” चला फिरायला “

चला आता जायच फिरायला
स्कुटर वर बसुन फिरायची
सर यायची नाही कशाला ।
भरुन पेट्रोल निघायचे सफरीला ।
बंदच झाली तर
किक मारायची बिचारीला
Sanjay R.

हलक्या पावसाच्या
सरीसंगे श्रावण आला ।
पसारा धरेवरचा
न्हाउन निघाला ।
किलबील पाखरांची
गार वारा सोबतीला ।
फुलली नाजुक फुलेही
चहुओर गंध दरवळला ।
Sanjay R.

image

” आला श्रावण “

हलक्या पावसाच्या
सरीसंगे श्रावण आला ।
पसारा धरेवरचा
न्हाउन निघाला ।
कीलबील पाखरांची
गार वारा सोबतीला ।
फुलली नाजुक फुलेही
चहुओर गंध दरवळला ।
Sanjay R.

image

” प्रवास जिवनाचा “

उसंत नाही क्षणाची
वेळ आहे थोडा ।
प्रवास जिवनाचा हा
बघ मोजुन थोडा ।
Sanjay R.

गप्पा आणी गोष्टींची यादी
मनात आहे लांब ।
जवळ तुच नसतांना 
कुणास सांगु थोड थांब ।
Sanjay R.

image

” कविताच रुसली माझी “

गप्पा आणी गोष्टींची
यादी मनात आहे लांब ।
जवळ तुच नसतांना
कुणास सांगु थोड थांब ।
Sanjay R.

मनात आहे खुप
मज तुझ्याशी बोलायच ।
कवीताच रुसली माझी
आता शब्दांना कुठे शोधायच ।
Sanjay R.

ताटकळत अस
किती बसायच ।
वाटेवर डोळे लाउन
कस बघायच ।
वाट संपणार पक्क
म्हणुनच आहे जगायच ।
Sanjay R.

image

” ख्वाब “

ना सोचो इतना सबकुछ
याद हमे भी है कुछ कुछ ।
ख्वाबो मे भी आपही होती
अब भी जीते वही सबकुछ ।
Sanjay R.

image

” झगमग सितारे “

नाही म्हणता म्हणता
पाउस सुरु झाला ।
झमाझम कसा खुप बरसला ।
रस्ते नदी नाले लबालब भरले
पुराच्या भितीन आता
सारे चिंतीत झाले ।
निसर्गाची माया बघा
जिवन पाणी पाणी झाले ।
Sanjay R.

भुत अपनोके 
आते सपनोमे ।
खो जाते फीर
चांदनी रातोमे ।

झगमगाते सितारे
जागते रातोमे ।
चांद तो देता पहेरा
बाकी सारे ख्वाबोमे ।
Sanja. R.

image

” बळीराजा त्रस्त “

काला है अंधेरा
उसका दिल भी कला ।
देखे सुरज जब भी
झुम उठता उजाला ।
Sanjay R.

पावसालाही कळल दिसत
नको तिथ बरसतो मस्त ।
वाट पाहताहेत शेतं तळी
बळीराजा झालाय त्रस्त ।
Sanjay R.

देखो जिंदगी
है ये मेहमान ।
कब निकल ले
पता नही ।
जब तक है
साथ अपने ।
कर लो
पुरे अरमान ।
Sanjay R.

image

” आयेगा फीर दीन “

जी लो उस पल को
कर दो उसे हसीन ।
गम ना करो जिंदगीमे
टल जाये राततो
आयेगा फीर दीन ।
Sanjay R.

बये अस
म्हणायच नाय ।
दोष कोनाचाच
यात नाय ।
जे होते
ते तुच पाय ।
जिंदगीत आता
उरल काय ।
आज हाओ
उद्या नाय ।
Sanjay R.

” मैत्री “

आमच्या तुमच्या सोबतीन
फुलते ही मैत्री ।
एकदा जुळली की
मन फुलवते ही मैत्री ।
Sanjay R.

जायचे आहे पुढे आता
नको वळुस मागे ।
दिवसा मागुन दिवस गेले
व्हायचे आता जागे ।   
Sanjay R.

