तुच रे जवाबदार माणसा ।
नकोच ना तला पाउस ।
तोडुन जंगल उजाडलं सारं ।
फिटउन घे आता आपलीच हौस ।
Sanjay R.
गरीबीच आहे
पाया आमच्या देशाचा ।
दाखवतो दया माया
हा किती मोठेपणा
आमच्या मनाचा ।
सगळेच दाखवतात
थोडी कळकळ आणी
चिमुटभर मळमळ ।
थंडच आहे रक्त उरात
देणे घेणेच नाही कुणा
होणार कशी सळसळ ।
जगतो बिचारा कसातरी
अन्नासाठी दारोदारी
मेला गेला नाही सुतक ।
सुरु केली म्हणे सरकारनं
अन्न सुरक्षा योजना
तरीही का ही अन्नाची कमी ।
Sanjay R.
रात्रीचे काही वेगळेच रंग
सगळेच कशे असतात दंग ।
हवेत दरवळतो रातराणीचा सुगंध
चंद्र असतो मस्तीत चांदणीच्या संग।
मधेच चमचमतो कळोखात काजवा
रातकिड्यांची समधी होते भंग ।
Sanjay R.
जायचं जर असेल जिवनात पुढे
अभ्यासाचे ओझे वाहायचे थोडे ।
एक एक पाउल मग ठेवायचे पुढे
सर होतील श्रमाने सारे विद्येचे धडे ।
झिजवायचे आपले पायातले जोडे
शर्यत जिवनाची जिंकतील घोडे ।
Sanjay R.
किती तु लावलीस ओढ
तुझ्या विचारानी मग
वाटतं सारंच गोड ।
तुझं हळुच हसणं आणी
तिरक्या नजरेनं बघणं
दोन्हीची अप्रतीम जोड ।
S. Ronghe

Posted from WordPress for Android