” सळसळ सळसळ आला वारा “

सळसळ सळसळ आला वारा
सोबतीला आल्या पाऊस धारा ।

क्षणभर पावसात भिजली धरा
गधं मातीचा दरवळला जरा ।

जेव्हा आकाशात चमचमतो तारा
येता आभाळ लुप्त होतो तो सितारा ।

दडून ढगांच्या आड देतो तो पहारा
पडतो मग पाऊस समजून इशारा  ।

हसते कळी आणी फुलवते पिसारा
मन मोहून घेई  मग सारा नजारा ।
Sanjay R.

” चला फिरायला चांदण्यात “

चला फिरायला चांदण्यात
चमचम बघा किती गगनात ।
ओढ आम्हा चांदण्यांची किती
ठेऊन घेऊ दोनचार खिशात ।
तिकडे सप्तर्षी इकडे शुक्र तारा
बघा तारेच तारे आहेत किती
चंद्रही आहे साऱ्यांच्या मधात ।
रम्य मनोहारी किती हे दृश्य
फुले आनंद साऱ्यांच्या मनात ।
Sanjay R.

” पाऊस “

रिमझिम रिमझिम
हवा मज पाऊस ।
थांब ना रे ढगा
असा नको धाऊस ।
लहानपणापासुन तुझी
किती रे मला हाऊस ।
बघ डोळ्यात माझ्या
नजर नको लाऊस ।
घे मज मिठीत तुझ्या
असा नको पाहुस ।
भिजवना चिंब मला
दूर नको जाऊस ।
Sanjay R.

” आशेची पणती मिणमिणते “

आशेची पणती मिणमीणते
ओठ गीत जीवनाचे गुणगुणते ।

नाद कानात घुमघुमते
नेत्रही जागीच दिपदीपते ।

मन आतून फुलफुलते
आनंद मनातला  खुलखुलते ।

भावना अंतरात सळसळते
गाल सोबतीला खळखते ।

झंकारले सूर  सारे
मैफिल आयुष्याची रुणझुणते ।
Sanjay R.

” खंत आहे मनात “

खंत आहे एक मनात
वेळी अवेळी ती सलते ।
तू तिथे मी का दूर इथे
घेते धाव हे मन क्षणात ।
नाही थांबत ही आसवे
काय खुपले या डोळ्यात ।
शब्दही आता अपुरे
आहे हुंदकाही गळ्यात ।
करू कसे हे मन मोकळे
बघते तुला आकाशात ।
दूर तो दिसतो तारा
तूच असावा चांदण्यात ।
Sanjay R.

” सांगायचं नव्हतं तुला “

काहीच सांगायचं नव्हतं रे तुला
तुझ्या शिवाय सांग हवं काय मला ।

तू असतोस ना जवळ जेव्हा
सर्वच मिळाल्याचे समाधान तेव्हा ।

तुझ्याशिवाय मज नाही कुठली हाव
मन माझे तुझ्याकडेच घेते रे धाव ।

सोबत असू दे रे तूझी माझी अशीच
सुख दुःखात हवी फक्त सोबत तशीच ।
Sanjay R.

” वाटलंच नव्हतं असं “

वाटलंच नव्हतं असं
पण झालं हे कसं ।
कोरोनाने जग सारं
झालं हो वेडं पिसं ।

आपलीच वाटे भितो
अंगात या भूत जसं ।
दूर दूर राहतो आता
विसरलो सारच हसं ।

मरणाच्या भीती पोटी
मलाही हवी एक लस ।
डॉक्टरचीही भीती वाटे
एकट्यातच आता बस ।

जोरजोरात घेतो कसा
ऑक्सिजन चा श्वास ।
मरणही नकोच  वाटे
सांगा येईल कोण कसं ।

स्मशानात नाही जागा
प्रेतालाही किती त्रास ।
करू तरी काय आता
मनी देवा तुझा ध्यास ।
Sanjay R.

” माझा मी न उरलो “

कुठे ते चंद्र तारे
कुठे ते गार वारे ।
रात्रीच्या वादळात
गेलेरे उडून सारे ।

नशीबातच कष्ट
कुणा म्हणूरे दुष्ट ।
माझा मीच झालो
किती आतारे भ्रष्ट ।

भकेले जेव्हा पोट
पितो पाण्याचे घोट ।
हक्क मागतो जेव्हा
मिळे पाठीवर सोट ।

कष्ट करी हे हात
नाही कुणाची साथ ।
लाचार जिणे सारे
दिसे अश्रू डोळ्यात ।

माझा मी न उरलो
जीवनात हरलो ।
एकटा मी प्रवासी
नकळतच सरलो ।
Sanjay R.

” तुझ्या विना मी जगेल का रे “

दे सोडून तू क्लेश सारे
तोडून ये तू सारे पहारे ।
कळेल तुज माझे ईशारे
दूर तू गेलास का असारे ।

रात्री आकाशी चन्द्र तारे
झुळ झुळ वाहती गार वारे ।
झोप येईना तुझ्या विना रे
स्वप्नात छळतो मज तू कारे ।

त्या वाटेवरती लक्ष सारे
छळू नको मज आता तू रे ।
ये परत तू असेल जसा रे
तुझ्या विना मी जगेल का रे  ।
Sanjay R.

