ओलावा ।
येयील घेउन स्वप्नांना
कळी आनंदाची खुलवा ।
Sanjay R.

” देइल का कोणी परत बालपण “


मोठा इतका मी झालो बघा
हरवले माझे ते बालपण ।
वर्षा मागुन गेली वर्ष
नाहीच उरलं काही पण ।
केव्हा सरलं कळलच नाही
हसणं खेळणं रुसणं रागावणं ।
आईचे लाड बाबांचा राग
शाळेची मस्ती मास्तरांची धास्ती ।
कधी अभ्यास टिफीन खास
मित्रांची मैत्री तर कधी कुस्ती ।
नको नको ते सारे करायचे
लपुन छपुन सिनेमे बघायचे ।
काढायची कधी मुलींची छेड
कधी मनाला लागायचे वेड ।
संपले सारे उरल्या आठवणी
बालपण परत देइल का कोणी ।
Sanjay R.

” रुप तुझे “


मोकळे केस तुझे
वेडावतात मज ।
डोळ्यातला भाव
करी बेधुंद मज ।
गोड गुलाबी ओठ
हवे हवे वाटे मज ।
बघुन रुप तुझे
तुझाच व्हायचे मज ।
Sanjay R.

” निवांत “


नाही मजला ठाव
झालेत कीती सांगु
मनावर माझ्या घाव ।
नको वाटतं सारं
दुर त्या काठावर
उभी जशी एक नाव ।
चिंतेचे सावट मनी
दिसेलका माझा गाव ।
आठवणींचा उभार
काढ डोहातुन मज
देवा तु तरी पाव ।
नको आता एकांत
मन झाले अशांत ।
आहे एकच खंत
नको संपवु सारे
कर मज निवांत ।
Sanjay R.

” जिवन धारा “

कुणास मिळतो उबदार वारा
तर कुणी झेलतो थंडीचा मारा ।
कसा हा सारा जिवनाचा फेरा
नशीबाशी जुळते जिवनाची धारा ।
Sanjay R.

” हास्य “

बघुन हास्य तुझे
मीही हसलो गालात ।
गुरफटलो तुझ्यात इतका
ठेवले तुज ह्रुदयात ।
जडला छंद मज आता
नाही उरलो कशात ।
भिरभीरते नजर ही अशी
शोधतो मी मज तुझ्यात ।
Sanjay R.

” फुलली सकाळ “


नाकात नथनी
गळ्यात माळ ।
बाजुबंध तुझे
फुलली सकाळ ।

कपाळी बींदी
केसात गजरा ।
चेहर्यावर भाव
वाटतो लाजरा ।

चंद्रकोर कपाळी
हास्य मनोहारी ।
खुलले तुझे रुप
शालुत भरजरी ।
Sanjay R.