” माझा वाढदिवस “

मनापासून दिलेल्या तुमच्या
पडला शुभेच्छांचा पाऊस ।
मित्रांनो तुमच्या मूळच माझी
वाढदिवसाची पूर्ण होतेय हौस ।

माझ्या साठी तुम्हीच आहात
मित्र माझे खासम खास ।
तुमच्या विना मी आणि माझ्या कविता
नकोच मनात तसला भास ।

सदैव असा सोबत माझ्या
सुखकर होईल जीवन प्रवास ।
माझ्यासाठी तुम्हीच माझा
झालात सारे एक एक श्वास ।
Sanjay R.

” माझा मीच हरवलो “

माणसांच्या या गर्दीत
विचारांचा सागर ।

आवाजाचा कल्लोळ
वेदनांचा जागर ।

माझा मीच हरवलो
फिरतो आता नागर ।

शून्यही उरले नाही
न उरला कुणाचा आदर ।

शोधू कुठे आता
फिरते नुसतीच नजर ।

चालताहेत नुसते श्वास
घायाळ झाले जिगर ।
Sanjay R.

” गुरू विना मी “

गुरु तुम्हीच
ज्ञानाचा सागर ।
गुरु विना मी
अज्ञानी घागर ।

चला करू या
ज्ञानाचा जागर ।
द्या शिक्षा
मजसी गुरूवर ।

पाठ गिरविण्या
आहे मी सादर ।
मनी माझ्या
तुमचाच आदर ।
Sanjay R.

” सब कुछ बदल गया “

हम बदले आप बदले
ये शहर भी बदल गया ।
बदलना तो सबको था
बस आसमान रहे गया ।

भरता था झोला
ले जाते थे जब चवन्नी ।
मोल क्या रहा अब
भर लो पैंसोसे पन्नी ।

तन बदला मन बदला
बदल गयी कहानी ।
जिने के लिये सब करते
अपनो परही मन मानी ।
Sanjay R.

” पोरी काय तुझा तोरा “

नाक डोळे छान
रंग तुझा गोरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

गोड तुझा गळा
गातेस जशी सुरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

भासे नवरत्नातली एक
जसा लावण्याचा हिरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

केला काळजात घाव
मन घेते माझं फेरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

घेतला मनाचा तू ठाव
बघ परतून जरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

लागलं तुझी मज हाव
केला हृदयात मारा ।
पोरी काय तुझा तोरा ।।

अगं काय तुझा तोरा
कृष्णाची गं तू मीरा ।
पोरी काय तुझा तोरा ।।
Sanjay R.

” सारेच इथे ढोंगी “

काळच असा आला
झालेत सारे ढोंगी ।

लावून चेहऱ्यावर मुखवटा
बनताहेत सारे सोंगी ।

भोगतोय गरीब बिचारा
आयुष्य भर तंगी ।

फटक्याला नेटकं करता करता
जडलंय त्याच्या अंगी ।

कपटी किती झाला तो
त्यातच असतो दंगी ।

उजळ माथ्यानं फिरतो
बाजारात काळ्या रंगी ।

बघून बघून सवय जडली
आम्हीही झालोत संगी ।

लाज शरम सारली आता
सांगतो मिरवून आम्ही लफंगी ।
Sanjay R.

” जय हरी विठ्ठल “

वारकरी मी
मुखी अभंग ।

आस दर्शनाची
नामात दंग ।

आली पालखी
संतांचा संग ।

भक्तिमय झाला
पंढरीचा रंग ।

चंद्रभागेच्या काठी
भक्तीचा उमंग ।

जय हरी श्री हरी
पांडुरंग पांडुरंग ।
Sanjay R.

” आसवांना किंमत नाही “

मनाला तर खूप वाटतं
लिहावं असं काही काही ।

पण काय ते लिहावं
पेनाला ही ठाऊक नाही ।

शब्दांचा तर सागर इथे
तरीही जुळता जुळत नाही ।

कथा कविता कादंबरी
सारेच कसे वाट पाही ।

मनानेच केला निवाडा
लिहिले शब्द घेऊन वही ।

दुःख असतं दिशा दाही
आनंदाची करा घाई ।

खोटे नाटे कसेही हसा
आसवांना किंमत नाही ।
Sanjay R.