” सखा तूच पांडुरंगा “

सखा तूच रे आहे माझा
पंढरीच्या माझ्या पांडुरंगा ।
नाही झाले रे दर्शन तुझे
तुझ्यात मन घालते पिंगा ।

शहरात या आहे चालू
कोरोनाचा कसा रे दंगा ।
मिळेल कधी आम्हा शांती
कुणीतरी हो आता सांगा ।

प्राण चाललेत निसटून
मायेची कशी आटली गंगा ।
डोळ्यात आसवांचा पूर
अग्निही रुसला रे श्रीरंगा ।

तुटता तुटेना साखळी ही
सर्वत्र चालला हा धिंगा
आस तुझीच रे आहे आता
भीक जीवाची दे पांडूरंगा ।
Sanjay R.

” सरिता “

कोरोना आला आणि सुरळीत चाललेला संसार विस्कळीत झाला. मलमजुरी करून स्वतःचे पोट भरणारा निशांत, गावात असलेल्या आपल्या आई वडील आणि बहिणीला पण थोडी थोडी मदत करायचा. आपल्या रोजच्या कामाईतले थोडे थोडे पैसे वाचवून ते महिन्या दोन महिन्यातून घरी पाठवायचा. बापालाही आपल्या मुलाचा अभिमान वाटायचा. सगळं आयुष्य गरिबीत गेले. बापाचे मजुरी करता करता शरीरच उरले नव्हते. उरला होता फक्त हाडांचा सांगाडा. आई नेहमीच आजारी असायची. कधी तिला बरं वाटलं तर ती कामावर जायची पण तिच्याने जास्त कष्ट व्हायचे नाही. आणि म्हणूनच तिला कोणी कामावर बोलवत नसे. बहिन छोटीच होती. पण खूपच गोड आणि सुंदर होती. सगळे तिचे लाड करायचे. तिचीही शाळा सुरू होती. यंदा ती दहावीच्या परीक्षेला बसणार होती.

गेल्या वर्ष भरापासून निशांतला कामच नव्हते. कसेतरी स्वतःचे पोट भरणे चालू होते. घरी पाठवण्याइतके पैसेच त्याच्याकडे वर्षभरात जमले नव्हते. पण गावाला परत जायला त्याचे मन धजत नव्हते. तो इथे नागपूरला राहूनच काम करून आणि नंतर आई बाप बहिनीलपन नागपूरला घेऊन यायचे स्वप्न बघायचा. पण कोरोनाने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते. सरकारने परत लॉक डाऊन जाहीर केले नि त्याचे काम बंद झाले. झोपडपट्टीतच त्याने एक छोटीशी खोली किरयाने घेतली होती. तो तिथेच राहायचा. घरमालक खूप छान होते. नेहमी ते प्रेमानेच वागायचे. किरयासाठी कधी काही बोलत नसत. पैसे मागे पुढे झाले तरी सांभाळून घ्यायचे. उलट तेच निशांत ला कधी मधी मदत करायचे. कधी जेवायला पण बोलवायचे. त्यांची एकच मुलगी होती सरिता . सरिता जास्त दहावी झाली होती. आणि एका प्रायवेट हॉस्पिटल मध्ये कामाला जायची. सरिता खूप सुंदर नव्हती पण सर्व साधारण ठीक ठाक होती. पण सरिता खूप बोलकी होती. तिच्याच्याने गप्प बसणे कधी व्हायचेच नाही. तिची सारखी बडबड सुरूच असायची. अशातच निशांत आणि सारिताची हळूहळू जवळीक वाढली आणि सरिता निशांत च्या प्रेमात पडली. सायंकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर सरिता निशांतच्या रुममध्येच झोप येईस्तोवर गप्पा करत बसायची. तिच्या आई वडिलांचा पण त्याला विरोध नव्हता. दोघातले प्रेम असेच वाढत होते. फुलत होते. कोरोना काळात मात्र सारिताचे काम सुरूच होते. ती हॉस्पिटलमधल्या गमती जमती निशान्त ला संगत राहायची. त्यातच त्यांचा पूर्ण वेळ निघून जायचा.
आता सारिताचे हॉस्पिटल कोरोना हिस्पिटल झाले होते. काम खूप वाढले होते. त्यामुळे ती थकून जायची, थोडा वेळ निशांतशी बोलून झोपायला निघून जायची.
आज सरिता हॉस्पिटल मधून आल्या आल्या निशांतच्या रुम मध्ये आली आणि तिने तिच्या पर्स मधून काही आषधाचे पॅक काढून निशांत ला देत म्हणाली , हे जपून ठेव, मी नंतर लागेल तेव्हा घेऊन जाईल. आणि ती घरात निघून गेली. रात्री जेवण झाल्यावर ती परत आली आणि निशांत ला सांगायला लागली. अरे हे औषध खूप महागाचे आहे. बाजरात मिळत नाही आहे. लोक या औषधासाठी दारोदार भटकत आहेत. कितीही पैसे ते द्यायला तयार आहेत. हे आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला विकले तर एक ते दीड लाख रुपये पण मिळतील. हॉस्पिटल मध्ये खूप पेशन्ट आहेत. मधू आमचा वॉर्ड बॉय आहे ना त्याने माहीत नाही कुठून आणलेत ते. त्याने मला ते  घरी निघताना दिलेत. आणि कोणी ग्राहक शोधून विकायचे सांगितले. तो मला त्यातले अर्धे पैसे देणार असे बोलला. तू तर घरीच असतो. त्यापेक्षा हॉस्पिटलच्या एरियात फिरून ग्राहक शोध. त्याला आपण ते विकून टाकू. तुलाही त्या पैशातला एक हिस्सा मिळेल. आपण त्याचे तीन भाग करू. किंमत जेवढी जास्त येईल तेवढा आपला जास्त फायदा होईल. बघ तू उद्या कर हे. असे म्हणून ती. परत गेली. निशांतही काम नसल्यामुळे परेशान झाला होता. त्याला पैसे मिळतील ही आशा दिसायला लागली.

