” अनोखी सृष्टी “


केली देवानं पहा
कशाची ही वृष्टी ।
अनोख्या रंगांची
बनवली सृष्टी ।

पाने फुले पशु पक्षांच्या
चाले गुज गोष्टी ।
माणुस मात्र दिसतो
दुखीः आणी कष्टी ।
Sanjay R.

जब याद तुम्हारी आती है
तुम याद बहोत आते हो ।
दिलेमे यादे बहेत होती है
पर याद हमे तुमही आते हो ।
Sanjay R.

” हरवुन गेलो “

लांब काळ्या केसातला मोगरा
घेउन गंध मी धुंद झालो ।

पाहुन तुझ्या डोळ्यात मी
डोळ्यात हरवुन गेलो ।

गोड लाजरे बघुन हास्य
सर्वस्व मी भुलुन गेलो ।

हलकेच तुज स्पर्श होता
बघ कसा शहारुन गेलो ।

अंगावर फिरले मोरपीस जणु
मनोमनी बहरुन गेलो ।

तुजवीण मज सुचेना काही
तुझ्यातच मी डुबुन गेलो ।

सांग काय वर्णु रुप तुझे
तुझाच मी होउन गेलो ।
Sanjay R.

” रंगले गोकुळ “

होउ दे एक रंगांची कवीता
उधळु दे मनात सुरेख सवीता ।
प्रत्येक रंगाची अलग सरीता
मिळुन होते सुरेख सुचीता ।
रंगात रंगले गोकुळ आता
हरी राधेशी रंग खेळता ।
Sanjay R.

दुर आकाशात
चमकले तारे ।
घेतले उचलुन
मुठभर वारे ।
रुसुन बसले
दोन सितारे ।
चंद्र सुर्याचे
रंगच न्यारे ।
सोबत त्यांच्या
नभोमंडळ सारे ।
अमावसेच्या रात्री
चालती इशारे ।
असले जरी
लाख पहारे ।
Sanjay R.

” फुलाचे देणे “


मनाचे मनाला
समजुन घेणे ।
तुझ्या माझ्या प्रीतीला
फुलांचे देणे ।
Sanjay R.

एक लमहा
ख्वाबो मे सही ।
कुछ वादे
यादोमे सही ।
कुछ बाते
खयालो मे सही ।
और मुलाकाते
दिलमेही सही ।
Sanjay R.

एक अनामीक तुझी ओढ
हवी मनाला मनाची जोड ।
शोधत असतो तुजला मी
लागली डोळ्यांनाही खोड ।
तुझ्या असण्याचाच विचार
अन्न पाणी लागत नाही गोड ।
Sanjay R.

” भासे अप्सरा “

घेउन पुढे काळ्या
केसांच्या बटा ।
ओठी खुलल्या
गुल्लाबी छटा ।

गालात झळकते
हास्याची घटा ।
नेत्रात विसावतो
आनंद मोठा ।

डोकावतो तुझ्यात
मी सारखा असा ।
लावलेस वेड मज
रोकले बघ श्वासा ।

काय वर्णु सांग तुज
भासे मज अप्सरा ।
लागली ओढ मना
शोधतो जरा जरा ।
Sanjay R.

” गुलाबी छटा “


घट्ट या मैत्रीच्या
आपल्या गाठी ।
एक फुल गुलाबाचे
तुझ्याचसाठी ।।

गुलाब मोगरा
जास्वंद चाफा ।
तुझ्यासाठी एक
गोड गोड पापा ।।

गोड हास्य तुझ्या
झळकले गाली ।
गुलाबी छटांची
ओठावर लाली ।।
Sanjay R.

” ढग काळा “

बघता बघता
भरले आभाळ
लक्षणं पावसाची
दिसतात पुन्हा ।

येताच वारा
गेले उडुन सारे
नक्षत्राचा खेळ
आहेच हा जुना ।

कधी गरजतो
कधी बरसतो
वाटेकरी आसवांचा
काय त्याचा गुन्हा ।

शुभ्र आकाशी
ढग निळा काळा
भासे एकाकी
कसा सुना सुना ।
Sanjay R.

