” चाहुल उन्हाळ्याची “

चाहूल लागता उन्हाळ्याची
घसाही कोरडा पडू लागतो |
पाहताच थंड पेयाची गाडी
तहान अजुनच वाढते |
गळा ओला होताच
कस शांत त्रुप्त वाटते |
Sanjay R.

image

आला आला गुढी पाडवा
शेतात आता माणुस नवा ||
मेहेनत करू खूप देवा
पोट भरेल इतकाच दे
नाही आम्हा जास्त हेवा ||
Sanjay R.

” माणुस “

गर्दीत माणसांच्या
माणुस शोधायचा  ।।
मिळाला माणुस तर
त्यास देवच म्हणायचा ।।
Sanjay R.

नशीब तुझे चांगले
इथ तु हरवली नाही |
गर्दीत माणसांच्या
माणुसच उरला नाही ||
Sanjay R.

image

” झाले दौरे सुरु “

झाले दौरे सुरु
नेताजींचे दारोदारी ।
पाच वर्ष दिसणार नाहीत
सांगा यांना कुणीतरी ।
Sanjay R.

image

ये जवानी ये दिवानी
चल बनाये एक कहानी ।
मै राजा तु मेरी रानी
होंगे कभी हभ नानानानी ।
Sanjay R.

” खेळु रंगांची होळी “

का ग राधे तु
म्हणवतेस स्वता:ला भोळी ।
जबरदस्तीन भरवलीस
मजला तु पुरण पोऴी ।
भिजायच होत तुला
खेळुन रंगांची होळी ।
नवरंगांनी नटलीस
चिंब भिजली साडी अन चोऴी ।
Sanjay R.

ज्याच जळत
त्यालाच ते कऴत ।
बाकीच्यांच काय
पैशान सार मिळत ।
Sanjay R.

आली आली  होळी आली ।
नवरंग ती उधळत आली ।।
रंग फासण्या तुमच्या गाली ।
फुलवी ओठी हास्याची लाली ।।
Sanjay R.

आली आणी गेली
रंगांची होली ।
निघता निघेना
गालावरची लाली ।
Sanjay R.

देखो आई रंगोकी होली ।
खाकर देखो भंग की गोली ।
ना करो ऐसी सुरत भोली ।
भर देंगे रंग हम साथ है टोली ।
ना मानेंगे अब दो जितनी गाली ।
खिलेगी अब ओठोकी लाली ।
Sanjay R.

image

” परमार्थ “

शोधताना तुझ्या
शब्दातले अर्थ
होउ नये माझ्याकडुन
कुठला काही अनर्थ ।
नेहमीच कदाचीत
बघताना असेल
माझाच स्वार्थ ।
त्यातुनच कदाचीत
लाभेल आपल्या
जिवनाला परमार्थ ।
Sanjay R.

” पावसाच्या धारा “

पावसाच्या धारा
सोबत बेभान वारा ।
गार गार गारा
पडला थंड पारा ।
टक लाउन बळीराजा 
नभात शोधतो तारा । 
Sanjay R.

image

कुठ बायको तर कुठ 
नवरा असतो संशयी ।
एकमेका जपता जपता
मनाची होते लाही ।
Sanjay R.

image

” लपवतात गालात आपलेच हसे “

कधी केव्हा काय कसे ।
जसे देवाने दिले तसे ।
कोण कोणास प्रेमान पुसे ।
स्वार्थाच्या खेळात सारे फसे ।
मिरवतील तोरा कोणी कसे ।
लपवतात गालात आपलेच हसे ।
Sanjay R.

” काळ्या काळोखात “

काळ्या कुट्ट काळोखात
एक आक्रुती हलकेच सरकली ।
घामान ओला चिंब झालो
श्वसांची गतीही थोङी बहेकली ।
सुसाट वेगान सुटलो पळत
चक्र पायाची अशी फिरली ।
फिरुन परत तिथच आलो
एक नवी आक्रुती माझी झाली ।
Sanjay R.

धागा मैत्रीचा असतो अनमोल ।
विश्वासाचा यात महत्वाचा रोल ।
वाटायचे सुखदुख: ह्रुदयी खोल ।
ढळु नये यात मनाचा तोल ।
टळतील मग अविश्वासाचे बोल ।
मैत्रीचे नाते रुजेल खोल खोल ।
Sanjay R.

हे जिंदगी
चलने को हम है तय्यार ।
रासता है कुछ दुर
लौटा दे मुझे मेरा प्यार ।
Sanjay R.

कुणाला काय सांगाव
जिवन असच संपणार आहे ।
काय हवं काय नको
चिंता का कधी सरणार आहे ।
दिवसा मागुन दिवस जाताहेत
कोण सुर्यासी धरणार आहे ।
इच्छा आकांक्षा दुनियेच्या
घेउन चिंता मी मरणार आहे ।
Sanjay R.

शब्दांशी जुळल तर होते कवीता
नाहितर बघा रागावते सवीता ।
आठवणींचा डोंगर करावा रीता
कदाचीत त्यान हसेल स्मीता ।
खरं सांगेल मी घेउन गीता
सुस्मीते आहे तुझीच ग ही कवीता ।
Sanjay R.

कुणाला काय सांगाव
जिवन असच संपणार आहे ।
काय हवं काय नको
चिंता का कधी सरणार आहे ।
दिवसा मागुन दिवस जाताहेत
कोण सुर्यासी धरणार आहे ।
इच्छा आकांक्षा दुनियेच्या
घेउन चिंता मी मरणार आहे ।
Sanjay R.

निघालो सारे आम्ही प्रवासाला
लक्ष ठेवीले प्रथम विकासाला ।
जंगल झाडे नद्या नाले
पशु पक्षी जिव जंतु
नाही कुणीच विचाराला ।
वाढवायचे आहे काॅक्रीट जंगल
ठेवीली शेतं आता सुकायाला ।
पोटा पाण्यचा प्रश्ण बिकट
बळीराजा आला शहराला ।
Sanjay R.

घे दिली तुज कटकट ।
दिवस रात्र वटवट ।
थोडीशी आहे नटखट ।
शुभ मुहुर्त आहे जवळ ।
उरकुन घे झटपट ।
Sanjay R.