दुसऱ्या दिवशी निशांत सकाळीच उठून हॉस्पिटल कडे गेला. तर मेडिकल च्या दुकानांपुढे ग्राहकांची झुंबड लागली होती. दुकानात त्या औषधांचा स्टॉक सम्पल्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन वापस जात होते. निशांतला तेव्हा त्या औषधाचे महत्व पटले. त्याने एक दोन लोकांना विचारले खरच हे औषध बाजारात नाही का. त्यावर त्या लोकांनी त्यालाच विचारले. अरे तुझी ओळख आहे का इथे कुठल्या दुकानात, आम्हाला ते औषध पाहिजेच आहे, नाहीतर आमचा पेशन्ट काही वाचत नाही.
निशांत ने एका ग्राहकाला बाजूला बोलवून विचारले, मी माझ्या ओळखीने तुम्हाला औषध आणून दिले तर तुम्ही किती पैसे द्याल. तर तो ग्राहक बोलला तुम्ही सांगाल तितके पैसे मी तुम्हाला देतो. बस मला औषध हवे आहे, त्याशिवाय आमचा पेशन्ट वाचू शकत नाही. खरच तुमच्या मदतीने औषध मिळत असेल तर माझ्यासाठी आणा. मी आत्ता तुम्हाला कॅश पैसे देतो. मी सगळं शहर शोधून आलो, कुठेच ते मिळत नाही आहे. तुम्ही ते मला आणून दिले तर माझ्यावर खूप उपकार होतील. म्हणजे ते औषध जीव वाचवायला खूपच महत्वाचे होते. ते औषध होते रेमडेसीवर. निशांत ने त्या ग्राहकाला थोडा धीर दिला आणि सांगितले मी प्रयत्न करतो, तुम्ही सायंकाळी 7 वाजता इथेच भेटा. मिळाले तर तुमच्या पेशन्टचे भले होईल पण पैसे दीड लाख रुपये लागतील. तसा तो ग्राहक म्हणाला तुम्ही पैशाची चिंता करू नका. मला फक्त औषध हवे. प्लिज कसेही करून मला ते औषध आणून द्या. त्या ग्राहकाच्या डोळ्यात आसवं दिसत होती. त्याची ती अवस्था बघून निशान्त ही गहिवरुन गेला. मी करतो तुमचं काम, तुम्ही संध्याकाळी या असे सांगून घरी परत आला.
आता सायंकाळी  निशांत सारिताची वाट बघत होता. ती केव्हा परत येईल आणि तिला घेऊन आपण ते औषध त्या ग्राहकाला देऊ असे त्याला झाले होते. त्याला त्या ग्राहकाच्या पेशन्ट ची चिंता वाटायला लागली होती. त्या पेशन्ट ला देव वाचव रे असा धावा तो देवाजवळ करत होता. त्याला त्या ग्राहकाच्या डोळ्यातले आसवं स्वस्थ बसू देत नव्हते. वारंवार त्या ग्राहकाचा चेहरा त्याच्या समोर येत होता. त्याची विवशता त्याला आठवत होती. तशी सरिता हॉस्पिटल मधून सरळ निशांतच्या रुममध्येच आली. तिने परत एक बॉक्स आपल्या पर्स मधून काढून निशांत च्या हाती दिला आणि निशांत ला म्हणाली, काय झाले मिळालं का कोणी. तर तो म्हणाला आपल्याला सात वाजता हॉस्पिटलच्या पुढे जे मेडिकल शॉप आहे तिथे जायचे आहे. एकाला ते औषध हवे आहे. तो किती ही पैसे द्यायला तयार आहे. मी त्याला दीड लाख रुपये सांगितले. तो सात वाजता तिथे येणार आहे. तशी सरिता बरं झालं काम होईल, मी येतेच आत्ता म्हणत घराकडे वळली. सरिता तयार होऊन आली साडे सहा वाजले होते. सात वाजायला अर्धा तास होता हॉस्पिटल ला पोचायला वीस मिनिटे लागणार होते. सारितांने काल आणलेले औषध पर्स मध्ये टाकले. आणि आईला येतो एक तासात म्हणून दोघेही हॉस्पिटल कडे निघाले. बरोबर 7 वाजता ते त्या मेडिकल शॉप जवळ पोचले तर तो व्यक्ती तिथे अगोदरच येऊन तयार होता. निशान्त ने त्याला जवळपास कोणी नाही असे पाहून जवळ बोलवले आणि औषध त्याच्या हवाली केले. त्या व्यक्तीनेही पैसे निशांतच्या हाती देऊन तो निघून गेला.
निशांत आणि सरिता च्या डोक्यावरचे टेन्शन सम्पले होते. सारितांने पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवले नि दोघेही परत निघाले. येता येताच सारितांने दोन आईस्क्रीम घेतले आणि दोघेही ते खात खात निशान्त च्या रुममध्ये पोचले. आता उद्या साठी ही निशान्त ला काम मिळाले होते. सारितांने पर्स मधून पैसे काढले आणि मोजले. पैसे पूर्ण दीड लाख होते. तिने त्यातले पन्नास हजार निशान्त ला देऊन ती घरी गेली.
संपूर्ण रात्र निशांतची स्वप्न पाहण्यातच गेली. इतक्या पैशात आता काय काय करायचे या विचारातच तो झोपी गेलो. त्याने त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पेशन्ट ची मदत केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.

