मी माझे नाव

चरित्र नसलेला मी
देऊ कशाचे नाव ।
माणुसकी नसलेला
आहे माझा गाव ।

प्रेम आपुलकी माया
शब्दच कुठे ठाव ।
स्वार्थ मोह मत्सर
सोबती माझे राव ।

पैश्यासाठीच जगतो
तीच मला हाव ।
पळत असतो सारखा
थांबत नाही धाव ।

पैसा पैसा करतो
देवा मला पाव ।
पैश्यानेच मिळेल ना
मला माझे नाव ।
Sanjay R.

सहजच तुटतात धागे

मनाचे काय मी सांगू
सहजच तुटतात धागे ।
शिवायचं म्हटलं तर
विचार ओढतात मागे ।
आठवणींचा सार तिथे
क्षणात होतात जागे ।
होऊन अश्रू ओघळती
शब्द हृदयास लागे ।
Sanjay R.

ती एक रहस्य

रोजच असते ना सोबत
चाललो मी जरी किती ।

काळोखात थोडी विसावते
उजेडाची नाही भीती ।

कधी होते लांबच लांब
होते कधी खूपच छोटी ।

रहस्य मज उलगडे ना
मजवर का ती करते प्रीती ।

सावली ती माझीच अशी
सदा असतो हात हाती ।
Sanjay R.

इंद्रधनुष्य

सारखे बदलतात रंग
वाटे जणू इंद्र धनुष्य ।
सुख दुःखाच्या वाटेवर
नाही एकटा मी मनुष्य ।
यात्रा चाले ही अविरत
बघतो अनेकानेक दृश्य ।
डोळ्यात जरी आसवे
ठेवितो मुखावर हास्य ।
Sanjay R.

कल्पना

कल्पनेच्या या जगात
कुठे कशाचे अस्तित्व ।
स्वतःलाच जातो विसरून
जपतो नसलेल्याचे महत्व ।
Sanjay R.

तुटता तारा

आकाशात तुटतो तारा
मिळतो कशाचा इशारा ।

सुख असो वा असो दुःख
मिळेना मनास सहारा ।

येता जीवनात वादळ
डोळ्यास फुटतात धारा ।
Sanjay R.

राजा शिवाजी

मावळ्यांचा तू सखा
तू मराठ्यांचा राजा ।

मावली तुझी जिजाई
धान्य ती तुझी आई ।

हिंदवी स्वराज्य स्थापिले
कित्येक खान लोळविले ।

स्वप्न तुझे ते सुराज्याचे
आहेत आता खांदे आमुचे ।

संजय रोंघे

डोळ्यात दिसे आसवं

चेहरा केविलवाणा
डोळ्यात दिसे आसवं ।
हृदयात माया ममता
म्हणू कसे मी ते फसवं ।

होऊन अस्वस्थ जरासा
शोधला त्यात मी अर्थ ।
नाही कळले मलाही
होता लपलेला स्वार्थ ।

बघून मजला तो हळवा
हळूच हसला मनात ।
देऊनी हात मी तयास
फसलो कसा रे गुन्ह्यात ।

विश्वासाचे भूत कसे ते
डोक्यात अजूनही नाचते ।
व्यर्थ चिंता या मनाची
का बघून मलाच हसते ।
Sanjay R.

ते दिवस जुने

येतील का परत
ते दिवस जुने ।
मित्रांशीवाय बघा
वाटते किती सुने ।

शाळा कॉलेजमधली
आठवते ती मस्ती ।
कामाच्या व्यापात
चढली आहे सुस्ती ।

मेहनत दगदग हो
किती करायची ।
उरलेच दिवस किती
तयारी करा मरायची ।

तरी एकदा वाटते
जगावे ते दिवस ।
सांग ना देवा तुला
करू कशाचा नवस ।
Sanjay R.

कसे हे स्वप्न

बघू काय कसे मी स्वप्न
विसरलो मनास जपणं ।

आशा आता मावळल्या
नशीबातच आहे खपणं ।

नाही गालावर हास्य
डोळे पुसतच रडणं  ।

नाहीं आधार कशाचा
ठाव मजला पडणं ।

नाही दिवस नाही रात्र
काय कसं हे जगणं ।

नशिबाचा फेरा सारा
कधी येईल ते मरण ।
Sanjay R.

ब्रेक अप

सम्या अरे चलतो का, तहसील ऑफिसला बाबांचं थोडं काम आहे, अर्धा एक तास लागेल बघ. लवकर जाऊ आणि लवकर परत येऊ .

अरे यार विक्या नको,  मला यार आज खूप काम आहे, ये ना तूच जाऊन. नाहीतर तुझ्या कामात माझं काम राहूनच जाईल. ये तूच जाऊन. चल मी येतोच.

