अश्रू डोळ्यात

आठवण येता तुझी मला
शब्द सहजच सुचतात ।
हृदयातल्या वेदना साऱ्या
लेखणीतून मग अवतरतात ।
दुःखाला फुटते वाचा नी
अश्रू होऊन ते बरसतात ।
थांबेना आसवांच्या धारा
सरसावतो हुंदका ओठात ।
Sanjay R.

श्रीमंत गरीब

गरिबांचा कुठला मान
सदैव सोसतो अपमान
श्रीमंतांना बघा थोडे
जिथे तिथे त्यांचीच शान
पैश्या कडे त्यांचे ध्यान ।
विनाकारणचे देतात सल्ले
न मागता सांगतात ज्ञान ।
बेतते जेव्हा संकट स्वतःवर
विसरतात मग सारे भान ।
प्रतिक्रिया असते भारी
वाटते तेव्हा बरे लहान ।
Sanjay R.

कशास बदला

सन्मान करील तो आपला
अपमानाचा कशास बदला ।
पाप पुण्य जे ज्याचे त्याचे
फळ भेटते त्याचे तदला ।

गोड बोलुनी जिंका सारे
शब्दातूनच मिळतील तारे ।
कोण आपले कोण परके
कठीण प्रसंगी कळते सारे ।

संयम हवा थोडा वाचेवरती
समुद्रालाही तर येते भरती ।
क्षणिक असतो राग सारा
शहण्यास हो पुरे इशारा ।
Sanjay R.

त्राही त्राही

शब्दांना तर असतो अर्थ
सांगून जातात बरंच काही ।
कानावर घेऊन सोडून देता
शब्दांना काहीच अर्थ नाही ।
हृदयाला जे स्पर्श करतात
अंतरात मग फुटते लाही ।
कधी मस्तकाचा घेताच वेध
जिकडे तिकडे त्राही त्राही ।
Sanjay R.

प्रेमाला कुठे अंत

प्रेमाला कुठे अंत
वाहतं पाणी
आणि तेही संथ ।

नाही वयाचे बंधन
म्हातारं झालं जरी
हृदयात होते स्पंदन ।

नाती गोतीही सरतात
प्रेमापुढे विचारही
का कसे ते हरतात ।

प्रेमात कुठला स्वार्थ
पण असतो नक्कीच
जीवनाला तिथे अर्थ ।

प्रेम म्हणजे भक्ती
अति प्रचंड अशी ती
असते एक शक्ती ।

म्हणे प्रेमात तो पागल
कळेना कुणासच
अंतापर्यत तो जागल ।

प्रेम कराल तर कळेल
कुणासाठी माझंही हो
मन तितकंच जळेल ।
Sanjay R.

हास्य आनंद

रंग कसा या जीवनाचा
गन्ध त्यात भावनांचा ।

क्रोधाला नाही माया
सोबत असते सदा छाया ।

शब्दातून शब्द येतात
घायाळ मन करून जातात ।

चेहऱ्यावरती भाव कसे
राग क्षणात उठून दिसे ।

रूप नको ते तसे मजला
हास्य हवे ते देईल तुजला ।

हृदयावरती बंधन कुठले
होऊन आनंद सारे सुटले ।
Sanjay R.

नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R

विसावा

करतो देवाचा धावा
करू नको दुरावा ।
आलो शरण तुजला
हवा कशाला पुरावा ।
तूच आहेस तारक
हात कृपेचा असावा ।
चरणी तुझ्याच आलो
दे मज तूच विसावा ।
Sanjay R.

माया

मनात जरी असेल
आपलेपणाचा ओलावा ।
पण स्वार्थ येतो आडवा
आणि वाढतो दुरावा ।

उरलीच कुठे माणुसकी
फालतुचेच होतात दावे ।
वेळ आली की कळते
गुणगान कुणाचे गावे ।

शब्दा शब्दात अंतर किती
कुठे काळोखाची काया ।
कधी सहजच जाणवते
शब्दातून किती माया ।
Sanjay R.