कोरोना आला आणि सुरळीत चाललेला संसार विस्कळीत झाला. रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणारा निशांत, गावात असलेल्या आपल्या आई वडील आणि बहिणीला पण थोडी थोडी मदत करायचा. आपल्या रोजच्या कामाईतले थोडे थोडे पैसे वाचवून ते महिन्या दोन महिन्यातून घरी पाठवायचा. बापालाही आपल्या मुलाचा अभिमान वाटायचा. सगळं आयुष्य गरिबीत गेले. बापाचे मजुरी करता करता शरीरच उरले नव्हते. उरला होता फक्त हाडांचा सांगाडा. आई नेहमीच आजारी असायची. कधी तिला बरं वाटलं तर ती कामावर जायची पण तिच्याने जास्त कष्ट व्हायचे नाही. आणि म्हणूनच तिला कोणी कामावर बोलवत नसे. बहिन छोटीच होती. पण खूपच गोड आणि सुंदर होती. सगळे तिचे लाड करायचे. तिचीही शाळा सुरू होती. यंदा ती दहावीच्या परीक्षेला बसणार होती.

गेल्या वर्ष भरापासून निशांतला कामच नव्हते. कसेतरी स्वतःचे पोट भरणे चालू होते. घरी पाठवण्याइतके पैसेच त्याच्याकडे वर्षभरात जमले नव्हते. पण गावाला परत जायला त्याचे मन धजत नव्हते. तो इथे नागपूरला राहूनच काम करून आणि नंतर आई बाप बहिनीलापन नागपूरला घेऊन यायचे स्वप्न बघायचा. पण कोरोनाने त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवले होते. सरकारने परत लॉक डाऊन जाहीर केले नि त्याचे काम बंद झाले. झोपडपट्टीतच त्याने एक छोटीशी खोली किरयाने घेतली होती. तो तिथेच राहायचा. घरमालक खूप छान होते. नेहमी ते प्रेमानेच वागायचे. किरायासाठी कधी काही बोलत नसत. पैसे मागे पुढे झाले तरी सांभाळून घ्यायचे. उलट तेच निशांत ला कधी मधी मदत करायचे. कधी जेवायला पण बोलवायचे. त्यांची एकच मुलगी होती सरिता . सरिता दहावी झाली होती. आणि एका प्रायवेट हॉस्पिटल मध्ये कामाला जायची. सरिता खूप सुंदर नव्हती , सर्व साधारण ठीक ठाक होती. पण सरिता खूप बोलकी होती. तिच्याच्याने गप्प बसणे कधी व्हायचेच नाही. तिची सारखी बडबड सुरूच असायची. अशातच निशांत आणि सारिताची हळूहळू जवळीक वाढली आणि सरिता निशांत च्या प्रेमात पडली. सायंकाळी जेवण वगैरे आटोपल्यावर सरिता निशांतच्या रुममध्येच झोप येईस्तोवर गप्पा करत बसायची. तिच्या आई वडिलांचा पण त्याला विरोध नव्हता. दोघातले प्रेम असेच वाढत होते. फुलत होते. कोरोना काळात मात्र सारिताचे काम सुरूच होते. ती हॉस्पिटलमधल्या गमती जमती निशान्त ला संगत राहायची. त्यातच त्यांचा पूर्ण वेळ निघून जायचा.
आता सारिताचे हॉस्पिटल कोरोना हिस्पिटल झाले होते. काम खूप वाढले होते. त्यामुळे ती थकून जायची, थोडा वेळ निशांतशी बोलून झोपायला निघून जायची.
आज सरिता हॉस्पिटल मधून आल्या आल्या निशांतच्या रुम मध्ये आली आणि तिने तिच्या पर्स मधून काही आषधाचे पॅक काढून निशांत ला देत म्हणाली , हे जपून ठेव, मी नंतर लागेल तेव्हा घेऊन जाईल. आणि ती घरात निघून गेली. रात्री जेवण झाल्यावर ती परत आली आणि निशांत ला सांगायला लागली. अरे हे औषध खूप महागाचे आहे. बाजरात मिळत नाही आहे. लोक या औषधासाठी दारोदार भटकत आहेत. कितीही पैसे ते द्यायला तयार आहेत. हे आपण जर एखाद्या गरजू व्यक्तीला विकले तर एक ते दीड लाख रुपये पण मिळतील. हॉस्पिटल मध्ये खूप पेशन्ट आहेत. मधू आमचा वॉर्ड बॉय आहे ना त्याने माहीत नाही कुठून आणलेत ते. त्याने मला ते  घरी निघताना दिलेत. आणि कोणी ग्राहक शोधून विकायचे सांगितले. तो मला त्यातले अर्धे पैसे देणार असे बोलला. तू तर घरीच असतो. त्यापेक्षा हॉस्पिटलच्या एरियात फिरून ग्राहक शोध. त्याला आपण ते विकून टाकू. तुलाही त्या पैशातला एक हिस्सा मिळेल. आपण त्याचे तीन भाग करू. किंमत जेवढी जास्त येईल तेवढा आपला जास्त फायदा होईल. बघ तू उद्या कर हे. असे म्हणून ती. परत गेली. निशांतही काम नसल्यामुळे परेशान झाला होता. त्याला पैसे मिळतील ही आशा दिसायला लागली.

