सांग करणार किती छळ मिळेल त्यातून मज बळ । विसरलो मी दुःख सारेच करू मी कशास हळहळ । झाले मनही आता खंबीर नाही पडणार कुठे वळ । बघणार नाही वळून मागे विचार आहेत आता अढळ । Sanjay R.
भविष्यात घडेल काय आयुष्यात जडेल काय । शोधतो हातावरच्या रेषा त्यावर आहे लिहिले काय । जन्माला आलो मी जसा सांग कसे मानू आभार माय । कर्तृत्व करण्या आहेत हात यश तिथे जिथे पडतील पाय । Sanjay R.
माणसाच्यानात काय ओळखणे महाकठीण । कधी जळता निखारा होती कधी तो लिन । कळेना केव्हा करेल काय विचारानेच येतो शीण । वाटे कधी जुनाट किती कधी वाटे तोच तर नवीन । Sanjay R.
ओझे उपेक्षांचे पाठीवर करतात घाव मनावर । अंतरात या जखमा किती ओघळती आसवे गालावर । एकटाच मी भोगतो सारे मिळेना उपाय जगण्यावर । बघतात का दुरूनच सारे टाकतो नेऊन हसण्यावर । दुःखाला असे कोण सोबती मग होतो सुखाचा वाटेकरी । Sanjay R.
नववर्षाचा दिवस उजाडला झाली आनंदाची बरसात । नाते करू या दृढ आता मित्रांपासून करू सुरुवात । काळजी घेऊन आरोग्याची करू दुःखावरती मात । क्षणोक्षणी या जीवनात आपल्यांचीच मिळेल साथ । Sanjay R.
करू काय मी संकल्प नाही आयुष्याचा भरोसा । जाणार आता जुने वर्ष नवीन वर्षात नवीन वसा । मागचे वर्ष ठेऊन गेले न मिटणारा आपला ठसा । कोरोनाने केले विस्कळीत चिंतेचा तो दिवस कसा । होईल आता सुरळीत सारे छानच होईल आनंदी असा । Sanjay R.
झाले गेले मी सोडू कसे आठवणींना काढू कसे । डोळ्यात आसवांचा पूर रुकेचना मी थांबवू कसे । मन माझे हे अधीर किती आघात किती सोसू कसे । तुझ्या शब्दांचा हवा सहारा तुझ्याविना मी राहू कसे । Sanjay R.
आसवांची कहाणी गाते दुःखाची गाणी । मुखावर दिसे हास्य कळते कुणास वाणी । मुकाट्यानेच भोगतो ऐकतो कोण गाऱ्हाणी । हृदयावर होतात घाव अंतरात त्याची निशाणी । विचारांची होते राख मनास कोण जाणी । नशिबाचे भोग सारे येते डोळ्यात पाणी । Sanjay R.