” पोटाची खळगी “

पोटाची खळगी

पोटाची खळगी
उन्हाचा गारवा
कष्टाचा डोंगर
घामाचा शिरवा
sanja R.

वेध तुझ्या मनीचे

कळले कधीच मजला
वेध तुझ्या मनीचे
जपले ह्रदयात मी
वचन स्वप्न पुर्तीचे
नको विझवु ज्वाळा आता
बंधन बांधु रेशीमबंधाचे
sanjay R.

तुच माझी साथी

मनावर ताबा ठेवणे
नसतो कुणाच्या हाती ।
स्वप्न तुझी मला
छळतात दिवसा अन राती ।
जळी स्थळी पाताळी
असतेस तुच माझी साथी ।
तुजवीण मज आता
नकोत कुठलीच नाती ।
sanjay R.

जिवनाची हार

चर्चेचा सार
भुइला भार
जिवनाची हार
तार तार
sanjay R.

मैत्री

मैत्री विना
जिवन अधुरे ।
सोबत मित्रांच्या
न पडणार
काही अपुरे ।
sanjay R.

पर्यावरण आणी आम्ही

यथा राजा तथा प्रजा

थोडे औद्योगीक क्रुतींकडे
लक्ष टाकले तर पर्यावरणाचा
नाश करण्यात त्यांचा वाटा
सगळ्यात मोठा आहे ।
कारखाने दिवस रात्र वर्षो …
न गणती पर्यावरणाशी खेळत
आहेत । त्यांच्यावर कोणाचेच
नियंत्रण नाही । कायदे आहेत
पण पैशापुढे लोळण घेतात ।
यथा राजा तथा प्रजा ।
आमचे सरकारही काही करु
इच्छीत नाही । युरोप
अमेरीकेत पर्यावरणाचे कायदे
फार कडक आहेत । म्हणुन
तिकडचे प्रोसेसींग युनीट्स भारतात
आणी इतर आशियन
देशात स्थलांतरीत होत आहेत ।
आणी आम्ही आपल्या हाताने
आपले पर्यावरण खराब करुन
घेत आहोत । या बाबींकडे
आम्ही आणी आमच्या
सरकारने लक्ष द्यायला हवे ।
राष्ट्राचा विकास साधताना
पर्यावरणाचा बळी जाता
कामा नये । नाहितर सगळे
संपल्यावर रडायलाही कोणी
उरणार नाही ।
sanjay R.

” हसत हसत जगायच ”

मैत्री

मित्रांसाठी असते मैत्री
आणी मैत्री साठी मित्र
सुख दुखाःचा येता पाउस
दोघांसाठी येकच छत्र
sanjay R.

वक्त नहीगुजर जाता

वो वक्त नही
याद आता
वो पास नही
निंदमेभी अब
ख्वाब वही
तुमबिन दिलमे
कुछ आता नही
sanjay R.

सज्ज आमची सेना

शत्रुला तोंड देण्या
सज्ज आमची सेना
राहीली खुर्ची तरच
मदत आम्ही करुना
sanjay R.

हसत हसत जगायच

जिवन कस जगायच
हसत हसत उठायच
रागात थोड दिसायच
रडत रडत फिरायच
अस्वस्थ होउन निजायच
का क्षण न क्षण जिवनाचा
हसत हसत जगायच
sanjay R.

हसताना कस हसायच

हसताना कस हसायच
हळुच गालाला हलवायच
समोरचा हसत नसेल तर
आपणही चुप बसायच
आणी
रागाला लांबच सारायच
गाठीला बांधुन ठेवायच
कधी कुणाला नाही हसवायच
स्वतःला स्वतःतच बांधायच
मनसोक्त खुशीत जगायच
sanjay R.

” नाकात नथनी पायात पैंजण ”

ताल ढोलकीचा

हिरवा शालु
नाकात नथनी
पायात पैंजण
नाच बघा तुम्ही
माझा हो ।

मन फुलते
अंग डोलते
पाय थिरकते
ताल ढोलकीचा
घुमतो हो ।

रंग बहरले
मंच बहकले
मोकळे बंध
मन बेधुंद
मैफील धुंद
झाली हो ।
sanjay R.

रात्र पुनवेची

चंद्रच असेल तो न्हाउन गेला
चांदण्यास जो उजळुन गेला
नक्षत्राचे लेणे भाळी माळुन गेला
रात्र पुनवेची मद देउन गेला
sanjay R.

ओढ कवितेची

मनाचे मज काही
कळतच नाही ।
ओढ कवितेची तुझ्या
थांबवत नाही ।
बघुन कविता तुझी
जाण होते अस्तित्वाची ।
मनास मिळतो आनंद
का हे असे सांगशील का ।
sanjay R.

