” जिवन असच संपणार आहे “

1017308_643560125657065_46937380_nशब्दांशी जुळल तर होते कवीता
नाहितर बघा रागावते सवीता ।
आठवणींचा डोंगर करावा रीता
कदाचीत त्यान हसेल स्मीता ।
खरं सांगेल मी घेउन गीता 
सुस्मीते आहे तुझीच ग ही कवीता ।
Sanjay R.
 
कुणाला काय सांगाव
जिवन असच संपणार आहे ।
काय हवं काय नको
चिंता का कधी सरणार आहे ।
दिवसा मागुन दिवस जाताहेत
कोण सुर्यासी धरणार आहे ।
इच्छा आकांक्षा दुनियेच्या
घेउन चिंता मी मरणार आहे ।
Sanjay R.

निघालो सारे आम्ही प्रवासाला
लक्ष ठेवीले प्रथम विकासाला ।
जंगल झाडे नद्या नाले
पशु पक्षी जिव जंतु
नाही कुणीच विचाराला ।
वाढवायचे आहे काॅक्रीट जंगल
ठेवीली शेतं आता सुकायाला ।
पोटा पाण्यचा प्रश्ण बिकट
बळीराजा आला शहराला ।
Sanjay R.

घे दिली तुज कटकट ।
दिवस रात्र वटवट ।
थोडीशी आहे नटखट ।
शुभ मुहुर्त आहे जवळ ।
उरकुन घे झटपट ।
Sanjay R.

खंत मनात अजुनही बाकी ।
करायच काय होत
आणी काय करुन बसलो ।
असतांना लहान मी वाटायच
व्हाव मस्त पोलीस ।
हाती बंदुक घेउन
चोरांच्या माग धावाव ।
ढुशुम ढुशुम करून
लोकांचा आवडता
हीरो बनाव ।।

शाऴेत असतांना वाटायच
मास्तर व्हाव ।
छडी घेउन सगळ्यांना
खुप रडवाव ।।

अजुन थोड मोठ होताच
वाटायच तस्कर
सोन्यचा व्हाव ।
सोन्याच्या बिछान्यावर
आरामात लोळाव ।।

नंतर वाटायच
शास्त्रज्ञ व्हाव ।
कुणी नसेल शोधल
ते आपण शोधाव ।
न्युटन सारख आपल पण
नाव कराव ।।

कधी वटायच
डाॅक्टर व्हाव ।
गरिबांना फुकटात
औषध द्याव ।
सगळ्याना खुप
आनंदी कराव ।।

काही करायची वेळ आली
तेव्हा वाटल ।
शेती संशोधक होउन गावी
शेतात काम कराव ।।
सगळ मनातल
मनातच राहील ।
आणी ईंजिनीअर
होउन शिकलो ।
मनातल मनात
कस ठेवाव ।
Sanjay R.

मन उदास असलेना
कि आभाळ भरुन येते ।
आणी विज कडाडताच
नेत्रातुन बरसु लागते ।
धरतीला सोइरसुतुक नसते
पाण्यात मस्त चिंब भिजते ।
हवेच्या झोक्यासंगे हलकेच
अंग झुलवत आनंदान हसते ।
sanjay R.

सम्मती दीली शेवटी
मनाला स्वच्छंद विहरण्या ।।
Sanjay R.

का जगणे असतो येक छळ
मग मरणाने होते सुटका ।
आनंदात जिवन जगा
सहजतेन पार होइल नौका ।
sanjay R.

नकोच त्या आठवणी ।
काढावी येक तर
असंख्य पुढ्यात येउन
मनात करतात घर ।
जिवनच नकोस होत
मनात दुंखाःची भर ।
sanjay R.

काय वर्णावे
तुझे सौदर्य ।
डोळे दिपवणारे
तुझे लावण्य ।
बघत रहावस
खुप वाटल ।
नाही जमल मला
स्वतः ला तुझ्या
नेत्रात निरखण ।
नजरेला तुझ्या
नजय भिडवण ।
ओठांना तुझ्या
ओठांनी टिपण ।
राहुनच गेले
तुझा हातात
हात घेण ।
परत मेटीची
आशा जागवण ।
कुणास ठाउक
कळल का तुला
मनातल दुखण ।
आवडेल मला
परत परत भेटण ।
sanjay R.

साथ सोबत माझी तुला
नाही इतकी दुर ।
गाणे जिवनाचे सजवु
येक ताल नी येकच सुर ।
sanjay R.