आहेस तु वेडी 
मुळुमुळु रडी
ये जवळ माझ्या
चाखु जिवनाची गोडी ।
Sanjay R. 

नको ग बोलुस अशी
वेडे का ग तु अशी ।
मी कप तु बशी ।
हवीस मला तु
आहेस जशी ।
Sanjay R.

” पावसाचा पत्ता नाही “

ढग तर रोजच जमतात ।
पावसाचा पत्ता नाही ।
निसर्ग असा कोपला ।
आता प्यायलाही पाणी नाही ।
Sanjay R.

शिरवा पावसाचा आला
तनी ओलावा जाणवला ।
क्षणीक उत्साह मनात
अंगणी मोगरा फुलारला ।
Sanjay R.

image

” बजेट जिवनाचे “

ढगांच्या नेत्री
नाही उरले पाणी ।
अवघा देहची आता
सुर्यनारायणा चरणी ।
Sanjay R.

जाहिर झाल आज
देशाच बजेट ।
काही झाले आनंदी
काहींनी केले रिजेक्ट ।

टिव्ही मैबाइल कंपुटर
सारे झाले स्वस्त ।
भरायचा आहे आयकर
उणे पाच हजार जास्त ।

सिगरेट बिडी तंबाखु
सोडुन द्या आता ।
डाॅक्टर आणी दवाखाने
धरतील जाता जाता ।

पैसाच नसेल खिशात
चिंता कशाची करता ।
चांगल्या दिवसांची सुरुवात
ठाव नाही काय आहे नशीबात ।
Sanjay R.

image

” दुखी: मन माझे “

निघाली आज नभांची स्वारी
बरसणार कधी आमच्या दारी ।

चिंतेत पडले सारे शेतकरी ।
घरात आहे मुलगी आजारी ।

करायची होती पंढरीची वारी ।
का अंत पाहतो पांडुरंग हरी ।

बरसु दे आता पावसाच्या सरी ।
जाउ नकोस दुर फीर माघारी ।

जगलो वाचलो तर करील वारी ।
Sanjay R.

image

कविता कुणाची प्राण आहे ।
कुणी कवितेचा फॅन आहे ।
कवी स्वत: एक ध्यान आहे ।
कवितेनच त्याचा सन्मान आहे ।
Sanjay R.

image

” रुप नवे “

चक्र निसर्गाचे बघा
कसे कुणा सांगावे ।
गाण प्रितीचे
हळुच गुणगुणावे ।

गुलाब मोगरा
निशिगंधानेही फुलावे ।
मनमोहक गंध त्यांचा
धुंद धुंद व्हावे ।

निळ्या आकाशी
एकत्रित ढगांनी व्हावे ।
मुसळधार पावसाने
धरेवरी उतरावे ।

लहान थोरांनी
त्यात भिजुनी घ्यावे ।
किलबील पाखरांची
उडती आकाशी थवे ।

खळखळ पाण्याची बघा
तुडुंब भरले तळे ।
फुलुन आली धरा
घेउन रुप नवे ।
Sanjay R.

image

निघतात ती पाखर
दिवेलागणीला घराकड ।
सुर्यह लोटुन देतो
प्रुथ्वितल अंधाराकड ।
Sanjay R.

” आतातरी येउ दे पाउस “

यंदा पावसाने
रचले एक नाटक ।
बळिराजा आकाशी
बघतो एकटक ।
Sanjay R.

आतातरी पाउस येउ दे ।
धरती ओली होउ दे ।
जिवात जिव माझा येउ दे ।
हिरवा निसर्ग आम्हा पाहु दे ।
आनंदात सार्यान्ना न्हाउ दे ।
दोन घास प्रेमान खाउ दे ।
Sanjay R.

चातका परी डोळे लाउनी
बघतोय तो आकाशी ।
नारायणा दुख: आमची
होत आहेत रे भारी ।
लोटुन दे पुर आसवांचा आता
नकोरे सांगु जाण्या फाशी ।
Sanjay R.

टोचलेला काटा
निघाला तर बर ।
नाहीतर देउन जखम
सलतो अंगभर । 
Sanjay R.

image