” मन आतुर “

वाटे केसात तुझ्या
मी मलाच गुंफून घ्यावे ।

भाव डोळ्यातले तुझ्या
अंतरात उतरवून घ्यावे ।

गुलाबी गालांना तुझ्या
गालांनीच हळू स्पर्शावे ।

ओठांवर तुझ्या
ओठांनीच चुंबन द्यावे ।

मन आतुर किती माझे
सांग तूज, कसे मी छळावे ।
Sanjay R.

” मराठी भाषा दिन “

लिहितो वाचतो
मी कुणासाठी
माय मराठी
मी माझ्यासाठी ।
अस्तित्व माझे
कुणासाठी
माय मराठी
तुझ्यासाठी ।
अभिमान मज
मराठीचा
मराठी माझी
माझ्यासाठी ।
Sanjay R.

” लय झाली अमिरी “

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।

न्हाई बसाले पाट
न्हाई झोपाले खाट ।
जिकडं पहान तिकडं
ठिगळायचा थाट ।

बिमार बुढी कोपऱ्यात
न्हाई औषीध पानी ।
जिरून गेली जागीच
कायजी कोनाले कानीं ।

नागडे पुगडे लेकरं खेयते
भुके पाई रडते भारी ।
कामासाठी धनी कसा
फिरते दारोदारी ।

शिक्षन पानी लेकरायचं
खिशात न्हाई खडकू ।
लक्षुमी त्याची रडते
मनते गुमान ऱ्हावा
नका अशे भडकू ।

पाच पन्नास कमाई त्याची
काय काय थो करन ।
रातच्याले साथरीवर
पायते थो मरन ।

सरनाले बी त्याच्या
लाकडं कसे भेटन ।
पाला पाचोया जमवून
सांगा देह कसा पेटंन ।

मुन मनतो गडया …..

लय झाली अमिरी
थोडी गरिबी बी पहा ।
झोपडीत गड्याच्या
जाऊन थोडं राहा ।
Sanjay Ronghe
Nagpur

” झटका पाकिस्तानले “

पाकिस्तान ले बापू
आज दावला इंगा ।
सांगून ठिवतो
घेऊ नका पंगा ।
कश्मीर मंदी
लय झाला दंगा ।
घरात घुसून
कसा केला नंगा ।
झोंबली का न्हाई
लवकर सांगा ।
Sanjay R.

” वेडा रे वेडा “

करायचं काव्य
वाचायचा धडा ।
काढायची रांगोळी
त्यावर शेणाचा सडा ।
जायचं असतं हळू
धावतो तुफानी घोडा ।
जुळलेलं सारच
हातोडीनं तोडा ।
समुद्र भरायला
पाणी थेंब थेंब सोडा ।
अंथरुणात झोपतांना
घालायचा जोडा ।
सगळंच उलटं
कशाला चिडा ।
म्हातारपणीच नेमकं
पाप पुण्य फेडा ।
जीवनच हे
आयुष्याचा राडा ।
जोवर चालतो
दम लावून ओढा ।
पसरा हात
मिळतो पेढा ।
नसेल जगायचं तर
तिरडीवर पडा ।
देऊ लावून आग
संपेल तिढा ।
वेडा रे वेडा
कुणीही छेडा ।
Sanjay R.

” प्रवास “

जगायला मी आलो
आहे जगण्याची आस ।

प्रदूषित ही हवा
संथ होताहेत श्वास ।

स्वप्न किती अंतरात
आहे पूर्णत्वाचा ध्यास ।

उघडे डोळे परी अंधार
पावलो पावली विनाश ।

खडतर सगळेच रस्ते
कठीण किती हा प्रवास ।
Sanjay R.

उपवास

करायचा कसा उपवास
भरायचा एक एक श्वास ।

अन्नविना मग करायचा
पूर्ण दिवसाचा प्रवास ।

करून परमेश्वराचे चिंतन
अंतरातल्या स्वत्वाचा ध्यास ।

आचार विचारांची शुद्धी
एक आत्मविवेचनाचा प्रयास ।
Sanjay R.

” उरली फक्त राख आता “

वाद विवाद हे सरले आता
दाहशतीची सुरुवात आता ।

रक्ताची या किंमत काय
नको कुणाला साथ आता ।

छिन्न विच्छिन्न भग्न झाली
माणुसकीची जात आता ।

आचार विचार पेटून उठले
धडधड जळते आग आता ।

धर्म संस्कृती जळून गेली
उरली फक्त राख आता ।

माणूस माणूस उरला कुठेहो
रक्तात भिजले हात आता ।

चला निघू या सारेच आपण
गीत अंताचे गात आता ।
Sanjay R.

