कृष्ण सावळा

काळा काळा
कृष्ण सावळा
मागे गोपिकांचा मेळा
मानमोहना तू रे
लाविला साऱ्यासी लळा
एक राधा ती
प्रेम फुलले अंतरात
तिज भासे तू निळा
फुलला बहरला मळा
सूर बासरीचे तुझ्या
तृप्तीचा आनंद वेगळा
Sanjay R.

मी वऱ्हाडी

वाट्ते ना भाऊ मलेबी
वऱ्हाडीचा अभिमान।

वऱ्हाडात जलमलोना
मुनच हाये मले साभिमान ।

लयच झालना का भौ
घेतो मी बी देवाची आन ।

साधाच मानुस मी
नको मले बापू मान पान ।

नसन ना हुशार मी
तरी हाये मले सारंच ग्यान ।

तुया इतलाच आसन मी
नको समजू मले ल्हान ।

जास्त नाई पर सांगतो तुले
लय फिरलो मी रान न रान ।

आरशात बी पाऊनच हावो
ठीक ठाकच हाये महा वान ।

कंदी मंदी पूजा बी करतो
देतो गरीबायले थोडं दान ।

बोललं कोनी का मंग ना
सुटते आपलंबी मंग भान ।

वरहाडाची मातीच अशी
काळी मुलायम लोण्यावानी छान ।
Sanjay R.

ओढ

नाकात नथनी
कपाळी टिकली

डोळ्यात तुझ्या
ओढ दिसली

थोडी तू हसली
अंतरात बसली

ये ना सखे तू
हृदयात ठसली
Sanjay R.

अंतरातला आवाज

आई हा अंतरातला आवाज
मम्मीला थोडा इंग्रजीचा साज ।

मम्मी असो वा आई कुणाची
नाते असे की शिरावरती ताज ।

तळ हातावर जपले तुज तिने
का इतकारे चढला तुज माज ।

नाकोरे धाडू वृद्धाश्रमी तिला
विकून खाल्ली कारे तू लाज ।

तुही जप ठेव तिच्या प्रेमाची जाणीव
आनंदी होईल दिवस तुझा आज ।
Sanjay R.

आई

आई आठवण तुझी करण्या
का हवा आजचाच दिवस ।
हावीस तू आम्हां साऱ्यासी
सुकर होईल जीवन प्रवास ।
Sanjay R.

राजकारण

राजकारण्यांचा धंदाच खोटा
मंग फिरतेत घेऊन लोटा ।
लय फसोल भौ दाऊन पंजा
भरून घेतल्या आपल्या गनजा ।
Sanjay R.

” साल्याच लगन “

साला महा हाये
भौ लयच भारी ।

नाई आठवत आता
त्यांन कितीक पायल्या पोरी ।

म्हने पायजेन मले
फकस्त बायको गोरी ।

त्याची बिन गोठ
हाये ना खरी ।

कोणीच न्हायी गोरं
त्याच्या बंद्या घरी ।

सबन ढेकल
कायी माती तरी बारी ।

मजबूत लय त्याची
लग्नाची दोरी ।

भेटली लेकाले
बायको गोरी गोरी ।

दिस ठरला लग्नाचा
झाली सगयी तयारी ।

येळेवरच फुगला
इतला थो भारी ।

मने देईन बुलेट त
येतो मांडवा च्या दारी ।

न्हायी मनसान त
जातो मा घरी ।

पोरी चा बाप आला
मारूतीच्या पारी ।

मने चाला ना बापु
देतो गाडी घरी ।

बसून नेजा पोरीले
हाये थे कारभारी ।

तवा आला साला
मांडव घरी ।

खुश हाये आता
फिरते बुलेट वरी ।

बायको बी त्याची
हाये थोडी बरी ।

बांधून ठिवलं लेकाले
त्याची जीरावते पुरी ।
Sanjay R.

गुलाबाच्या फुला

वाह रे वाह तू
गुलाबाच्या फुला
कुणी रे असा गोड
रंग दिला तुला ।

सुंदर किती रे
या कोमळ कळ्या ।
नाजूक नाजूक
तुझ्या पाकळ्या ।

मोहक तुझे रूप
लवितोस लळा ।
रंगांची उधळण
नटतात माळा ।

सुगंध तुझा रे
मोहवितो मला ।
मनातले गुज
कळले का तुला ।
Sanjay R.

प्रकाश मंद

असाच माझा हा छंद
कधी मन होतं बंधुंद ।

परासातला सुगंध
प्रकाश चांदणीचा मंद ।

वाटा अंतरातल्या रुंद
परी नाहीत कुठले बंध ।

सांग सखे तू मजला
होऊ दे मनास स्वछंद
Sanjay R.

परी

नाकात नथनी
गालावर हसू
सांगा ना मला
दिसते का सासू

वर्हाडी लुगड्याला
पदर जरीचा ।
शोभला ना मला
वेश हा परीचा ।
Sanjay R.

खो जाता हु

देखकर मै
मुसकुराहट तुम्हारी
न जाने क्यु
बेचैन हो जाता हु ।

कुछ सपने कुछ यादे
तुम और हम
वक्त की आघोशमे
बस युही खो जाता हु ।
Sanjay R.

काम काम काम

करा पाहिले काम
तरच मिळेल आराम ।

प्रश्न पोटा पाण्याचा
मोजावे लागतात दाम ।

ऊन असो वा पाऊस
नाही कष्टाला विराम ।

महागाई भिडली आकाशी
बघूनच आता फुटतो घाम ।

जाइल जीव तेव्हाच आता
मिळेल जीवाला विश्राम ।

जाऊन वरच आता सारे
घेऊ श्री हरीचे नाम ।
Sanjay R.

नशा

नशा ही नशाच असते
प्रत्येकाची आगळीच तर्हा असते
नशेत होतात सगळे दंग
वातावरण होते मग स्वछंद
कुणी पेल्यात झिंगलेय
कुणी पानात रंगलेय
कुणी मैफिलीत जमलेय
कुणी ठेक्यात नाचलेय
मला नशा आहे तुझ्या प्रेमाची
ओढ तुझ्याबरोबर फुलण्याची
होऊ दे त्या नशेत बेधुंद
घेऊन तुझ्या प्रेमाचा आनंद

” भ्रमर दिवणा “

फुल उमले पाकळी
गाली हळूच खळी
लाजून जाई बावळी
जणू नाजूक कळी

भ्रमर हा दिवाणा
फिरतसे राना वना
का गातसे गाना
जवळी येण्याचा बहाणा

भ्रमर हा स्वछंद
फुल होई बेधुंद
घेऊन हळूच मकरंद
होतसे मग आनंद

अकोला संमेलन

अकोला वऱ्हाडी संमेलनाचा
थाटाच काही और होता ।

सगळेच होते नटून थाटून
खुशीचा तो दौर होता ।

धोतर सदरा टोपी कुणाला
तर नऊवारी पातळात जोर होता ।

बोली वर्हाडी साहित्य वर्हाडी
जेवण वऱ्हाडीचा शोर होता ।

उत्साह आनंद वऱ्हाडी सुगंध
माझ्या वऱ्हाडीचाच सूर होता ।

मित्र मैत्रिणी ओळख पाळख
आपुलकीचाच तिथे पुर होता ।

पुष्पराज दादा श्याम भाऊ
या सुंदर आयोजनाला
तुमचाच तर आधार होता ।

स्मरणात राहील हे संमेलन
भेटू सारे परत हाच निर्धार होता ।
Sanjay R.