नको होऊस तू परदेशी

होऊ नको तू परदेशी
बघ तुझी रे आई कशी ।

वाट तुझी पाहते सारखी
आठवणीत ती होते दुःखी ।

काळजी सदा तुझीच तिला
आठवण कारे येत नाही तुला ।

गरज तुझीच रे म्हातारपणी
तुजविन सांग बघेल का कोणी ।

लाड तुझे रे का केलेत कमी
नको देउ आता डोळ्यांना नमी ।
Sanjay R.

आई

आई विना तर जग पोरके
असेल का कोणी आई सारखे

माया ममता प्रेमाचे ती प्रतीक
संस्कारांची तीच तर देते सिख ।

आई तूच हवी मज आयुष्यभर
नाही येणार कुणालाच ती सर ।
Sanjay R.

और जी लेंगे हम

मौत को ऐक दिन
आनाही है
ना, हम भाग सकते
ना वह….
इंतजार तो दोनोको है
चलो तब तक जी लेते है…..
थोडा हसके….
थोडा गमके…..

जलदी तो तब भी न थी
ना अब है…
कुछ और वक्त मिल जाये तो…
और जी लेंगे…
बाकी जो भी रहा…
सब कर लेंगे…..
Sanjay R.

मान सन्मान

कुठे कुणाचा मान
होतो कुठे सन्मान ।

मोठेपणाचा आव
मारतोय फक्त शान ।

विचार सारे सरले
सारेच विसरलो भान ।

पुस्तकांचे चाले पठण
नाही संस्कारांचे ज्ञान ।

असा कसा टिकेल हो
सांगा तुमचा स्वाभिमान ।

मोठेपणा विसरा थोडा
होऊन जरासे लहान ।

मिळेल ते हवे सारेच
झळकेल उंच निशान ।
Sanjay R.

भोगतो मी मरण

पोटासाठी काय चाले
कशाला हवे हो कारण ।
दिवस रात्र उपसतो कष्ट
भुकेचे केव्हाच झाले हरण ।
रक्ताचे आता झाले पाणी
बघा गोळा करतो सरण ।
मान अपमान केव्हाच गेला
डोळ्यात बघा फुटले धरण ।
काठीचाही आधार नाही
थरथर कापतात हे चरण ।
चल यमा आता घेऊन चल
रोजच तर भोगतो मरण ।
Sanjay R.

शुभेच्छा

देतो आज मी तुज शुभेच्छा
होऊ दे पूर्ण साऱ्या आकांक्षा ।
असतील नसतील त्या इच्छा
नसेल कधी कशाची प्रतीक्षा ।
शत शत आयुष्य तुज लाभू दे
नांदो सदा आनंद ही सदिच्छा ।
Sanjay R.

विरोध विकृतीचा

साहित्याची तर लागेल वाट
विकृतांनी हो रचला घाट ।
बरा नाही हा असला थाट
वाचक हो तुम्ही दाखवा पाठ ।
तोडा आता ही अश्लील गाठ
नका होऊ तुम्ही ही माठ  ।
विरोधात व्हा एकदम ताठ
शिकवा आता तुम्हीच पाठ ।
Sanjay R.

फुलू दे कळी

अंगणात फुलू दे कळी
गालावर तुझ्याही खळी ।
बघून डोळ्यातले भाव
हृदय जाते माझे बळी ।
अशीच तू हसत राहा
मग दूर ते दुःख पळी ।
Sanjay R.

नकोच हा दुरावा

नकोच हा दुरावा
असेल तू दूर जरी ।
नेहमीच वाटे मनाला
नकळत येतील सरी ।
क्षणोक्षणी होतात भास
कथा ती असेल खरी ।
रंभा किव्वा उर्वशी
इंद्राघरची ती तूच परी ।
Sanjay R.