स्वप्न तारे

आठवणीत तुझ्या मी
विसरलो जग सारे ।
तुज शिवाय मज आता
सुचेना काही सारे ।
पण तुही कशी विसरली

सोबतीने बघीतलेली
स्वप्न तारे ।
वाहुन गेले घर वाळुचे

” जिवनाच्या रंगमंचावर “

आजची विशेष खबर

आजची विशेष खबर
सोने घेउन व्हा गब्बर
सचिन चार मुंबईची हार
अमेरीका हल्ल्यात गार
बंगलोरला बसला मार
पुढाऱयांना इलेक्षण ज्वार
आमच्या जिवनाची हार
मस्तीत आमचे सरकार
sanjay R.

परतीच्या वाटेवर

आठवण तुझी मज
घेउन आली
परतीच्या वाटेवर ।
तुझ्यावीना जगणे आता
जसे अनवानी पायांचे
चालणे काट्यांवर ।
sanjay R.

गुपीत

मनातल गुपीत तुझ्या
आभाळाला कळलं ।
चिंब भिजवुन तुला
पावसान छळलं ।
sanjay R.

जिवनाच्या रंगमंचावर

खरच स्त्रीचे जिवन
कठीण कीती ।
जिवनाच्या रंगमंचावर
भुमीका कीती ।
क्षणी आई क्षणी ताई
प्रत्येक क्षणाची येक राई
सोसणार कीती ।
sanjay R.

जिवनाचे बोल

जिवनाचे बोल
अवघड कीती ।
पहाडा इतके दुखः
सोसणाय कीती ।
sanjay R.

“सारंगीची झनकार”

दिल तुम्हारा

दिल तुम्हारा
जान हमारी
दिल हमारा
याद तुम्हारी
हाल हमारा
हसी तुम्हारी
साथ तुम्हारा
खुशीया सारी
sanjay R.

तरीही जगणार

होकार वा नकार
सारंगीची झनकार
नानाविधी प्रकार
काय कसे करणार
मनाचा स्विकार
जनाचा आधार
भुक वारंवार
धरतीला भार
कुणाकडे कार
कुणी घोडेस्वार
जित कधी हार
तरीही जगणार
sanjay R.

स्वप्नातली नुर

असलीस तु
जरी दुर ।
तुच माझ्या
स्वप्नातली नुर ।
कानी माझ्या
तुझाच सुर ।
तुच माझ्या
मनातली हुर ।
sanjay R.

नशीब आरषाचं

नशीब आरषाचं
सोबत तुझ्या हसायला
आम्ही का असे

” गुंफले श्वासात श्वास “

प्रेम

तुझे असे
हळुच डोकावणे
पुढे जाताच
मागे वळुन पाहाणे
करते मज शहाणे
असच असत ना
प्रेम जाणे अंजाणे
sanjay R.

मन

वाटत जवळ
तुला घ्यावे
आठांना तुझ्या
हळुच चुंबावे ।
मनात मन ओतुन
येकसंध व्हावे ।
sanjay R.

अस्तीत्व

तुझाच येक विचार
मनाला हलवुन गेला
साक्षात अस्तीत्व तुझे
तन सुखावुन गेले
sanjay R.

श्वास

तुझ्या अस्तीत्वाचा
होतो येक भास ।
चुंबन तुझ्या ओठांचे
गुंफले श्वासात श्वास ।
sanjay R.

आठवण

काहुर माझ्या मनात
ओढ कशाची तनात
आठवणींच्या भरात
तुनीमी येक स्वरात
sanjay R.

चांदनी रात

चांदनी रात है
अंधेरा साथ है
येकही बात है
आपके हात है
sanjay R.

भाव सोन्याचा

भाव सोन्याचा कसा उतरला
बायको म्हणते चला खरेदीला
दागीने खुप तीला बनवायचे
खिशाला माझ्या रडवायचे
चोरांना मात्र खुश करायचे
sanjay R.

सोन लय भारी

सोन लय भारी
पण आहे घरोघरी ।
चोरांचा डोळा
असतो दारी ।
फस्त करतात
करुन चोरी ।
बायकांना हौस
का आहे तरी ।
शेजारणीचा तोरा
करतो स्वारी ।
दागीना सोन्याचा
पाहिजेच घरी ।
म्हणुन सोन
आहे लय भारी ।
sanjay R.

” ओढ मनाची ”

होकार
होकार का
हुंकार तुझा
जिव बेचैन
झालाय माझा
सुर मधुर
शब्द तुझा
करील शांत
जिव माझा
sanjay R.

ओढ
कधी आणी कशे
कळणार तुला
ओढ मनाची
जडणार तुला
माझ्या मनात तु
ह्रदयाची हाक
ऐकणार तु
sanjay R.