” प्यार ही प्यार “

बात है कुछ पहलेकी
दिन हुवे हो दो चार ।

उमडा था दिलमे
यूही मेरा प्यार ।

देखकर उनको
दिलमे हुई बहार ।

हसता चेहरा भोली सुरत
गाल गुलाबी जैसे अनार ।

सुंदरसी चमकीली आखे
ओठ शराबी गलेमे हार ।

जी कहेता रहा
कैसे करू मै दिदार ।

झोका हवाका आये
और तूट जाये दिवार ।

उलझन मी था दिल
किससे करू तकरार ।

कह दे वह कुछ भी
ना करू इनकार ।

करू मै उनसे
बस प्यार ही प्यार ।

बुझा दो बुझा दो
अब दिलमे लगी अंगार ।
Sanjay R.

” माह्या वऱ्हाडाची माती “

माह्या वऱ्हाडाची माती
फुलवते सारी नाती गोती ।

धनी राबतो थे शेती
होतो वला पावसाच्या घाती ।

पऱ्हाटीले फुटते पाती
वळे कष्टाच्या वाती ।

तवा येयी पयसा हाती
पोसे मानसाच्या जाती ।

घास दोन सारे खाती
कधी उपासाच्या राती ।

तुटे निसर्गाची गती
हाती ढेकलाची माती ।

दिस हपत्याचे साती
जीव उरफाटा घेती ।

अभंग तुकोबाचा गाती
फुले इंच इंच छाती ।

सपन उद्याचे पायतो
झोप सुखाची राती ।
Sanjay R.

” काय किती भारी “

काय किती भारी
जमात आमची सारी ।
पेलतायेत सगळे
आपापली जवाबदारी ।

गडबड गोंधळ घोटाळे
चाललंय दारोदारी ।
उघडा वर्तमान पात्र
दिसेल नुसती मारामारी ।

संपल्यातच जमा आहे
आता दुनिया दारी ।
पैज लागलं नुसती
कोण कुणावर भारी ।

राजकारणात दिसताहेत
गिधाडं आणी घारी ।
भोग भोगले आम्ही
आता आली तुमची बारी ।

जागोजागी वाळवळतात
हेच नाग विषारी ।
वाजवा कुणी आता
युद्धाची तुतारी ।

रे विठ्ठला फुलली कशी
माणसांनी पांढरी ।
माणुसकीचा दे प्रसाद
होईल सफल जन्माची वारी ।
Sanjay R.

” माझे मलाच कळेना “

का कुणास ठाऊक
माझे मलाच कळेना
बंध माझ्या मनाचे
मनाशीच जुळेना

कधी आकाशात नजर
वाजे अंतरात गजर
जीव होई अधर
वाटे नाही कुणालाच कदर

कधी मारायच्या खेपा
वाढवायच्या जागीच धापा
वाटे भीती मग
मनच मनावर टाकील का छापा

सहजच मग मनात
चमचमले एक किरण
जोश उत्साह आनंदात
झाले दुःखाचे हरण
Sanjay R.

” सांग ना गं आई कसं जायचं बाहेर “

सांग ना गं आई
कसं जायचं बाहेर ।
पावसाचे असावे कां
इथेच कुठे माहेर ।

दहा दिवस झालेत
त्याच्या पाहुणचाराला ।
अजून किती मुक्काम
कोण जाईल विचारायला ।

शाळा नाही खेळ नाही
लागलो मित्रांना विसरायला ।
मूडच नाही लागत माझा
आता अभ्यासाला बसायला ।

ये ये म्हटलं तर
इतका का रे येतो ।
सांगत हि नाही जरा
कधी तू जातो ।

जा म्हणा आता
परत तू येशील ।
थोडं दिवस आम्हा
उसंत तर देशील ।

काकांच्या शेतात छान
पुन्हा तू पडशील ।
वीसरु नको बाबा नाहीतर
जाऊन कुठे दडशील ।
Sanjay R.

” पाऊसच पाऊस “

कसा हो हा पाऊस
पड पड म्हटलं तर पडत नाही ।

आणी पडलाच तर
थोडीही उसंत देत नाही ।

कोरड्या नद्या कोरडे नाले
नावही पैलतीरी नेत नाही ।

आलाच कधी तर
जीव घेतल्या शिवाय जात नाही ।

रिमझिम रिमझिम कोसळेल असा
नदी की नाली काळतच नाही ।

खूप तु रे बरसला
आता विचार कर काही ।

सूर्य कूठे असेल
सारे शोधताहेत दिशा दाही ।

उघड थोडं दार
साऱ्यांचीच झाली त्रेधा तिरपट त्राही ।

थांब थोडा आता
सांगून जा तू , परत येणार कि नाही ।
Sanjay R.

