करतो एकांत मज इशारे

खेळ झाला जीवनाचा
सुख दुःख सरले सारे ।
होऊनिया चन्द्र आता
बघत असतो फक्त तारे ।
उजेडाची वाटते भीती
काळोखात घेतो फेरे ।
दूरदूर ती असते शांती
करतो एकांत मज इशारे ।
Sanjay R.

आभास

सांग ना मला जरा
तुज आभाळ म्हणू की आकाश ।

दूर जरी असेल तू
सदा वाटे मज तूच माझा प्रकाश ।

चन्द्र सूर्य तारे नकोत
डोळे मिटुनही मज होतो आभास ।

जपल्यात मी आठवणी साऱ्या
भरभरून त्यात जीवनाचा सारांश ।
Sanjay R.

नकोच मला तो एकांत

कुठला कशाचा एकांत
वाटतो मला तो अंत ।


असंख्य विचार येती जाती
मन कुठे असते हो निवांत ।


नको नको ते मग सुचते
वाटते माझी मलाच खंत ।


माणसांच्या घोळक्यात बरा
नाहीच व्हायचे मला संत ।


मित्र मैत्रिणी हवेत सारे
नकोच हो मला तो एकांत ।
Sanjay R.

मनात उद्याची आशा

मनात उद्याची आशा
घालवू कशी निराशा ।
वाट दूर ही जाते कुठे
कळेना कुठलीच दिशा ।

स्वप्न जेव्हा मी बघतो
असते वेगळीच नशा ।
वास्तवात कळती मज
मिटलेल्या पुसट रेषा ।

का चाले वणवण सारी
सरेल कधी मनाची तृषा ।
भोग भोगतो मी जन्माचे
लुप्त होईल सारी आशा ।

Sanjay R.

विठ्ठला

हात गुंतले कामात
मुख हे हरी नामात ।
डोळे शोधती विठ्ठल
आस दर्शनाची मनात ।
दूर इतका तू पंढरी
जावे वाटे मज क्षणात ।
धारूनिया पाय तुझे रे
अर्पावी आसवे चरणात ।
आठवण येण्यास सदा
ठेव मजसी तू दुःखात ।
Sanjay R.

मनाचा संघर्ष

विचारांचा गुंता सारा
नजरेत होता आदर्श ।
तयारच नव्हते मन
अंतरात चालला संघर्ष ।
सुख बघितले कुणाचे
झळकला मुखावर हर्ष ।
दुःखाच्या वाटे वरती
जाणवेना कुठला स्पर्श ।
थिजली नजर डोळ्यात
काळोखात कुठे दर्श ।
जगतो जीवन कसा मी
लोटतो एक पुढे वर्ष ।
Sanjay R.

शहर कुठले माझे

पोटासाठी फिरतो वणवण
शहर कुठले हो माझे ।
गरिबांचा संसार असाच
वाहतो जगण्यासाठी ओझे ।
वर बघतो आकाशात
वाटते किती ते खुजे ।
दिवसही मोजत नाही
घडतात आपोआप रोजे ।
Sanjay R.

सलाह

दे ना तू #सलाह मुझको
मै भी हू समझदार थोडा ।
चलते चलते गीर न जाऊं
काहे बनता है तू रोडा ।
Sanjay R.

अभिमान

तुज कशाचा रे अभिमान
खोटाच करवितो तू मान ।
करी ना कोणीच सम्मान
स्वतःच मारितो तू शान ।
मूर्ख तुझेच रे हे ध्यान
की आमुचेच आहे अज्ञान ।
कोण कुठला तू महान
वाटे बुद्धी आमुची लहान ।
बदल रे तू तुझे हे निशान
होऊ नकोस तू बेभान ।
कळते झालेत सारेची
झुकवतील तुझीही मान ।
Sanjay R.

रोबोट

माणूसच झाला रोबोट
नुसता असतो पळत ।
पैश्या शिवाय सुचते काय
जीवन हेच नाही कळत ।
विचारांचे ओझे डोक्यावर
मनही त्याचे नाही ढळत ।
आतल्या आत धगधग
जीवही असतो जळत ।
Sanjay R.