साथ
मनासारख घडायला
नियतीची साथ हवी
आनंदान जगायला
पौर्णीमेची रात हवी
sanjay R.

स्पंदन

करु नकोस
विचारांचे मंथन
डोकाउन बघ
ह्रुदयाच स्पंदन
sanjay R.

सुकला गळा

सकाळी सकाळी
सुकला गळा
प्यायला भट्टीची
गावाकडे वळा
sanjay R.

” आम्हास बघा महादेवाचे नंदी “

प्रतीक्षा

डोळ्यात आसवांचे
थेंब झालेत जमा ।
प्रतीक्षा तुझ्या येण्याची
कधी संपेल ग रमा ।
उन पावसाची आता
नाही मजला तमा ।
नको अंधकारात लोटु
विझेल ही शमा ।
sanjay R.

फुंकर

घाव ह्रुदयावर
का करुन तु गेलीस
फुंकरही तुच घाल
आनंदानं मी झेलीन
sanjay R.

धुंदी

जिवन पाखरांचे
आनंदी स्वच्छंदी
आम्हास बघा
महादेवाचे नंदी
नाही आम्हा
कुठलीच बंदी
तरीही मोजतो
लांबी आणी रुंदी
सदानकदा दुःखी
पैशाचीच धुंदी
विसरलो माणुसकी
वेदनेतच आनंदी
sanjay R.

विचार

अफाट या दुनीयेत
कमतरता नाही कुठली
मनी विचारही अगणीत
ओढ मग संपणार कुठली
दोरी जिवनाची हाती त्याच्या
क्षुधा मनाची भागणार कुठली
sanjay R.

“अंतरात तुझीच प्रतीमा”

Image

अथांग या गर्दीत

नाही कुणाचा ठावठिकाणा

कळसा काखेत ठेउनी

शोधतो माझी सगुणा

नजरेत भरुन ठेवीली

प्रतीबिंबीत तुझी कल्पणा

जगायचे कसे आता

अंतरात तुझीच प्रतीमा

sanjay R.

 

” विचारही अगणीत “

विचार

अफाट या दुनीयेत
कमतरता नाही कुठली
मनी विचारही अगणीत
ओढ मग संपणार कुठली
दोरी जिवनाची हाती त्याच्या
क्षुधा मनाची भागणार कुठली
sanjay R.

” आनंदी स्वच्छंदी “

जिवन

जिवन पाखरांचे
आनंदी स्वच्छंदी
आम्हास बघा
महादेवाचे नंदी
नाही आम्हा
कुठलीच बंदी
तरीही मोजतो
लांबी आणी रुंदी
सदानकदा दुःखी
पैशाचीच धुंदी
विसरलो माणुसकी
वेदनेतच आनंदी
sanjay R.

” कळीचे हळुच डोकावणे “

आई

आईचे प्रेम आईच जाणी
कशी घेणार ती जागा कोणी
बाळाची सुखदुखः तिच जाणी
पण तिच्या दुखाःत नाही कोणी
sanjay R.

फुल

कळीचे हळुच डोकावणे ।
फुल म्हणुन उमलणे ।
सोबतीला गंधाचे लेणे ।
हळुच पाककऴयांचे गळणे ।
बाजुच्या कळीचे
परत डोकावणे ।
निसर्गाच्या नियमात जगणे ।
परी इतरांना सुखावणे ।
मात्र आनंदी आभ्ही
क्रुत्य आमचे इतरास दुखावणे।
sanjay R.

चांदपे तुझे मै ले जाउ

निंद तेरी मै चुराउ
चांदपे तुझे मै ले जाउ
अपनी तुझे भै बनाउ
सासे तेरी मै सजाऊ
sanjay R.

विवाह

ते येकमेका पसंत करतात
बंधनात विवाहाचे पडतात
दोघेही येकमेकाचे चंद्रचांदणी
लैला मजनु न राजा राणी
गातात जिवनभर गित गाणी
सुंदरता मग गौण होते
साथ जन्माची रुजते मणी
sanjay R.

स्वप्न

कधीचीच वाट
बघतोय मी तुझी ।
केव्हा येणार तु
अधीर कव माझी ।
केव्हा बिलगशील तु
मज माझी होउन ।
दोन थेंब प्यायचेत मला
ओठ ओठांशी घेउन ।
धग ह्रदयाची लय
धरु आपण येक ।
भिजुनी चींब होउ
छत आभाळाचे नेक ।
नको प्रतीक्षेत ठेउ
मन अधीर आता ।
श्वासात श्वास गुंतला
स्वप्न पुर्ण करु आता ।
sanjay R.