” आला श्रावण आला “


सजणे ठसली ग
तु माझ्या मनात ।
हरवु दे मजला
तुझ्याच प्रेमात ।
घे साठउन मज
खोल डोळ्यात ।
गुंफु दे आज
ओठ ओठात ।
वाढु दे स्पंदन तु
ये बाहुपाशात ।
घे भरभरुन तु
सुख रोमरोमात ।
Sanjay R.

” वाढदिवस माझा “

वाढदिवसाची झाली
पुर्ण आज हौस ।
शुभेच्छांचा पडला
कीती मोठा पाउस ।

बघुन प्रेम मित्रांचे
भरुन आले मन ।
वेचला मी आनंदाचा
प्रत्येक तो क्षण ।

जिवनार्थ आज
मजला कळला ।
एक एक धागा
मित्रांनीच जुळला ।
Sanjay R.

” जिंकु या स्वर्ग “


सोडुन कुणीच जात नाही
सगळे असतात धरुन ।
नसेल विश्वास तर
पहा एकदा मरुन ।
यमाचा दरबार मोठा
या थोडे फिरुन ।
जिवन तर रोजचेच आहे
जाउन या थोडे
हवा पालट करुन ।
सांगतात लोकं
थाट अजब आहे
पाप पुण्याचा हिशोब
देतात तीथे करुन ।
इथलं इथच सारं
द्यावं लागतं भरुन ।
कर्म करा चांगले
मिळेल फळ भर भरुन
जिंकायचाच आहे स्वर्ग
राहु तीथं स्मरुन ।
Sanjay R.

” साथ “


चल उड चले
दुर कही आकाशमे ।
जहा होगे बादल
चांदके आंगन मे ।
तु मै और चांद
होंगे हम साथमे ।
साथ तेरा मेरा
हात तेरा हातमे ।
Sanjay R.

” कसम “


आओ करे हम
साफ सफाइ ।
गंदगी ना रहे
इलाके मे कही ।
चाचा चाची
बहन भाइ ।
सबने मिलके
स्वच्छता लाइ ।
स्वच्छ भारत की
कसम खाइ ।
Sanjay R.

” हीच तुझी अदा “


उमलली चेहर्यावर
हास्स्याची एक कळी ।
खुलुन दिसते बघ
तुझ्या गालावर खळी ।

हिच तर अदा तुझी
वेडावते मला ।
भिरभिरते नजर माझी
शोधते फक्त तुला ।

बघताच रुप तुझे
होती जागे तराणे ।
प्रित तुझी माझी
आणी गुंजते प्रेमगाणे ।
Sanjay R.

” गोड गळा “

गोड गळा
कपाळी टीळा ।
मुखकमला वरी
हास्य खळखळा ।

नेत्रात आशा
आनंदाच्या कुशा ।
उत्साह मनात
उधळण दश दीशा ।

हलकेच वारा
कधी पाउस धारा
मनाचा पिसारा
मेघ नाचे जरा ।
Sanjay R

” प्रेम विचारांचा सागर “


प्रेम
विचारांचा अथांग सागर
आनंदाचा जागर ।

प्रेम
हवी हवी वाटणारी ओढ
स्वप्नातली जोड ।

प्रेम
मनात खुलणारी नाजुक कळी
जशी गालावरची खळी ।

प्रेम
आईचा वात्सल्ल्याचा झरा
तान्हुल्यास ह्रुदयाचा कोपरा ।

प्रेम
प्रितीचा अतुट बंध
घेतला लिहायला तर होइल निबंध ।

Sanjay R.

” सरळ ती वाट “

मनातलं तुझ्या
कळु दे मला ।
का असेल तेच
सांगायचं तुला ।

ओढ तुझी मज
स्वस्थ बसु देइ ना ।
मनही तुजवीण काही
मज सुचुच देइ ना ।

धार तुझ्या शब्दांना
आली आज फार ।
करेल का गं नौका
समुद्र पार ।

काळा टीळा उचलतो
सौंदर्राचा भार ।
स्वप्नातही आठवण तुझी
सतावते फार ।

सरळ ती वाट
नाही कुठल्या नागमोडी ।
होताच पहाट
वाटे रात्र कीती थोडी ।
Sanjay R.

” पर्यावरण आणी आम्ही “


आम्ही जिथे राहतो तीथे आमच्या आजुबाजुला जर थोडी नजर टाकली तर
आम्हाला आमच्याच कर्तुत्वाचे दर्शन घडेल ।
पण आम्ही त्या सगळ्याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत पुढे चालतो ।एक दिवस हेच आमचे दुर्लक्ष आम्हास भक्ष करुन टाकेल यात काहीही  संशय नसावा ।
आम्ही आमच्या घरातला कचरा कचरा षेटीत न टाकता सरळ रस्त्याच्या कडेला टाकतो । आणी परीसरात घाण करवुन घेतो ।
आम्ही आमच्या रोजनीशीच्या सवयींना पण
इतके आळशी आणी विवेकहीन करवुन पाकले आहे की आमचेच आम्हाला पर्यावरणाचे भान राहीलेले नाही ।
कचरा फेकणे कुठेही थुंकणे नको त्या वस्तु जाळुन धुर करणे प्लाष्टीकचा वापर आणी ते कुठेही फेकणे अनाठायी विजेचा वापर अशा अनेक गोष्टींवर आम्ही जर नियंत्रण मिळविले तर नक्कीच आम्ही पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करु शकु ।