दुसऱ्या दिवशी निशांत सकाळीच उठून हॉस्पिटल कडे गेला. तर मेडिकल च्या दुकानांपुढे ग्राहकांची झुंबड लागली होती. दुकानात त्या औषधांचा स्टॉक सम्पल्यामुळे ग्राहक त्रस्त होऊन वापस जात होते. निशांतला तेव्हा त्या औषधाचे महत्व पटले. त्याने एक दोन लोकांना विचारले खरच हे औषध बाजारात नाही का. त्यावर त्या लोकांनी त्यालाच विचारले. अरे तुझी ओळख आहे का इथे कुठल्या दुकानात, आम्हाला ते औषध पाहिजेच आहे, नाहीतर आमचा पेशन्ट काही वाचत नाही.
निशांत ने एका ग्राहकाला बाजूला बोलवून विचारले, मी माझ्या ओळखीने तुम्हाला औषध आणून दिले तर तुम्ही किती पैसे द्याल. तर तो ग्राहक बोलला तुम्ही सांगाल तितके पैसे मी तुम्हाला देतो. बस मला औषध हवे आहे, त्याशिवाय आमचा पेशन्ट वाचू शकत नाही. खरच तुमच्या मदतीने औषध मिळत असेल तर माझ्यासाठी आणा. मी आत्ता तुम्हाला कॅश पैसे देतो. मी सगळं शहर शोधून आलो, कुठेच ते मिळत नाही आहे. तुम्ही ते मला आणून दिले तर माझ्यावर खूप उपकार होतील. म्हणजे ते औषध जीव वाचवायला खूपच महत्वाचे होते. ते औषध होते रेमडेसीवर. निशांत ने त्या ग्राहकाला थोडा धीर दिला आणि सांगितले मी प्रयत्न करतो, तुम्ही सायंकाळी सात वाजता इथेच भेटा. मिळाले तर तुमच्या पेशन्टचे भले होईल पण पैसे दीड लाख रुपये लागतील. तसा तो ग्राहक म्हणाला तुम्ही पैशाची चिंता करू नका. मला फक्त औषध हवे. प्लिज कसेही करून मला ते औषध आणून द्या. त्या ग्राहकाच्या डोळ्यात आसवं दिसत होती. त्याची ती अवस्था बघून निशान्त ही गहिवरुन गेला. मी करतो तुमचं काम, तुम्ही संध्याकाळी या असे सांगून घरी परत आला.
आता सायंकाळी  निशांत सारिताची वाट बघत होता. ती केव्हा परत येईल आणि तिला घेऊन आपण ते औषध त्या ग्राहकाला नेऊन देऊ असे त्याला झाले होते. त्याला त्या ग्राहकाच्या पेशन्ट ची चिंता वाटायला लागली होती. त्या पेशन्ट ला देवा वाचव रे असा धावा तो देवाजवळ करत होता. त्याला त्या ग्राहकाच्या डोळ्यातले आसवं स्वस्थ बसू देत नव्हते. वारंवार त्या ग्राहकाचा चेहरा त्याच्या समोर येत होता. त्याची विवशता त्याला आठवत होती. तशी सरिता हॉस्पिटल मधून सरळ निशांतच्या रुममध्येच आली. तिने परत एक बॉक्स आपल्या पर्स मधून काढून निशांत च्या हाती दिला आणि निशांत ला म्हणाली, काय झाले मिळालं का कोणी. तर तो म्हणाला आपल्याला सात वाजता हॉस्पिटलच्या पुढे जे मेडिकल शॉप आहे तिथे जायचे आहे. एकाला ते औषध हवे आहे. तो किती ही पैसे द्यायला तयार आहे. मी त्याला दीड लाख रुपये सांगितले. तो सात वाजता तिथे येणार आहे. तशी सरिता बरं झालं काम होईल, मी येतेच आत्ता म्हणत घराकडे वळली. सरिता तयार होऊन आली साडे सहा वाजले होते. सात वाजायला अर्धा तास होता हॉस्पिटल ला पोचायला वीस मिनिटे लागणार होते. सारितांने काल आणलेले औषध पर्स मध्ये टाकले. आणि आईला येतो एक तासात म्हणून दोघेही हॉस्पिटल कडे निघाले. बरोबर सात वाजता ते त्या मेडिकल शॉप जवळ पोचले तर तो व्यक्ती तिथे अगोदरच येऊन तयार होता. निशान्त ने त्याला जवळपास कोणी नाही असे पाहून जवळ बोलवले आणि औषध त्याच्या हवाली केले. त्या व्यक्तीनेही पैसे निशांतच्या हाती देऊन तो निघून गेला.
