” देवा मला तु पाव

कसा मनावर
केलास तु घाव ।
नाही कशाची आता
मजला उरली हाव ।
अखंड जपतो देवा
तुझेच मनात नाव ।
आता तरी येकदा
देवा मला तु पाव ।
sanjay R.

मी नाही काळा
ना मन माझे काळे ।
ओढ तुझी मजला
नजरही मागेच वळे ।
आसक्ती तुझी मजला
तुजसाठी मन झाले खुळे ।
मनीशा तुझी मजला
मग मन असे का जळे ।
sanjay R.

मी पण बेचैन
इथे तुझ्याभेटीसाठी ।
मनाला कसे समजाउ
होणार कधी भेटीगाठी ।
sanjay R.

प्रेमात असते सगळच माफ ।
उकळल्यावर निघते वाफ ।
झाला जर पत्ता साफ ।
पिटायचे टाळ गेल्यावर साप ।
sanjay R.

उठा उठा सगळे जण
स्मरण करा श्री गजानन
भजन करा जय श्रीराम
चहा झालाय गरमागरम
ब्रेड बिस्कीट आहे संगतीन
भराभर आटोपा आपली काम
दिवस चांगला मिळेल आराम
श्रीराम श्रीराम जय श्रीराम
sanjay R.

” मनाचा खेळ न्यारा “

मनाचा खेळ न्यारा
लगे सबकुछ प्यारा ।
सभोवताल बघा जरा
सुंदर कीती ही धरा ।
sanjax R.

सुर्य आहे सोबतीला
आणी चंद्र साक्षीला ।
परीजात हा बहरला
सुगंध येयी जिवनाला ।
sanjay R.

हॅ बहोत यहा लेकीन
दोस्त आपसा नही कोई ।
और हमे चाहीये क्या
दोस्ती आपकी हमने पाई ।
sanjay R.

काय झाले कुणास ठाउक
कवीता माझी रुसली ।
सोडुन एकट्यास मला
एकांतात जाउन बसली ।
मनच लागत नाही आता
मनी चिंता आहे कसली ।
चाहुल तुझी लागताच मना
बघ कविता पण माझी हसली।
sanjay R.

तुझ्या आठवणींचा
बघ कसा डोंगर झाला
कळले नाही म्हणतेस तु
चंद्रही बघ नजरेआड झाला
sanjay R.

घेउन तुला छातीशी
निवांत झोपील म्हटल
आधीच झोपी गेलीस तु
स्वप्न न बघताच तुटल
sanjay R.

बाळा जो जो रे बाळा
तान्हुला तु छकुला तु
टीका केला काळा ।
इवली इवली पावल तुझी
चढवील्या वाळा ।
चिउ काउ या रे सारे
भरवायची आहे शाळा ।
sanjay R.

किलबील पाखरांची सुंदर
गंध पुष्पांचा सुंदर
बहरली वनराई सुंदर
बघा चौफेर ही धरा सुंदर
मी सुंदर मन माझे सुंदर
sanjay R.

सनडे कमाल
हाती रुमाल
गाण्याचा ताल
लुंगी डांस करुन
उडवु या धमाल
sanjay R.

” अधीर कान झाले ऐकाया काव काव ”

कावळोबा करता
तुम्ही काव काव ।
दिसत नाहीत इतक्यात
सोडला का गाव ।
लहानपणा पासुन
ऐकतोय तुमचे नाव ।
काडीच्या घराची
आहे तुम्हास हाव ।
वाहुन गेले तरी
परत मांडता डाव ।
या परत येकदा
छान आमचा गाव ।
अधीर कान झाले
ऐकाया तुमची काव काव ।
sanjay R.

उघडता बंध
येक मनात ।
दरवळतो गंध
प्रेमाचा क्षणात ।।

अवतरते गोड
छवी एक नजरेत ।
धुंद होतो मी
तुझ्या कल्पनेत ।।

घेउनी तुझाच
हातात हात ।
दुखः सारी
विसरतो क्षणात ।।

झेपावतो आकाशी
असते तुझीच साथ ।
नाही मग उमजत
सरते कशी ती रात ।।
sanjay R.

” जपायचे बेधुंद मनाला “

गोड मधुर हलकी थंडी
उब हवी आता तनाला ।
हळुच पांघरुणात शिरायचे
जपायचे बेधुंद मनाला ।
sanjay R.

