” गावाकडची जत्रा “

महाशिवरात्रीला दरवर्षी
भरते गावात जत्रा ।
गावोगावचे लोक येतात
गर्दीची असते यात्रा ।

महादेवाचे भक्त सारे
दर्शनाला रांगच रांग ।
मनोभावे टेकून माथा
धन्य होतात शिवांग ।

सर्कस आणि सिनेमा
सोबत असतो तमाशा ।
दुकानांन वर झुंबड गर्दी
कळत नाही कुठली दिशा ।

स्त्रियांना हवे बांगड्या तोंडे
माणूस बघतो आपले जोडे ।
चिंटू मींटी ला खेळणी हवी
विसरतात सारे रोजचे गाडे ।
Sanjay R.

” कधी जाईल मी शाळेत “

“कधी जाईल मी शाळेत “सांग ना ग आई मला
कधी जाईल मी शाळेत ।अभ्यास नाही खेळ नाही
राहू किती आता घरात ।वाट बघताहेत मित्र सारे
मनच लागत नाही कशात ।गुरुजी पण विसरले का ग
येईल केव्हा त्यांच्या ध्यानात ।नको वाटतं सारंच आता
थकलो किती मी घरात ।गप्पा गोष्टी मस्ती दंगा
सांग ठेवायचं किती मनात ।ऑनलाइन ऑनलाइन
काय कसं ग ते शिकणं ।शाळा किती ग छान असते
तेच हवं मला परत जगणं ।
Sanjay Ronghe

” दिवसानंतर येते रात्र “

सरते जिथे रात्र जेव्हा
आणि होते प्रभात ।
सूर्याच्या साक्षीने होते
दिवसाची सुरुवात ।

पूर्वे पासून पश्चिमेला
चाले सूर्याचे भ्रमण ।
होताच सायंकाळ
होई अंधाराचे आक्रमण ।

अस्त होताच सूर्याचा
येई साम्राज्य अंधाराचे ।
व्यापून जाई आकाश सारे
विश्व चंद्र आणि ताऱ्यांचे ।

कुठे लखलख कुठे चमचम
रातकिड्यांचे चाले आवाज ।
मधेच दिसतो दूर काजवा
सकाळ होता सरतो साज ।
Sanjay R.

‘ती’ चा संघर्ष

पाचवीलाच पुजलेला


‘ती’ चा हा

संघर्ष ।


असो विचार कुठलाही
त्याला एकच स्पर्श ।

हवे असो वा नको
जीवनच झाले संघर्ष ।

जगणे असो वा मरणे
निरंतर चाले संघर्ष ।

बघणारे दुरून बघतात
त्यातच त्यांना हर्ष ।

भूतकाळाची पाने भरलीत
त्यातही दिसे तोच स्पर्श ।

‘ती’ म्हणजेच संघर्ष
‘ती’ चाच हा संघर्ष ।
Sanjay R.

” भुताशी गप्पा “

करू चला आज
भुताशी गप्पा  ।
थरारक अनुभव
आयुष्यातील टप्पा ।

लहानपणी वाचल्या
बऱ्याच भुताच्या कथा ।
मनात घर केलंय त्यांनी
सांगू कशी व्यथा ।

त्यांची यायची रात्री स्वप्न
दरदरून फुटायचा घाम ।
एकटा असलो की मग
झोपेतच ओरडायचो जाम ।

आईच्या कुशीत झोपायचो
व्हायची भीती कमी ।
भीती नाही कुणास आता
भुतालाच घाबरवतो आम्ही ।

भूत म्हणजे नुसती आहे
भीतीची एक आकृती ।
भूत काढा हे मनातलं
भ्रमाची आहे ती विकृती ।
Sanjay R.

” रहस्य मनाचे “

मन माणसाचं म्हणजे
आहे एक रहस्य ।
कधी रागाचा थरथराट
तर कधी सुहास्य ।

कधी चाले संथ निरंतर
एक एक श्वास ।
कधी विचारांचा कल्लोळ
त्यात नुसते आभास ।

सुख आणि शांती करी
सदा मनात वास ।
कधी लोभ आणि मोह
त्यांचाच चाले ध्यास ।

अधीर कधी अस्थिर
अंतरातले विचार ।
कधी लागे ध्यान कुठे
भासे सारे निराकार ।
Sanjay R.

” निळ्या आकाशाचे देणे “

निळ्या आकाशाचे गाणे
भरून आभाळाचे येणे ।

रिमझिम पावसाचे देणे
भरून पाटाचे वाहणे ।

शेतात मग होई लगबग
पेरायचे दोन दोन दाणे ।

फुटे अंकुर दाण्याला
त्यात उत्साहाचे जिणे ।

चक्र हेच या जीवनाचे
गाऊ आयुष्याचे गाणे ।
Sanjay Ronghe

” निळ्या आकाशाचे देणे “

निळ्या आकाशाचे गाणे

भरून आभाळाचे येणे ।

रिमझिम पावसाचे देणे

भरून पाटाचे वाहणे ।

शेतात मग होई लगबग

पेरायचे दोन दोन दाणे ।

फुटे अंकुर दाण्याला

त्यात उत्साहाचे जिणे ।

चक्र हेच या जीवनाचे

गाऊ आयुष्याचे गाणे ।

Sanjay Ronghe

” रीत प्रेमाची “

प्रेम कुठे अबोल असते
खूप काही ते बोलून जाते

हृदयाशी हृदय जोडून जाते
हितगुज मनाशी करून जाते

दोन मनं मिळतील जेव्हा
बंध आपसात जोडून जाते

एक दुसऱ्यात नसेल जरी नाते
प्रेमच प्रेमाला मिठीत घेते

जगावेगळी रीत ही प्रेमाची
अंतरात कशी फुलून जाते
Sanjay R.