निशांत आणि सरिता च्या डोक्यावरचे टेन्शन सम्पले होते. सारितांने पैसे आपल्या पर्स मध्ये ठेवले नि दोघेही परत निघाले. येता येताच सारितांने दोन आईस्क्रीम घेतले आणि दोघेही ते खात खात निशान्त च्या रुममध्ये पोचले. आता उद्या साठी ही निशान्त ला काम मिळाले होते. सारितांने पर्स मधून पैसे काढले आणि मोजले. पैसे पूर्ण दीड लाख होते. तिने त्यातले पन्नास हजार निशान्त ला देऊन ती घरी गेली.
संपूर्ण रात्र निशांतची स्वप्न पाहण्यातच गेली. इतक्या पैशात आता काय काय करायचे या विचारातच तो झोपी गेलो. त्याने त्या मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पेशन्ट ची मदत केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत निशांत त्या मेडिकल स्टोअर जवळ पोचला. आजही काल सारखीच परिस्थिती जाणवत होती. त्यात तो आपला ग्राहक शोधू लागला. आजही एक तसाच गरजू व्यक्ती त्याला भेटला. काल सारखेच त्याने त्यालाही सायंकाळी सात ला तिथेच बोलावले. आणि रूमवर परत आला.
आज  सरिता थोडी लवकरच घरी आली होती. आल्या आल्या ती निशान्त च्या रूममध्ये आली आणि बसली. ती खूप टेन्शन मध्ये दिसत होती. शेवटी निशान्त नेच तिला विचारले काय झाले. तर तिने एक पेपर चे कटिंग निशान्त ला वाचायला दिले. त्यात एक हॉस्पिटल ची नर्स पेशन्ट च्या किट मधून औषध काढून बाहेर विकत होती. पोलिसांनी सापळा रचून तिला पकडले होते. आणि सध्या तीची रवानगी तुरुंगात झाली होती. आता तिची नोकरीही गेली आणि बदनामी ही झाली होती. ती बातमी वाचून सरिता खूपच घाबरून गेली होती. तिला काय करावे काहीच सुचत नव्हते. मधूही काहीच बोलत नव्हता. त्याने ते औषध कुठून आणले तेही सांगत नव्हता. तो फक्त इतकंच सांगत होता की जे झालं ते झालं. आपण खूप मोठी चूक केली. आता परत अस काही करायचं नाही. त्यालाही आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता.
सरिता ची स्थिती पाहून निशान्त ही घाबरला होता. त्याला पण काय करावे सुचत नव्हते. त्याला आपले गरीब आई वडील बहीण दिसायला लागली. आपल्यालाही पोलीस पकडून घेऊन गेलेत तर कसे होईल याची भीती वाटायला लागली. आपल्या आई वडिलांचे नाव आपण डुबवल्याचे लोक म्हणतील. सगळे लोक, नातेवाईक आपल्याला दूषण देतील. त्याला खूपच वाईट वाटायला लागले. शेवटी  निशांतच विचार करून  सरीताला म्हणाला आता जे औषध आहे ते तू परत मधु ला देऊन टाक. आपण काल दिलेले औषध तर परत आणू शकत नाही. पण यापुढे आयुष्यात कधीही असे काहीच करायचे नाही. दुसऱ्या दिवशी सरिता मधूला तो औषधांचा बॉक्स परत करून आली. मधूनेही ते जिथून घेतले होते तिथे परत केल्याचे तिला सांगितले. तेव्हा कुठे सारिताच्या डोक्यावरचे टेन्शन थोडे कमी झाले होते. तरी अगोदरच्या दिवशी केलेल्या कृत्याची तिला खंत वाटतच होती. पण त्यातून परत निघायचा काहीच मार्ग नव्हता. नंतर मधुनेच तिला सांगितले की त्याने ते औषध पण स्वतः खरेदी करून परत केले आहे. आणि परत असे कधीच न करण्याची शपथ घेतली आहे.
आता सरिता निशांत आणि मधु तिघांच्याही डोक्यावरचे टेन्शन कमी झाले होते. एका अगम्य आपराधातून आपण मुक्त होत आहोत हे जाणवले.