” विचारांच काहुर “


विचारांचं काहुर
मनात जेव्हा उठतं ।
बंद होतात दारं
तनही अशांत होतं ।
विचारांच चक्र
जोरात मग धावतं ।
मिटताच डोळे घट्ट
क्षणात सारं विसावतं ।
घेता शांत चित्तानं
हळुच छान सुखावतं ।
कपरान कोपरा मनाचा
प्रफुल्लीत झाल्याचं जाणवतं ।
ध्यानाची महीमाच अशी
जिवनात आनंद डोकावतो ।
Sanjay R.

” रोजच उपवास “


मनी एक ध्यास
सोबत विश्वास ।
एक एक श्वास
जिवनाचा प्रवास ।

खळगी पोटाची
रोजच उपवास ।
भुकेचे कीती मोल
डोळ्यात आस ।

का कुणास
पैसाच खास ।
नको नाती गोती
लोभ मानवास ।

ना उरली माणुसकी
लागे ओठचा घास ।
तहान तया रक्ताची
झाले सारे राक्षस ।
Sanjay R.

” मन फुटकी घागर , लागे भराया सागर “


मन अधर अधर
पाण्याची फुटकी घागर ।
भरा कीतीही तयासी
मागे अख्खाच सागर ।
देता थोडके सादर
चाले सदा ची घरघर ।
दुखाःचा नाही तोटा
डोळी आसवांचा पुर ।
सुख क्षणाचा सोबती
घेतो जगुन मधुर ।
Sanjay R.

” मस्तीत जगावं “


मनाचं काय
कसं कुणी सांगावं ।
क्षण सुखाचे
आनंदात छान रहावं ।
गीत सुमधुर
ओठात गुणगुणावं ।
हास्याची छटा
प्रसन्न मुख भासावं ।
व्यक्त होतांना
खळखळुन हसावं ।
क्षण जिवनाचा
मस्तीत जगावं ।
Sanjay R.

” श्रावण सरी “

आला आला
पाउस आला ।

क्षणात कीती
भिजउन गेला ।

सुर्यही पावसात
चिंब न्हाला ।

झाडांना मग
हुरुप आला ।

हिरवा शालु
ओला झाला ।
गुलाब मोगरा
सुगंध फुलला ।

चीउ काउचा
आवाज खुलला ।

श्रावण चहुओर
मस्तीत उधळला ।
Sanjay R.​

” विरह “

सोबत तुझ्या असतांना
येते भरती आनंदाची ।

घेतो भरारी दुर गगनी
उघडुन दारं ह्रुदयाची ।

नसतेस ना तु जेव्हा
होते घालमेल मनाची ।

वेळ कसा तो जातच नाही
मोजमाप करतो क्षणांची ।

डोळ्यांपुढे तुच असतेस
नसतेच तमा कशाची ।
Sanjay R.

” मैत्री चा ध्यास “


मित्राला बघा माझ्या
मैत्री चा कसा ध्यास ।
ह्रुदयात जागा त्याची
आहे तो माझा खास ।
क्षणो क्षणी सुख दुखात
दोस्ती चा आभास ।
मित्रां संवे आनंदी कीती
जिवनाचा हा प्रवास ।
मित्रा शिवाय जिवन
जसा विना हवेचा श्वास ।
Sanjay R.

” आधार “


नाहीत ते
प्रहार ।
असती जन जिवना
स्विकार ।
आहे स्वर्ग सुखाचे
ते द्वार ।
घेइ उचलुन सगळाच
भार ।
होते नौका
समुद्र पार ।
तोची जिवनाचा
आधार ।
Sanjay R.

” काय रे पावसा “


काय रे पावसा
सांग काय झाले तुला ।
धो धो कोसळतो
का असा सुटला खुला ।
श्रावण आला बघ
बांधला आनंदाचा झुला ।
दरवळला सुगंध
गुलाब मोगर्याच्या फुला ।
नको भिजउ आसवात
थांबव जिवघेणी ही कला ।
Sanjay R.

” वादे इरादे “

हो ना हो हम भी
करते याद तुम्हे भी ।
कुछ वादे कुछ इरादे
नजाने कैसे और भी ।
बाते दिलकी दिलमे
और सोचते हम भी ।
Sanjay R.

” नको इशारा “


आठव ते दिवस
ते उन तो वारा ।
मस्तीची सायंकाळ
आणी
पावसाच्या धारा ।
मनातला आनंद
संगे उत्साह सारा ।
आकाशी लुकलुकतो
चंद्र आणी तारा ।
दिवस श्रावणातला
मनी फुलतो पिसारा ।
तु आणी मी
नको इशारा ।
Sanjay R.