” बाप “

बाप नाव घेताच
सुटतो थरकाप…..

भरकटलेलं मुल
होतं सरळ आपोआप…

मनात मात्र प्रेम आणि
करतो सुखाचा जाप….

उचलतो कष्टाचा डोंगर
लागली जरी धाप…..

घराचा आधार तोच
झुकते मस्तक आपोआप…
Sanjay R.

” असेल तिथेच शांतता “

विचारतो स्वतःलाच
सांगा काय म्हणता ।
अंतरातून येतो आवाज
तूच आहेस जाणता ।

विचारांचे वादळ इथे
कुणाला काय सांगता ।
सुचतच नाही काही
आता कशाला थांबता ।

दिवस जीवनाचा एकेक
जातो पुढे न चुकता ।
थांबायचे तिथेच आता
जिथे असेल शांतता ।
Sanjay R.

” संपणार नाही प्रवास “

जीवन माणसाचे
आहे हा प्रवास ।
मनात उठती तयात
किती किती ते ध्यास ।

पळापळी चाले सारी
असती सारे प्रयास ।
हाप लागते धाप लागते
येतो फुलून श्वास ।

वाटे अर्धवट सारे
लागेल कसा कयास ।
दूर दिसती आपुले
निव्वळ सारेच आभास ।

सारे भुकेने व्याकुळ
सुटतो मुखतला घास ।
किती हा लोभ मनाला
नाही संपत हव्यास ।
Sanjay R.

” राजकुमार “

सदा चाले डोक्यात
विचारांवरती विचार ।
येयील एक राजकुमार
होऊन घोड्यावरती स्वार
जाईल घेऊन दूर देशी
जन्माचा तो जोडीदार ।
करील जो प्रेम अपार
देई आयुष्याला आधार ।
काय स्वप्नांचा तो सार
आनंदी मनाचा विचार ।
प्रत्येकीच्या मनातले
व्हावे स्वप्न हे साकार ।
Sanjay R.

” जप चाले मनी “


देवा का रे हा असा
तुझ्या माझ्यात दुरावा ।
भक्तीला तुझ्या का
हवा रे तुजला पुरावा ।

नित्य करिती भक्त
भक्ती तुझीच देवा ।
नाही कुठली अपेक्षा
हवा भक्तीचा ठेवा ।

चरणी तुझ्या असू दे
भाव भक्तीचा माझ्या ।
दर्शनाची मनात आशा
येईल पंढरीत तुझ्या ।

दुमदुमू  दे परत पंढरी
भक्त भुकेला तुझा हरी ।
नामस्मरण तुझेच चाले
डोळे तुझ्या वाटेवरी ।

घोष विठ्ठलाचा कानी
निघे ओठातून ध्वनी ।
जय हरी विठ्ठल विठ्ठल
जप अखंड चाले मनी ।
Sanjay R.

” बंधन हे प्रेमाचे “

बंधन प्रेमाचे वाटे
मज हवे हवे ।
मनात फुलती मग
आनंदाचे थवे ।

मनात तू स्वप्नात तू
विचार तुझाच चाले ।
एकांतात मी जेव्हा
शब्द तुझ्याशीच बोले ।

आठवणींचा तो सागर
मन लाटांवर झुले ।
गगनात येते फिरून
निळे आकाश खुले ।

नजरानजर होई जेव्हा
मन आनंदाने डुले ।
दरवळ सुगन्धचा देई
मनी मोगऱ्याची फुले ।
Sanjay R.

” मोबाईलवर चाले गप्पा “

हातात आले मोबाईल
हा जीवनाचा टप्पा
रंगताहेत आता खूप
त्यावरच गप्पा ।

पूर्वी मन मोकळं करायला
नव्हता कुठला पर्याय ।
समोरा समोर भेट व्हायची
सहजच वळायचे पाय ।

दिवस महिने वर्ष आता
कळतच नाही किती गेले ।
मोबाईलवरच होते भेट
सारे व्हर्चुअल आता झाले ।

जीवन झाले किती व्यस्त
आता वेळच नाही पुरत ।
मोबाईल वर करायच्या गप्पा
बसायचं कशाला झुरत ।
Sanjay R.

” मन हे बावरे “

मन हे माझे बावरे
किती आहे आस रे ।
वाटे त्यास कधी
थोडा तू धाव रे ।
नको थांबुस मधे
पुढे पुढे तू चाल रे ।
होता हर्ष थोडा
खूप तू नाच रे ।
आयुष्य हे तर आहे
सुख दुःखाचे  घर ।
जग सुखात
दुःख दूर सार रे ।
Sanjay R.

” वाट बघतो मी “

वाट बघतो मी
येना ग सखे तू
छान पाऊस होऊन ।
अजूनही वाटतं
खूप खूप भिजावं
सोबत तुला घेऊन ।
आजूनही आठवतो
तू आणि मी कसं
घेतलं होतं न्हाऊन ।
मनातलं तुझ्या माझ्या
करू ते सारं सारं
जे गेलं होतं राहून ।
Sanjay R.

” शब्द दोन प्रेमाचे “

शब्द दोन प्रेमाचे
सांगू किती गुणाचे ।
घर मनात करती
नाते जिवाभावाचे ।

शब्दाशब्दात अंतर किती
दोनच शब्द करती क्षती ।
दोनच शब्द अंतरात
उजळी भावनांच्या वाती ।

शब्द गोड मधुर किती
त्यात शर्करेचे गोडावा ।
तोडती जे हृदयाचे बंध
हात तयासी जोडावा ।

भेद शब्दाशब्दात कसा
हवा मायेचा ओलावा ।
शब्दवाचून जे सार्थ होते
तो शब्दची तेथे टाळावा ।
Sanjay R.