” मन हे चंचल किती “

मन हे चंचल किती
क्षणात घेई भरारी ।
कधी इथे कधी तिथे
जगाची करते वारी ।

स्वप्नांच्या दुनियेत
येते मारून फेरी ।
थांबेना कुठे जरा
चलबिचलता सारी ।

गुंफते क्षण काही
थांबूनी कुठे जरी ।
फुलपाखरू जणू ते
घेते परत भरारी ।
Sanjay R.

” असह्य असतो एकटेपणा “

असह्य असतो किती एकटेपणा
भाव मनातले मी सांगू कुणा ।

बोलण्यातूनच तर व्यक्त होई
परस्परांशी किती आपलेपणा ।

एकटे एकटे तू करून टाकले
निष्ठुर किती आहेस तू कोरोना ।

दवाखान्यात ना औषध ना बेड
प्राणवायूही कसा तो मिळेना ।

जीवनच झाले आता दुर्धर फार
शव बघते वाट जागाही सापडेना ।
Sanjay R.

” नुसत्या तुझ्या असण्याने “

नुसत्या तुझ्या असण्याने
भिनतो कसा अंगात वारा ।
तुझ्या आठवणीनंही मज
सुखाचा वाटे सारा पसारा ।

सांगू तुझी मज सोबत कशी
जातो निघून दुःखाचा मारा ।
जीवन हे उन्हाळा पावसाळा
सोबत तुझी गार गार वारा ।

तुझ्या सवे दुःखाचे होते सुख
वाटे जशा श्रावणातल्या धारा ।
हसणे तुझे कधी रुसणे तुझे
जसा मोर फुलवतो पिसारा ।

संसाराला  माझ्या जोड तुझी
भासे चंद्राचा शांत शीतल पारा ।
अथांग या सागरात सांगतो
आहेस तूच माझा किनारा ।
Sanjay R.

” खरं काय ते सांगशील का “

काय खरं ते
सांगशील का ।
मनात काय ते
बोलशील का ।
वाट तुझी बघतो
परत तू येशील का ।
तुझ्याविना व्यर्थ सारे
जागा तु भरशील का ।
अंतरातली ओढ आता
स्वप्नपूर्ती करशील का ।
जीवनाच्या वाटेवर
साथ तू देशील का ।
Sanjay R.

” सांगा का हा माणूस असा “

सांगा का हा माणूस असा
नाही त्याला स्वार्थ कुठला ।

दुसऱ्यासाठी झिजतो सदा
ध्येया पासून कधी न तुटला ।

दया माया हेच अस्त्र  त्याचे
मृदू वाणीतुन कधी न सुटला ।

म्हणती सारेच देवदूत आहे
असे नेहमी सत्कार्यात जुंपला ।

सांगा तोही माणूस कुठला
मोह मत्सर स्वार्थाचा पुतळा ।

उठे जीवावर कधी कुणाच्या
माणुसकीचा माणूस लुटेरा ।
Sanjay R.

” वाटे मज कधी “

मनाला पंख माझ्या
उडे दूर आकाशी ।
वाटे मज कधी
करावी मैत्री चंद्राशी ।
चांदण्यात यावे फिरून
गप्पा कराव्या रात्रीशी ।
दिवसा असतो कुठे वेळ
नाते जुळावे सूर्याशी ।
करील तोच सारी कामे
वैर नको प्रकाशाशी ।
बघून क्षितिज कधी वाटे
घ्यावे आभाळ उशाशी ।
वाऱ्यासंगे सुसाट जावे
भेटावे ग्राहताऱ्यांशी ।
Sanjay R.