आपण थोडे जर औद्योगीक क्रुतींकडे लक्ष टाकले तर पर्यावरणाचा नाश करण्यात त्यांचाही वाटा सगळ्यात मोठा आहे हे लक्षात येयील ।कारखाने दिवस रात्र वर्षो … न गणती पर्यावरणाशी खेळत आहेत । त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण उरलेले  नाही असे लक्षात येयील । कायदे आहेत पण ते सारे पैशापुढे लोळण घेतात । यथा राजा तथा प्रजा ।आमचे सरकारही काही करु इच्छीत नाही । युरोप अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे फार कडक आहेत । म्हणुन तिकडचे सारे प्रोसेसींग युनीट्स भारतात आणी इतर आशियन देशात स्थलांतरीत होत आहेत। आणी आम्ही आपल्या हाताने आपल्या पर्यावरणाचा विनाश करुन घेत आहोत । या बाबींकडे आम्ही आणी आमच्या सरकारने लक्ष द्यायला हवे । राष्ट्राचा विकास साधताना पर्यावरणाचा बळी जाता कामा नये । नाहितर सगळे संपल्यावर रडायलाही कोणी उरणार नाही ।
तेव्हा आपण आज शपथ घेउ या की आम्ही सारे मिळुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासमदत करु या ।
जय भारत ।
स्वच्छ भारत ।

sanjay Ronghe
Nagpur

” चारोळी मनाची “


सोबत कुणाची
कीती गुणाची ।
गोष्ट मनाची
नाही जनाची ।
खुशी कणाची
सुखी जिवनाची ।
Sanjay R.

न होगी ओठोकी मजबुरी
न होगी उनमे दुरी
ना कहानी यह अधुरी
बात दिलकी दिलमे पुरी

वाट जरी असेल काटेरी
शालु गुलाबाचा भरजरी
उत्साह भरला मनात
खिळली नजर तुजवरी ।
Sanjay R.

गुंतले मन तुझ्यात
वसली तु ह्रुदयात ।
वाटतं खुप भिजावं
चल जाउ पावसात ।
Sanjay R.

” पंढरीची वारी “


पोहोचली वारी
विठ्ठलाच्या द्वारी ।
दुमदुमली पंढरी
विठ्ठलमय सारी ।
पाडुरंगाचा जयघोश
फुलल्या दिशा चारी ।
पांडुरंग हरी ।
पाडुरंग हरी ।
विठ्ठल विठ्ठल
जय हरी ।
Sanjay R.

” ह्रुदय पटल “


ह्रुदयाच्या पटलावर
रंगवीले मी एक स्वप्न
स्वप्नात बघतो मी
दोघांचही एकमेकांना जपणं ।
नको वाटतं मला आता
नजरेचं नजरे पासुन लपणं ।
बघ नजरेत झाकुन जरा
सुखावतं मनास तुझं हसणं ।
Sanjay R.

येयील तो क्षण
तुटतील मनाचे बंध ।
तु आणी मी
एक वेगळीच धुंद ।
Sanjay R.

” सच्ची बात “


जो सच्ची बात है ।
वो अच्छी बात है ।
बात अगर हो झुटी
भरोसा तुटा और
जबान फुटी ।
इज्जत आबरु
सब लुटी ।
Sanjay R.

कुणी सहज विचारावं
प्रेम म्हणजे काय ।
आई आणी
तीच्या मुलातल
भावा बहीणीतल
बाप लेकीतलं
दोन मित्रातलं
पती पत्नीतलं
कुठल्याही नात्यातलं
बाधुन ठेवणारं
बंधन प्रेमाचच असावं
ही सारीच नाती
प्रेमानं बांधलेली
प्रेमातुन काय सुटेल ।
दोन ह्रुदय ही
प्रेमा वीणा
का धडधडतील ।
प्रेमच माणसाला
प्रेमानं जगवतील ।
प्रेमा शिवाय
नाही काही ।
Sanjay R.

” डोळ्यात पाणी “

माणसाचा अविचार
पाणी आणतो डोळ्यात ।
थेंबा थेंबाचा हिशोब
हुंदका दाटतो गळ्यात ।
फुल होण्या आधीच
नसतो गंध कळ्यात ।
Sanjay R.

” माणुसकी “

सरली आता माणुसकी
उरला नाही माणुस ।
खुप छळतो मनाला
नको जास्त ताणुस ।
दुख: आहे सगळीकडे
नको डोळ्यात पाणी आणुस ।
प्रेम द्या प्रेम घ्या
दुर नको पळुस ।
Sanjay R.

” इजहार “


क्यु तेरा इनकार
कर दो इकरार ।
जहा न हो प्यार
जिंदगी बेकार ।
दिल का इजहार
आखो मे इंतजार ।
Sanjay R.