वारा घेऊन वादळ आले

वारा घेऊन वादळ आले
थेंब पाण्याचे गारा झाले ।

हलले डूलले थोडे बिथरले
झाडच ते कसे कोसळले ।

भिंती हलल्या छतही गेले
उघडे आकाश अश्रू हरपले ।

जिकडे तिकडे पाणी झाले ।
दुःखात सारे ओले ओले ।
Sanjay R.

विचारांचे जाळे

डोक्यात विचारांचे जाळे
छळतात किती मनाला ।
सारे असते सोसायचे
सांगायचे कसे कुणाला ।

वाटे कधी काय करावे
दुःख आतले कसे सारावे ।
सोडून साऱ्या दुःखाच्या वाटा
वाटेत सुख तेच धरावे ।
Sanjay R.

सुंदर मनाची असते आई

सुंदर मनाची असते आई
करते लहान पणी गाई गाई ।
जगात असते रात्र सारी
तानुल्या रे ती तुझ्या पाई ।

कंटाळा का कधी केला तिने
मन तिचे रे तुझ्याच ठाई ।
ओठी तिच्या नव्हता शब्द
कधी बोलली का तुला नाही ।

मोठा तू रे झालास आता
आठव जरा ती तुझी आई ।
लोटू नकोस दूर असे तू
सांग कशाची पडली घाई ।
Sanjay R.

एक सुंदर मन

असावे एक सुंदर मन
गुंतून जावा क्षण क्षण ।
कधी घ्यावी उंच भरारी
यावे फिरून सारे गगन ।
आहे बघायचे सुंदर तारे
ठेवून उघडे दोन नयन ।
ढगावरती होऊन स्वार
आहे करायचे मज भ्रमण ।
Sanjay R.

नियती पुढे सारे क्षीण

मनातले कळणे
आहे किती कठीण ।
व्हायचे तेच घडते
नियती पुढे सारे क्षीण ।

हाताशी आलेला घास
जातो कधी निसटून ।
नकळत मिळते कधी
नशीब आणते ओढून ।

सारा नियतीचा खेळ
नशिबाची हवी साथ ।
असेच काही मिळत नाही
मेहनतीचाही हवा हात ।
Sanjay R.

दरवळला सुगंध दूर

माळला तू केसात गजरा
दरवळला  सुगंध दूर ।
लागली चाहूल मोगाऱ्याची
आणि मन झाले आतुर ।

शोधू कुठे कसे तुजला
नेत्र माझे नाहीत चतुर ।
वारा हळूच सांगून गेला
मधुर किती तुझा ग सुर ।

आठवण आहे अजून ती
मन त्यातच असते चुर ।
सांगतो मी गुपित मनातले
भासते तूच मझी ग हूर ।
Sanjay R.

जगण्याची रीती

का असे तू छळतेस
सोड ना तुझी उदासी ।
हसून दे तू जरासे
जग सारे हे आभासी ।

दुःख मनातले सारे
मनातच तू असू दे ।
गालावर थोडे स्मित
तेच जगाला दिसू दे ।

आहेच कोण इथे सुखी
अंतरात सारेच दुःखी ।
हुंदका दाबून बोलतात
सांग यात काय चुकी ।

डोळ्यात असतील जरी
आसवांचे थेंब किती ।
गालावर कुठे ओघळतात
हीच जगण्याची रीती ।
Sanjay R.

मन का उदास

कळेना मज काही
हे मन का उदास ।
वाटे भीती कशाची
पडे डोक्यावर घन ।
भार हटेना कशाचा
कठीण एकेक क्षण ।
सुन्न पडली काया
प्राण सुटेना पण ।
Sanjay R.

कशास मी उदास

हसण्यास नको कारण
हीच जगण्याची मजा आहे ।
होऊ कशास मी उदास
जगतो म्हणून श्वास आहे ।
बघतो ते जीवन मी
जगणे ऐक ध्यास आहे ।
कुणास ठाऊक जीवनाचे
जीवन हे आभास आहे ।
Sanjay R.

रिमझिम बारिश

रिमझिम बारिश
भिगे भीगे ये बाल
बहता हुवा पानी
भर दो सारे ताल

छिप गया सूरज
झुमने लगे बादल ।
बुंदे बारिशकी
सब कूछ ओझल ।

हीलती हुवी पत्तिया
डोले पेडका आचल ।
भिग गई ये धरा
निखरा रूप असल ।
Sanjay R.

मांजर आडवी गेली

मांजर गेली आडवी
अपशकुन झाला ।
काय कसे झाले
कामात अडथळा आला ।

निघलो जेव्हा मी
महत्वाच्या कामाला ।
नाट लावली कोणी
प्लान फिस झाला ।

नको असा अपशकुन
आला लिंबू मिरची वाला ।
अंधश्रद्धेचे भूत मागे
सांगू मी कोणाला ।
Sanjay R.

अंधश्रद्धा

असू दे श्रद्धा तुझी
नको अंधश्रद्धा ।
अविचारी ते सारे
डाव नाही साधा ।
देतील घाव दुःखाचे
आहे ही दुविधा ।
Sanjay R.