कुणी कौणाला
त्रास देउ नये ।
विनाकारण कुणी
फास घेउ नये ।
दुसर्याच्या वस्तुचा
ध्यास धरु नये ।
आपणच आपला
नाश करु नये ।
Sanjay R.
किलबील किलबील पाखरांची
घाइ आकाशात सुर्याची ।
लगबग परतीची माणसांची
चाहुल लागली अंधाराची ।
Sanjay R.
कालच भेट झाली हो
तशी माझी त्या यमाशी ।
म्हणाला खुप कामं आहेत
गठबंधन झाले ISI शी ।
छोट्या मोठ्या विचारु नका
बर्याच आहेत एजंशी ।
वेळेआधीच डिलीव्हरी मागतात
गाठ आहे आतंक वादाशी ।
श्वास घ्यायला फुरसत नाही
बांधले आहोत आम्ही कराराशी ।
Sanjay R.
चला खेळु या रंग ।
येणार कोण संग ।
Happy holi….
बघु या आता
कसा रंग लावतील ते ।
टाळुन ओले रंग
पाणी वाचवतील ते ।।
Sanjay R.
दिसेल ते बघायचं
असेल ते भोगायचं ।
आहे त्यातच
आनंदानं जगायचं ।
जिवनाचं सत्य
त्यातच शोधायचं ।
Sanjay R.
हसायचं म्हटलयावर
कसं ते जमवायचं
कोणी मजला सांगेल का ।
वातावरण मात्र मस्त हवं
नको आनंदात विरजण
खळखळुन हसायला जमेल का ।
मधे आलं होतं डोक्यात माझ्या
हास्य क्लबात जावं तिकडं
आनंद तिथं हवा तसा मिळेल का ।
घरीच करु या प्रयत्न थोडा
हसु या सारे मिळुन मिसळुन
थोडं थोडं घुसळुन घुसळुन
घर आनंदानं छान फुलेल ना ।
चला हसु या सारे मिळुन
आनंदानं थोडं खिदळुन
चेहर्यावर खुशी छान दिसेल ना ।
Sanjay R.
कंटाळा येतो ना
हलो हलो करायचा ।
मिळेल केव्हा वेळ
शांतपणे बसायचा ।
चला जाउ दुर कुठे
शीण घालउ मनाचा ।
होउन हलकं थोडं
विसावा घेउ क्षणाचा ।
Sanjay R.
जब जब रुठ जाती हो तुम
गुलाब भी पड जाते है कम ।
देखकर मुस्कुराहट तुम्हारी
भुल जाता हु मै अपने गम ।
साथ दुखो का सागर मगर
भुल जाता तब मै दर्दे वहम ।
याद आती जब मोहब्बत हमे
हो जाती तब आखे नम ।
Sanjay R.