” चाला वारीले जाऊ “

चालतं का गा भाऊ
वारी ले जाऊ ।

डोये भरून विठ्ठलाले
याची देही पाऊ ।

वरकऱ्याच्या संग संग
काही दिस राहू ।

जय हरी विठ्ठलाचे
भजन थोडे गाऊ ।

चंद्रभागेच्या पाण्यामंदी
एक दिस न्हाऊ ।

आषाढी एकादशीले
पंढरीतच राहू ।

माऊलीच्या दर्शनान
धन्य आपुन होऊ ।

चाल न गा भाऊ
वारी ले आपुन जाऊ ।
Sanjay R.

” स्वातंत्र्य “

हे स्वातंत्र्य विरांनो
किंमत कुणास तुमच्या बलिदानाची ।

उरला इथे स्वैराचार
हीच गोष्ट इथे अभिमानाची ।

गांधी नेहेरु टिळक भगतसिंग
थोर लेकरं तुम्ही या भूमातेची ।

स्वातंत्र्याचे स्वप्न तुमचे
आग लागली पारतंत्र्याची ।

गीत गाता राष्ट्र गाण
वाटे तिरंगा आम्हा महान ।

नाही उरले सारे सरले
बघा किती आता झालो लहान ।

राजकारणात हा देश नासला
आता चिंता उरली खुर्चीची ।

मान सन्मान नाही इमान
वाटे त्यातच त्यांना शान ।

भेद भाव जाती वाद
पेटत आहे सगळे रान ।

मारणे मारणे रोजचेच झाले
करून सोडले इथे स्मशान ।
Sanjay R.

” टाळ मृदंग “

टाळ वाजे चिपळीसंग
थाप घेई मृदंग

पायी बंधूनीया चाळ
नाचतसे संत संग

वारीचा अवघाची रंग
मनी पंढरीचा चंग

कीर्तनाच्या रंगी होतसे दंग
मुखी सारे गाती अभंग

करी गजर नामाचा
डोले सारे अंग

ओढ माऊलीच्या प्रेमाची
मग होईल कशी ती भंग
Sanjay R.

” पंढरीची वाट “

पाऊले चालली पंढरीची वाट l
ना कसला मोह ना कसला थाट l

घेऊन चालती हातात चिपळ्या l
हरिनामाचा गजर अन् वाजवित टाळ्या l

पायात नसे वहाणा पण डोईवर तुळस l
खांद्यावर पताका त्यात नसे आळस l

मुखी तुम्ही सारे बोला हरी बोला l
माऊलीच्या ओढीने लगबगीने चला l

नाचत गात होती कसे गुंग l
पांडुरंगाच्या ओढीने सारे कसे बेधुंद l

एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंध l
नाही कोणी चेला नाही कोणी संत l
Sanjay R.

” शब्द “

सांग तुच
शब्दांची तुझ्या मी
किती कशी
वाट बघायची ।

बघुन नजरेतले
भा़व तुझ्या
काय दशा झाली
माझ्या काळजाची ।
Sanjay R.

” काय सांगावं आता “

काय सांगावं आता
कोणाच्या मनातलं काय खरं ।

मरणाऱ्याची सेल्फी काढणं नाही बरं ।
वर जाच्या आंदीच घुमते लय वारं ।
दिसते मनते वॉट्सअप मंदी खर खरं सारं ।

काय सांगाव आता
ईचारच सरले काहीच नाई खरं ।

सुटले मनतेत भाऊ गावभर चोर ।
माय बापच चोरतींन का आपले पोरं ।
वरत धाडतेत पडून मार ।

काय सांगाव आता
उघड्या खिडक्या उघडे दारं ।

कायले तोडाचे डोक्याचे तार ।
दिसते थे थे आता पाहावं सार ।
जावं मयतीले टाकावं हार ।

काय सांगावं आता
कोणाच्या मनातलं काय खरं ।
Sanjay R.