” आधाराला नको काठी “

कविता ही माझी
आहे तुझ्या साठी
नाते मैत्रीचे आणी
प्रेमाच्या गाठी ।
तु आहेस माझी
मी तुझ्या साठी ।
प्रवास आयुष्याचा
आधाराला नको काठी ।
Sanjay R.

दुखाःचा महा डोंगर तु
आयुष्यभर झेललास ।
सुख वाट बघतय बघ
वेळ नाही होणार खल्लास ।
Sanjay R.

कुठ कडमडलीस
कुठ धडपडलीस
ठाउक नाही मला ।
बर झाल आता
हाती डाॅक्टरच्या
तु सापडलीस ।
प्रयत्न शर्थीचे
करील तो
सोडणार नाही तुला ।
Sanjay R.

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपले म्हणुन ।
Sanjay R.

image

” बंध वेदनेशी “

सोबत तुझी लाभली मजशी ।
लोपले दुखी बंध बघ वेदनेशी ।
द्विगुणीत आनंद नाते तुजशी ।
न उरे लालसा तुच मजपाशी ।
Sanjay R.

कुणाला म्हणायच आपलं
आणी कोण आहे परकं
फरक करण फारच कठीण
आपलेच देतात दगा तेव्हा
सरकते वाळु पाया खालुन
परकेच वाटतात आपल म्हणुन ।
Sanjay R.

image

” जाउ द्या मज काशीला “

जायचे मज काशीला
नको कुणाचा वशीला
विरोध माझा घुशीला
खाउ घालील म्हशीला
पाठवा त्यांना फाशीला
मिळेल माझ्या राशीला
पुरेल माझ्या शशीला
जाउ द्या मज काशीला
Sanjay R.

ना रोनाधोना
ना कोइ बहाना ।
साथ आपका हो तो
बस हसना और हसाना ।
Sanjay R.

सोड तुझा रुसवा
गाल तुझा हसवा
हट्ट थोडा फसवा
बघुन रुप तुझे
सरतो थकवा ।
Sanjay R.

कळेना मज तु हट्टी कीती ।
जडली माझी तुजवर प्रिती ।
शब्द संग्रह तुझी श्रिमंती ।
गुंतली तुझ्यात माझी मती ।
Sanjay R.

रमत गमत धरेवरी
उतरती पाउस धारा ।
सोबतीला त्यांच्या
गार गार वारा  ।
हळुच डोकावे जेव्हा
उन किरणांचा तारा ।
कोमेजुन जाइ धरा
तापी तो दिनकरा ।
Sanjay R.

image

” थिजले शब्द ओठी “

थांग मनाचा तुझ्या
मज लागेल कसा ।

भाव नेत्रातला
तुज उमजेल कसा ।

थिजले शब्द ओठी
सांग सांगु कसा ।

उफाळला डोह आता
मी थांबु कसा ।
Sanjay R.

श्वासात माझ्या
आभास तुझा ।
फुलला मोगरा
खास तुझा ।
दरवळला गंध
श्वास तुझा ।
प्रवासात मी
सोबती तुझा ।
Sanjay R.

प्रित अशी नको
ठेउस तु बंधनात। ।
होउ दे विचार
मोकळे थोडे ह्रुदयात ।
घेउ दे उंच
एक भरारी  गगणात ।
मिळेल मणभर
विसावा अंगणात ।
Sanjay R.

image

” दिल कि बात दिल हि जाने “

बाते हो बडी या छोटी |
कहने से दिल रूकता नही |
करो दिल से अगर कोई बात |
दिल है हमारा |
कभी झुकता नाही |
Sanjay R.

गोबरे गाल तुझे, ओठ गुलाबी |
नेत्र लापाविलेत आहेत ते शराबी |
हास्य तुझे प्रसन्नतेची चाबी |
हृदयी जपेन मी तुझीच ग छबी |
Sanjay R.

थांबतो तो
रस्ता नसतो |
पुढे जायला
पडदा नसतो |
Sanjay R.

दिल कि बात दिल हि जाने |
कोई माने या ना माने |
मेहेसुस तो करते
बस आपकोही हम |
जाब धुंडणे निकालते
तो नजरही नाही आते |
Sanjay R.

दिलेला शब्द
यायचा नाही परत |
पाळता पाळता
जीवन जात सरत |
Sanjay R.

कविता म्हटला न कि
डोंगर भर विषय दिसतात
लिहिताना मात्र पेन हळूच थबकतो.
आणि सांगतो बघ
अरे बाबा सांभाळून चलव
शब्दच तुला ओढून धरतील
Sanjay R.

तुझे माझे सुर
एकत्र असे यावे ।
गाण प्रितीचे
बेधुंद होउन गावे ।
मनोमिलनाच्या रात्री
तारे उधळावे ।
Sanjay R.

देशील का ग मला तू
सदैव तुझीच आठवण |
चांदण्या रात्री चंद्राच
चंद्रिके सह जागरण |
Sanjay R.

नको रोकुस शब्दांना
नको टोकुस शब्दांना |
तार एकदा छेडून बघ
लय मिळेल शब्दांना |
Sanjay R.

image

” प्रवास आयुष्याचा “

तुझे माझे सुर
एकत्र असे यावे ।
गाण प्रितीचे
बेधुंद होउन गावे ।
मनोमिलनाच्या रात्री
तारे उधळावे ।
Sanjay R.