येता झुळ झुळ वारा
डोलतो निसर्ग सारा
मनही लागे डोलाया
शोधीतो एक किनारा
sanjay R.

” आले भरुन डोळे “

भरुन आले डोळे
आसव नेत्री मावेना ।
गळी आला हुंदका
रड आता थांबेना ।
आठवणीना पुर आला
दुखः मनाचे कळेना ।
sanjay R.

आषाढ कार्तिकी
जनसागर लोटला ।
पंढरपुरात जन
भक्तीसागरात डुबला ।
विठ्ठल रखुमाई माझ्या
ह्रुदयात वसला ।
गजर नामाचा करु
जय जय हरी विठ्ठला ।
sanjay R.

आठवत मज ते लहानपण
आणी लहानपणातले खेळ ।
कधी धाबाधुबी लपाछपी
तर कधी लगोऱयांचा मेळ ।
कधी उनाडक्या करत फिरायच ।
तर कधी शाळेला बुट्टी मारुन
नाल्यावर मासोळ्यांना धरायच ।
पाठीत आईचा दणका बसता
दुर कुठतरी लपुन बसायच ।
लपुनच आईला शोधतांना
बघायच ।
आणी मनातल्या मनात
खुप हसायच ।
मित्र मैत्रीणींशी खुप भांडायच।
परत हसत हसत मिळायच ।
मोठ्ठे झालो आता म्हणुन
टेंशन मधेच जगायच ।
sanjay R.

” चांदीच्या कपात सोनेरी चहा “

चांदीच्या कपात
सोनेरी चहा ।
मोजावे लागतील
रुपये दहा ।
जाउन टपरीवर
येकदा पहा ।
न पिताच म्हणाल
वाह वाहा ।
sanjay R.

कधी कधी
दिवस असाही येतो ।
दुर कुठतरी
कंटाळवाणात नेतो ।
येकाकी मनाला
उदासीनता देतो ।
विचारांचे काहुर
हिराउन घेतो ।
sanjay R.

सुंदर आकाशी
चंद्र पौर्णीमेचा ।
सोबतीला असे
चमचमणाऱया
चांदण्यांची ।
मनी विचारांचे
काहुर माझ्या ।
येकटाच निघालो
आता तयारी आहे
जिवन प्रवासाची ।
खाच खळग्यांचा
खडतर हा मार्ग
हिच असावी
कसोटी जिवनाची ।
sanjay R.

कुठेही जा
फराळाचा आग्रह ।
थकलो बाबा आता
नको तो फराळ ।
दुसरे काही द्या
झाली आहे सकाळ ।
sanjay R.

” आली आली दिवाळी आली “

आठवणींचा संदुक
असाच सांभाळुन ठेवायचा
परत परत थर
धुळीचा पुसुन काढायचा ।
sanjay R.

कला अशीच असते ।
कलाकाराला आनंद देते ।
तर रसीकाला त्रुप्ती ।
जिवनात आमच्या डोकावते ।
मन मंत्रमुग्ध होते ।
हळुच झोके घेते ।
आणी सुर उमटतात ।
ये कहा आ गये हम ।
युही साथ चलते चलते ।
sanjay R.

आली आली दिवाळी
जिवनाचे वर्ष एक
कमी करुन गेली
sanjay R.

जगणे असले
जरी येक आभास ।
प्रत्येक क्षण
जिवनाचा आहे खास ।
पार करायचा आपणा
एक एक फास ।
चला करु या आपण
नवजिवनाचा ध्यास ।
sanjay R.

मला पण आहे
कवितेचा ध्यास ।
मिळे आनंद इतका
जगतो रोज एक
नवीन श्वास ।
sanjay R.

झाली तयारी एकदाची
गडबड घाई दिवाळीची
फुरसत नव्हती क्षणाची
संपवा प्लेट आता फराळाची ।
sanjay R.

आली आली
दिवाळी आली ।
फराळाची
तयारी झाली ।
कपडे फटाक्यात
खिसा खाली ।
साडी साठी नाराज
माझी घरवाली ।
महागाईन सारी
फजीती केली ।
कराव काय
कोण नाही वाली ।
सोडुन चिंता
पेटउ मशाली ।
sanjay R.

बस याद उनकी आइ
और होश गवा बैठे हम ।
रातभर ढुंढते रहे फिर
लौट आये होशमे तो
सुबह हुयी ।
शुभ प्रभात ।।