ओके चल बाय म्हणून विकास बाबांच्या कामाला एकटाच तहसील ऑफिसला पोचला. बाबू जागेवर नव्हते, आजूबाजूला विचारले तर कळले की बाबू साहेबांकडे गेले आहेत, साहेबांची मीटिंग  सुरू आहे, किमान एक तास तरी लागेल. काय करावे हा विचार करत विकास ऑफिसच्या बाहेर आला. वेळ काढायचा म्हणून इकडे तिकडे बघत बसला. वेळ निघता निघत नव्हता.

इतक्यात त्याच्या समोरून समीर चे वडील त्याला जाताना दिसले. म्हातारपणामुळे त्याना चालणे पण कठीण होत होते. कसे तरी थांबत थांबत ते पुढे जात होते. त्यांची ती अवस्था बघून विकास खूपच अस्वस्थ झाला. त्याला राहवले नाही आणि तो सरळ त्यांच्या जवळ पोचला. त्याने त्यांना नमस्कार केला.

” नमस्कार काका, मी मदत करू का तुम्हाला ” म्हणत त्याने त्यांना आधार दिला.
काका कसे आहात म्हणत तो काकांना धरून त्याना आधार देत चालू लागला, तसे ते म्हणाले, ” काय रे विकास इकडे कुठे आलास ?”
“काही नाही काका बाबांचे काम होते, म्हटलं मीच करून येतो,म्हणून आलो होतो बघा”
पण बाबू मीटिंग मध्ये आहेत तर त्यांची वाट बघतोय”.

त्यावर काका म्हणाले अरे हो का, मला पण मग त्याच बाबुकडे काम आहे. मग आता वाट बघवीलागेल तर. चल मग तिकडे त्या ओट्यावर बसू या, म्हणत त्यानी आपली चालण्याची दिशा बदलली. दोघेही मग ओट्यावर बराच वेळ बसून राहिले.

मधेच काकांना काही आठवले, तसे ते म्हणाले “अरे विकास आज तर कॉलेजला तुमचे काही प्रोजेक्ट चे काम होते ना, मग तू नाही गेलास का,समीर तर सकाळीच गेला आहे. त्याला मी माझ्या कामात मदत करायला बोललो तर तो कॉलेजचे महत्त्वाचे काम आहे म्हणून म्हणत होता. तुम्ही दोघेही तर सोबतच आहात ना, मग तुला नव्हते का ते काम.”

तसे विकासाच्या लक्षात आले की समीर घरी खोटे बोलला, त्याला वडिलांना मदत करायची नसेल म्हणून तो काहीतरी कारण सांगून बाहेर भटकत असावा.

समीरच्या या वागणुकीचे विकासाला खुप वाईट वाटले. पण त्याने समीर वाडीलांपुढे खोटा पधु नये म्हणून त्यांना म्हणाला, ” काका माझे पण काम समीरच करतोय. बाकी मी इथून गेल्या नंतर करील त्यामुळे मी इथे येऊ शकलो. नाहीतर मला पण येता आले नसते. “

तरीही समीरचे वडील काय समजायचे ते समजले. ते विकासाच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले. “खरच मुलगा असावा तर तुझ्या सारखा. किती काळजी करतोस रे तू तुझ्या बाबांची. “
“खूप छान .”

नंतर थोड्याच वेळात ते बाबू मीटिंग आटोपून आले. विकासने आपले आणि काकांचे पेपर त्यांच्याकडे देऊन काम पूर्ण केले. आणि मग त्यानेच आपल्या गाडीवर बसवून काकांना त्यांच्या घरी पोचवले.

काकांना विकासाचे ते वागणे खूप आवडले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला,
” खरच रे बाबा विकास , तू तुझ्या आयुष्यात खूप मोठा व्यक्ती होशील .”

विकास काकांना सोडून घरी परत आला. त्याने घडलेला प्रसंग आपल्या बाबांना सांगितला. त्याच्या बाबांना पण आपल्या मुलाच्या अभिमान वाटला.

सायंकाळी अचानक विकास आणि समीरची भेट झाली तर समीर एकदम विकासावर भडकला,  म्हणाला
” तू माझ्या बाबांना का भेटलास, ते त्यांचे काम करत होते ना, तू कशाला मध्ये लुडबुड केलीस.”
” माझी सम्पूर्ण इमेज घालवलीस. “
” यापुढे माझ्या कुठल्याही गोष्टीत तू ढवळाढवळ केलेली मला खपणार नाही.”
” मी माझे बघून घेईल तुझ्या कुठल्याच मदतीची मला गरज नाही.”
” आणि माझ्या घरच्यांना पण तू मदत केलेली मला बिलकुल नको आहे.”
” या पुढे माझ्याशी कधीच बोलू नकोस.”
म्हणत समीर तिथून रागा रागाने निघून गेला .

विकासने समीरला खूप समजविण्याचा प्रयत्न केला परंतु, समीर काहीच समजून घेण्यास तयार नव्हता. अशातच दोघांचा दुरावा वाढला.

आणि दोघांच्या मैत्रीचा आज असा अचानक ब्रेक अप झाला.