देउनीया आनंद
मिळेल अत्यानंद ।
क्षण येता जवळी
तुटतील सारे बंध ।
दरवळेल चहुओर
परम सुखाचा गंध ।
Sanjay R.

आयुष्याचा प्रवास
हसत हसत करावा ।
दुखा:च्या डोंगरांना
द्यावा थोडा दुरावा ।
म्रुत्यच आहे बघा
शेवटचा पुरावा ।
Sanjay R.

image

” कळलेच नाही मला “

कळलेच नाही मला
मन माझे कुठे गेले ।
शोधाया निघालो तर बघ
तुझ्याच मनात घर केले ।
Sanjay R.

नको करुस कट्टी
नको करुस बट्टी ।
मस्ती कराया
आज आहे सुट्टी ।
Sanjay R.

image

” देहभान हरपले “

छवी तुझी बघुन
देहभान हरपले ।
हास्यवदन तुझे मज
वेड  लाउनी गेले ।
नेत्रांनी मज असे
घायाळ केले ।
ओठ माझे तुझ्या
ओठांवर स्थिरावले ।
Sanjay R.

तब ना हो सका जो
अब भी वक्त है बाकी ।
आ चल शुरु करे हम
दिवानगी अब भी है बाकी ।
Sanjay R.

तुझ्या दारावरुन जातांना
हललकीशी तुझी झलक
मन त्रुप्त करुन जायची ।
रंगायचो गोड स्वप्न
जगायचो त्यातच
जेव्हा नजरा नजर व्हायची ।
Sanjay R.

image

” शोध आसमंतात स्वरुप तुझे “

तस्वीर तुझी
बघत रहायची
सवय मला जडली ।
तुजवीण जिवन
विचारही नकोसा
लाइफ स्टाइच बिघडली ।
आठवत मला आजही
दुर जायच म्हणताच
कीती तु रडली ।
घेउन हातात हात
प्रत्येक पायरी
सोबतीन तु चढली ।
Sanjay R.

मैत्रीच नात
अती श्रेष्ठ ।
मिळतील परत
झाले जरी रुष्ठ ।
दुखाःत एक
दुसर्याला कष्ट ।
नात मैत्रीच
सगळ त्यात स्पष्ट ।
Sanjay R.

आसवांनी डबढबले
डोळे तुझे ।

घायाळ मन
अस्थीर तुझे ।

दे झिडकरुन
सारे बंध तुझे ।

शोध आसमंतात
स्वरुप तुझे ।
Sanjay R.

image

” जिव वेडा “

सहज तुटणार्या धाग्याच
कीती मजबुत हे बंधन ।
भावा बहिणीच्या नात्याच
सुगंधीत हे चंदन ।
Sanjay R.

मन वेड का जिव वेडा
गहन प्रश्नाच आहे कोडं ।
दिवसाही पडतात स्वप्न
कशाचिच कशाला नसते जोडं ।
जगतो मात्र क्षण न क्षण
न उलगडणारी कागदांची मोड ।
Sanjay R.

image

” सुरु झाला प्रवास “

आठवणी तुझ्या माझ्या
होउन चिंब ओल्या
झरतील त्या पाणी ।
थबकतील श्वास तीथे
गातील मधुर सुरासंगे
मनोमिलनाची गाणी ।
Sanjay R.

निळ्या काळ्या नभांनी
वेढुन घेतल आकाश ।
थेंब थेंब पावसाचा
सुरु झाला प्रवास ।
लागली असेल धाप त्याला
मधेच सोडला श्वास ।
Sanjay R.

image

” तुझाच तो बंध “

तुझाच तो बंध
बांधुन घेतला हाताला ।
मैत्रीच नाव दिल
तुझ्या माझ्या नात्याला ।
जखम मज होता
वेदना तुझ्या मनाला ।
मिच का असा लोटतो
दुखाःत तुझ्या आनंदाला ।
Sanjay R.

मैत्री जिवनभराची साथ असते ।
मदतीला तिचाच हात असते ।
दुर नजर टाकुन थोड बघा
मैत्रीच जिवनभराचा आधार असते ।
Sanjay R.

कामात असे राम
राधे शाम राधे शाम
जिवनात एकच नाम
आहे त्याचेच दाम
बस करा फक्त काम
सोबतीला आहे राम ।
राम राम राम राम ।
Sanjay R.

image

” का असा तु वागलास “

दुनियामे कमी नही है लोगोंकी ।
लाइन लंबी लगी है रिश्तेदारोंकी ।
पुछताछभी कर लेते सब अपनोकी ।
काम तो दोस्तही आते कसम दोस्तीकी ।
Sanjay R.

न्याय अन्यायाच्या
गोष्टी नकोत आता  ।
अन्याय तुजकडुनच
झाला मजवर ।
स्वतःच्या स्वार्थापोटी
का असा तु वागलास ।
मात निसर्गावर करुन 
प्रसंग भिषण ओढवलास ।
Sanjay R.

व्था मनाची 
ना कळे कुणा ।
नव रुपात साकारतो 
आपलेपणा ।
Sanjay R.  

नाते……

रक्ताच नसलना तरी चालेल ।
भावनांच असल तर धावेल । ।
नसेल मोठा पसारा तरी  ह्रुदयाच्या कोपरयात नक्कीच मावेल ।।
Sanjay R. 

image