हॉस्पिटलची वारी

लहानच होतो मी तेव्हा. असेल तिसऱ्या वर्गात. आता जास्त काही आठवत पण नाही. पण तेव्हा कुठल्या तरी आजाराने वेढलं. मला तसा काही त्रास पण नव्हता पण शरीरावर सूज आली होती. खूप जाड झालो असे वाटत होते. त्याच कारणाने पप्पा मला डॉक्टर कडे घेऊन गेलेत. तर डॉक्टरांनी  काही टेस्ट करून घ्यायला सांगितल्या. टेस्ट चे रिपोर्ट्स आलेत नि मग डॉक्टरांनी मला दवाखान्यात ऍडमिट करायला सांगितले.  ते ऐकून माझे पप्पा दवाखान्यातच बराच वेळ तसेच बसून राहिले. त्यांना काय करावे काय बोलावे काहीच सुचत नव्हते. डॉक्टरांना ते लक्षात आले आणि मग डॉक्टरांनी पप्पाना धीर दिला. आणि मग आम्ही काही औषधे घेऊन घरी आलो. पप्पानी आईला पण काही जास्त न सांगता उद्या सकाळी हॉस्पिटल ला जावे लागेल. आणि ट्रीटमेंट साठी तीन चार दिवस हॉस्पिटल मधेच थांबावे लागेल असे सांगितले. तरीही आई समजायचे ते समजली आणि रडायला लागली. मी मात्र तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. आणि मग ती शांत झाली. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सकाळीच तयारी करून हॉस्पिटल ला पोहोचलो. डॉक्टरांनी मला ऍडमिट करून घेतले आणि आणखी काही टेस्ट करून घेतल्या. आणि सलाईन , इंजेक्शन औषध सुरू झाले. मला दवाखान्यात राहणे बिलकुल आवडले नाही. लोक बघायला भेटायला यायचे. मी कॉट वर पडून असायचो. माझ्याच्याने उठणे बसणे पण होत नव्हते. आईच सगळं करायची. गरम पाण्याने अंग पुसून देण्यापासून तर झोप येयीपर्यंत मला थोपटून थोपटून झोपवण्या पर्यंत सारेच ती करायची. मी खूपच अशक्त झालो होतो. दिवस रात्र सलाईन मधूनच इंजेक्शन सुरू असायचे. आणि मी आपला कॉटवर पडून असायचो. किती दिवस हॉस्पिटल मध्ये होतो ते आठवत नाही पण बहुतेक आठ ते दहा दिवस मी हॉस्पिटल मध्ये असेल.
माझ्या सोबतच तिथे तिथे बरेच पेशन्ट ऍडमिट होते. कोणी आरडा ओरडा करायचे, कोणी हसायचे हे तर कोणी निपचित पडून असायचे. सगळ्यांचे नातेवाईक मात्र गंभीर चिंतेत दिसायचे. आमच्या समोर एक पेशन्ट दिवस रात्र विव्हळत असायचा. त्याचे हात पाय नेहमीच कॉटला बांधून असायचे. त्याला कुठला त्रास होता माहीत नाही. कदाचित तो मनोररुग्ण असावा. तो जागा असला की सारखा ओरडायचा. मग डॉक्टर त्याला इंजेक्शन द्यायचे आणि मग तो शांत व्हायचा नि झोपून जायचा. पण उठताच परत तो खूप ओरडायचा. एक दिवस सकाळी सकाळी तो बेडवर दिसला नाही म्हणून लोक शोधायला लागले. तर तो कुठेच दिसत नव्हता. मग बऱ्याच वेळानंतर कुणाला तरी त्याचे प्रेतच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या विहिरीत तरंगताना दिसले. तो आता आपल्या दुःखातून मुक्त झाला होता.
बाजूला एक आजोबा ऍडमिट झाले होते. त्यांना त्यांच्या नातवाने चावले होते. आणि नातवाला रेबिस झाला होता. त्याला कुत्रे चावले होते. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. आता आजोबांना पण रेबिस ची लक्षण दिसायला लागली होती. म्हणून डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट करून घेतले होते.
आठ दहा दिवसांत मी बरा होऊन घरी आलो पण आलो त्याचे दुसरे दिवशीच दिवाळी होती. त्यावर्षी आमची दिवाळी अशीच गेली. कुणाच्याच चेहऱ्यावर आनंद नव्हता.
मी घरी परत आलो एवढाच एक दिलासा सगळ्यांना उमेद देत. होता. काही दिवसांनी मी पूर्ण पणे बरा झालो आणि परत माझी शाळा मस्ती दंगा सुरू झाला. आणि तो प्रसंग मी पूर्णपणे विसरलो. पण आज लिहायला घेतलं आणि सारं सारं आठवलं. असेही गेलेत  हॉस्पिटल मधील माझे ते दिवस.
संजय रोंघे
नागपूर
मोबाईल : 8380074730

” सहजच सारे घडले “

कर्ता करविता तूच
नाही कुठेच अडले ।
तुझ्याच कृपेने बघ
सहजच सारे घडले ।
रत्ना सोबत मोती
सुंदर किती ते जडले ।
खुलले रूप लावण्य
सुवर्णात सारे मढले ।
साठवले रूप डोळ्यात
तुजसाठी ते रडले ।
दर्शनाची आस आता
स्वप्न आजही पडले ।
Sanjay R.

” विसरून भान सारे “

विसरून भान सारे
धावा तुझाच मी करतो ।
आठवणीत तुझ्याच माझा
दिवस हा असा सरतो ।
ओढ दर्शनाची किती
विचार मनीचे हरतो ।
दर्शन दे बा विठ्ठला आता
प्रार्थना तुझ मी करतो ।
Sanjay R.