” थेंब पाण्याचा “

आहेना हेच खरे
पळसाला पाने तीन ।
सुर्य लागला तापायला
येयील जरासा शीण ।

राना वनात फुलला पळस
उधळला रंग लाल ।
पशु पक्षी माणसं सारी
होतील पाण्याविना बेहाल ।

ढग काळा शोधण्यासाठी
नजरा उठतील आकाशी ।
वाचवुन थेंब पाण्याचा
भागवायची तहान जराशी ।
Sanjay R.

” मोगर्याची कळी “


मोगर्याची कळी
गालावर खळी ।
मनात माझ्या
सोनेरी साखळी ।
ठेवली मी तुज
अंतरात स्थळी ।
आठवण तुझी मज
क्षणोक्षणी छळी ।
Sanjay R.

” कृष्ण सावळा “


रंग तुझा गोरा
मी असा काळा
तु माझी राधा
मी कृष्ण सावळा ।

हसणं आणी मुरडणं
आवडतात तुझ्या अदा ।
गुंतलय मन तुझ्यात
झालो मी फिदा ।

नको अशी रागाउस
नको दुर जाउस ।
श्वासातही तुच माझ्या
नको अंत पाहुस ।
Sanjay R.

” पारा “


नेहमीच असतो तुझ्या
का नाकावर राग ।
सदान कदा चिड चिड
थोडी हसायला लाग ।

हसते जेव्हा तु
खरच छान दिसतेस ।
नकऴत मग तु
मनात जाउन बसतेस ।

उन्हाळा येतोय आता
असु दे खाली पारा ।
मध्यान्ह रात्री रोज
चमकु दे तारा ।
Sanjay R.

” हसत रहा “


बघुन हसरा तुझा चेहरा
वाटतं घ्यावा एक गजरा ।
माळावा तुझ्या केसात
आणी विचारावं
दिसतो किती साजरा ।
तु अशीच हसत रहा
आवडतो मज
भाव तुझा लाजरा ।
Sanjay R.

” हरवलं बालपण “

गेलं ते हसणं खिदळणं
संपली ती मस्ती ।
मोठे झालो ना आता
हरवलं हो ते बालपण ।
पाण्यातल्या बोटी आणी
आकाशातली विमानं
कागदाची का असेना
किती होती श्रीमंती ।
नव्हता खिशात पैसा
पण नव्हती चिंता कशाची ।
नाव पैसा सारच आलं
तरी संपत नाही भ्रमंती ।
काहीही खा काहीही प्या
विचारांना अफाट गती ।
आता मारा ओषधांचा
शरीराची झाली क्षती ।
Sanjay R.

” गुलाब तु “


अरे तु माझ्या मना
वेडा की खुळा तु ।
भिर भिर असते नजर
शोधतो काय असा तु ।
क्षणो क्षणी अधीर होतो
स्थीर कधी होणार तु ।
रात्र रात्र जागतोस वेड्या
निश्चींत कधी जगणार तु ।
सदान कदा चिंताग्रस्त
खळखळुन कधी हसणार तु ।
उठुन थोडा जागा हो
प्रितीच्या बागेतला गुलाब तु ।
Sanjay R.

” शब्द “

प्रश्न तुझा नाही मोठा
दिला शब्द नाही खोटा ।
पुल शब्दांचे बांधुन आता
काय होणार नफा तोटा
मन जरी अथांग सागर
थेंब आसवाचा नाही छोटा ।
Sanjay R.

” डे बाय डे “


डे बाय डे
दिवस चालले ।
हळवे मन
अंतरात हलले ।
क्षण दुःखाचे
बहुत झेलले ।
भिर भिर डोळे
तेही हरले ।
आनंद क्षणीक
सारेच सरले ।
Sanjay R.

प्रेमाचा धावा
जसा अंतरात
वाजे पावा ।
मोहक फुलांचा
सुगंधी दावा ।
Sanjay R.

” रोज डे “

अंथरले वाटेवर
गलाबाचे सडे ।
दिवस आजचा
रोज डे ।
रोज का नसतो
असाच डे ।
टोचले नसते मग
पायास खडे ।
पडले नसते
ह्रुदयास तडे ।
हॅप्पी रोज डे
हॅप्पी रोज डे ।
Sanjay R.

” पपी लाडाचा “


लेकीला माझ्या
पिल्लाचं वेड ।
ए बी सी डी टु
एक्स वाय झेड ।

दिवसभर असते
पपीच्या मागे ।
निरागस मनाचे
अतुट धागे ।

दुधातले दुध आणी
पोळीतली पोळी ।
सारखेच तिच्या
भरवते वेळी ।

दुपारची मस्ती
पपीला पांघरुण ।
शाळेला जाते
काळजीचे सांगुण ।

झोपेतही विचारते
झोपला का पपी ।
हो कळताच ती
होते हॅप्पी

दिवस उजाडताच
पपीची आठवण ।
बघतो वाट
तिचीच तो पण ।

छोटी छोटी मनं
आणी प्रेमाचे क्षण ।
असाच घडावा
प्रत्येक जण ।
Sanjay R.

” जिव झुलला “

मोगरा फुलला
केसात खुलला ।
सुगंधात कसा
जिव झुलला ।
आठवणींच्या चक्रात
सर्वस्व भुलला ।
कल्पनेत मग
थोडा हसला ।
नजर भिर भिर
थोडा रुसला ।
लटका राग
नाकावर दिसला ।
लाली गालावर
बघुन फसला ।
भाव डोळ्यातला
मनात ठसला ।
ह्रुदयात जागा
देउन बसला ।
Sanjay R.

” थोडंच रुसायचं “


थोडं थोडं रुसायचं
आणी गोड हसायचं ।
हळव्या मनाला मात्र
खुप खुप जपायचं ।
जिवन आहे अनमोल
आनंदात छान जगायचं ।
दुःख असतात क्षणीक
दुर त्यांना सारायचं ।
सुख दुःख सखे सोबती
सोबत त्यांच्या चालायचं ।
Sanjay R.