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल – 8380074730

कातरवेळ ही झाली

चल जाऊ परत घरट्याला
कातरवेळ ही झाली ।
वाट पाहते बाळ तानुले
दूर किती मी आली ।

थकला असेल ना सूर्य किती
गालावर दिसते लाली ।
लगबग लगबग दिसते सारी
कोण इथे ग खाली ।

पक्षांचा चिवचिवाट सांगतो
हास्य उमलले गाली ।
संथ झाला झुळझुळ वारा
चिंता रात्रीची भाली ।

चंद्र बघतो डोकावून तो
नटून चंदणी आली ।
चमचम करते सारे आकाश
रजनी काळोख ल्याली ।

संजय रोंघे
मोबाईल- 8380074730

चंद्रा कथा संग्रह प्रकाशित

https://shopizen.app.link/iBXenYW0mnb

माझा कथासंग्रह शॉपिज़न. इन वर हार्डकव्हर रूपात प्रकाशित करण्यात आला आहे. आपण शॉपिज़न एप किंवा वेबसाइटवर वरून ऑर्डर करू शकता

शॉपिज़न एप डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.shopizen

शॉपिज़न वेबसाइट
http://www.shopizen.in

कथा सासू सुनेची

कथा आहे ही सासू आणि सुनेची .

सुन होते सासू किती ती गुणाची.

नवी नवखी सून येते जेव्हा घरात . भीत भीत टाकते पाऊल  भीती तिला कुणाची .

सगळेच असते नवीन , कल्पना कुणाच्या स्वभावाची.

नवरा वागेल कसा चिंता त्याच्या मनाची.

सासू, सासरे, दिर, ननंद मर्जी सांभाळायची साऱ्यांची.

सासू असते तापट, बोलायला थोडी तिखट, ननंद तर नेहमीच तुरट.

सासरा असतो थोडाच गोड, दिर म्हणजे माथे फोड ,घरच किती खारट.

नवऱ्याच्या स्वभावाचा लागेना अंदाज, बोलतो किती गोड,

दाखवी कधी भीती, कधी घालतो मोड.

म्हणतो मग मधेच, जिथली गोष्ट तिथेच तू सोड.

स्वतःकडे बघ जरा, झालीस किती रोड.

कधी म्हणतो सिनेमाला जाऊ, तिकडेच जाऊन आईस्क्रीम खाऊ. जेवण करूनच मग घरी परत येऊ.

गोष्ट कळते सासूला.  तिचा चढतो पारा.

धुसफूस धुसफूस होते सुरू, ननंद घालते मग हळूच वारा.

दिर म्हणतो चिंता मिटली . सोबत येतो मी पण, चला लवकर लवकर आवरा.

नणंद दिर सासू सासरे सारेच जातात सीनेमाला.

आईस्क्रीम कुठे जेवण कुठे. लागते तीच मग परत येऊन कामाला.

नसते कोणी मदतीला, धावपळ होते जीवाला.

तिखट भाजी, खारट वरण पोळी लागते करपायला.

सारे घेतात पोट भरून, तिलाच नाही उरत काही, घेते उरले सुरले जेवायला.

रोज असतो तसाच दिवस,

त्यातच येतो दिवस आनंदाचा, उधाण येते उत्साहाला,

सारेच करतात लाड प्रेम, नसते सीमा कशाला.

नव्या पाहुण्याची लागते चाहूल, लागतात सारेच कामाला.

हळू हळू दिवस सरतात, घेऊन येतात पाहुण्याला.

लळा लागतो पाहुण्याचा, लाडात वाढतो पाहुणा, कुणाकडेच नसतो वेळ मागे वाळुन बघायला.

छोट्याचा तो होतो मोठा, बहर येतो जीवनाला.


परत येते नवीन सून, सासू मिळते सुनेला.

जीवनाचा तर हाच परिपाठ , रात्री नंतर परत दिवस, अस्त कुठे त्या सूर्याला.


संजय रोंघे

कुटुंब

कुटुंब मनलं का बा
मले लय येते इचार ।
डोयापुढं दिसते मंग
कर्ता घरातला लाचार ।

राब राब थो राबते
सकाय असो का दुपार ।
आभाया कडं पायते
डोकश्यात ढगायचा संचार ।

पानी पानी होते जीव
निस्ता पन्याचाच इचार ।
डोयात बी दिसते पानी
जवा होते थो लाचार ।

कष्टाचं कुठं होते चीज
जीवनच त्याच बेजार ।
कधी सुदाच होत नाही
त्याचा दरिद्री आजार ।

जवा पाहान तवा त्याच्या
भोवताल कर्जाचा बाजार ।
कोन त्याले जगू देते
गळा पकडते सावकार ।

नशिबाचे भोग सारे
कुटुंब ही होते लाचार ।
जगाचा म्हनते पोशिंदा
पन कोनालेच नाही इचार ।

संजय रोंघे
नागपूर
मोबाईल – 8380074730