तरुण भारत द्वारा माझ्या वाढदिवसाची अनोखी भेट ।आजच्या तरुण भारत पुरवणीत प्रकाशीत माझी कविता । संपादकांचे खुप खुप आभार ।।
दिनांक 30.07.2017
दुर दुर त्या आकाशात
ग्रह तार्यांच्या पल्याड
काय असेल बरं ।
इथेच खोल अंतरात
ह्रुदयाच्या कपाटात
मन असते का खरं ।
सतत धावतात विचार
नसतो कुठला आधार
देउन जातात प्रहार ।
मिटुन थोडे डोळे
शांत थोडं बसुन
घेइल मन आकार ।
स्वच्छ निरभ्र आकाशात
सुर्याच्या प्रकाशात
कळेल जिवनाचा सार ।
सुख दुखः सखे सोबती
जिवनाची एकच गती
उलगडलेला एक विचार ।
Sanjay R.
पावसा पावसा
नसला तु तर
सार्यांनाच फुटतो घाम ।
असाच थोडा
करत तु जा
मधे मधे मुक्काम ।
नदी नाले
भरुन थोडे
टाक घेउन आराम ।
पीक पाणी
झाडं झुडपं
फुलव निसर्ग तमाम ।
केलास ना तु
आता थोडासा मुक्काम
थांबलेत सगळे काम धाम ।
करु दे थोडी कामं
तोवर तुला
मिळेल छान आराम ।
असाच कधी मधी
जात येत रहा मग
सारेच करतील सलाम ।
Sanjay R.
” कैसा ये बुढापा ”
आज क्यु हम अकेले है ।।
धुल मीट्टी यही पर तो खेले है ।
सीखे थे जब चलना हम
गिरते उठते फिर चलते संभले है ।
आज क्यु हम अकेले है ।।
पढ लिख कर अब पहुचे यहा
उन तमाम गुरुओके हम चेले है
लाख तुफान आये फीर भी
अबभी खुदको संभाले है ।
आज क्यु हम अकेले है ।।
ताकद हिम्मत थी जब साथ हमारे
आज वहीतो दुनिया वाले है ।
थक से गये मर से गये
जिंदगी अब हम तेरे हवाले है ।
आज क्यु हम अकेले है ।।
दिन गिनके हम जिते अब भी
कोइ बता दे फीर भी क्यु लाले है ।
खोल दे अब तु बंद दरवाजा
प्रभु हम तेरे घर वाले है ।
आज हम क्यु अकेले है ।।
Sanjay R.
स्वप्नांच्या या दुनियेत
आहे स्वागत सर्वांचे ।
विचार झालेत स्वैर
राज्य इथे दुष्टांचे ।
सफर अंतराळाची करा
घर तिथे चांदण्यांचे ।
भुतलावर चालाल तर
घाव झेला माणसांचे ।
आकशी चंद्राची शितलता
धरेवरी सुर्याची प्रखरता ।
विचारांचे बांध तुटले
पुर वाहताहेत रक्तांचे ।
आसुसलेली माणसं इथं
वैरी आहेत एकमेकांचे ।
नाही उरले काळीज कुठेच
ढीग लागले प्रेतांचे ।
सुर्यावरच जाउ आता
लाकडं वाचतील दहनांचे ।
कोण कुणाचा काय लागतो
उघडे दार मरणाचे ।
आसवांना नाही थारा
शब्द गुंजतात हास्याचे ।
Sanjay R