” मिटती पलंके “

याद तुम्हारी जब आती
इतना मुझे क्यू सताती ।

दिलमे कैसे लगी है आग
कितनी है भागम भाग ।

निंदभी उड गई कही दूर
मिलने को दिल है आतुर ।

पल भर जब, मिटती पलंके
ख्वाबमे भी तस्वीर झलके ।

पास आवो, हो तुम कहां
तुमही तो हो, मेरा जहाँ ।
Sanjay R.

” मन झाले खुळे “

उमलले फुल झाडावर
बघते किलकिले करून डोळे ।
लावले वेड मजला
मन माझे झाले खुळे ।

क्षणिक हसले थोडे रुसले
दरवळला सुगंध दूर ।
भिनला गंध श्वासात
मन बेधुंद झाले अधीर ।

रंग फुलाचा गुलाबी
मनमोहक सांगू किती ।
पडलो प्रेमात तयाच्या
वाटे अजूनही ओंजळ रीती ।

पसरले हात दोन्ही
वेचण्या मधूकणं फुलातले ।
भृंगा देऊन कौल गेला
कळले त्यासी अंतरातले ।
Sanjay R.

” देखु मैं जहा “

हम सदा है आपके
रहेंगे उम्रभर आपके ।
वक्त तो रुकता कहा
जिते है यादोमे आपके ।

देखू मैं जहा
हो तुम वहा ।
रखं लु दिलमे
लगे मेरा सारा जहा ।
Sanjay R.

” गाव महा वर्धा “

गाव माह्या वर्धा
हाये वयखीचा अर्धा ।
इचरतेत एकमेकाले
काय रे मरदा ।
उलीसाच हाये
खात का जरदा ।
इचार गांधीजींचे
दोस्तीत न्हाई स्पर्धा ।
पितेत सारेच
लावून परदा ।
बंदी हाये ना
पर घेतीन चारदा ।
बेस्टच हाये
गाव माह्य वर्धा ।
Sanjay R.

” मनात वादळ “

सांगू कसे मी गं तुला
अंतरीच्या माझ्या फुला ।

हलकेच तुझ्या उडतात बटा
जिवाच्या माझ्या होतात छटा ।

ओठ मज का तुझे पुकारती
पेटतात बघ हृदयात वाती ।

नेत्रात सांगू भाव कुठले
मनात माझ्या वादळ उठले ।

सळसळ यावा वादळ वारा
सोबत प्रेमाच्या चिंब धारा ।

वाटे तू अशीच सदा हसावी
आठवण मज तुझीच व्हावी ।

राधा राधा चाले मनात धावा
कृष्ण फुंकतो आपुला पावा ।

श्वासांची बघ गती वाढली
उचकी मज का तूच धाडली ।

ये ना सखे तू जवळ माझ्या
घेतो विसावा अंतरात तुझ्या ।
Sanjay R.

” धडधडते छाती “

विश तुझी ही
कशी छान किती ।

करू मी मिस
तुला सांग किती ।

घागर अजूनही
आहे ग रीती ।

डोळयांत बघ
दिसेल माझी प्रीती ।

नाही ठाव मज
काय जगाची रीती ।

साचली डोळयांत
बघ आसवं किती ।

गळ्यात हुंदका,
आणी धडधडते छाती ।
Sanjay R.

” चांद चांदनी “

दिल जानता है
दिल की बात ।
जिती है चांदनी
चांद के साथ ।

सूरज के ढलतेही
होती है रात ।
मिलते रोज दोनो
फिर भी खतम कहा
होती है बात ।

जनम जनम का रिश्ता
हर पल का ये साथ ।
चल पडे दूर कही दोनो
लिये हातोमे हात ।
Sanjay R.

” चाकलेट दे “

कळलंच नाही मला
आज चाकलेट डे कशाला ।
कॅडबरी द्यायला
की डेरी मिल्क घ्यायला ।
आमच्या लहानपणी
मुहूर्तच नव्हता काही खायला ।
तुम्हीही घ्या मीही घेतो
चॉकलेट चित्रात बघायला ।
Sanjay R.

” प्रपोज “

कसं करायचं असतं प्रपोज
असाच तर असतो दिवस रोज ।
वेळ आणी तारीखेची
चालते नुसती मोजमोज ।
निघून जातं आयुष्य
राहून जातो प्रपोज ।
परत येतो दिवस तसाच
वेगळं नसतंच रोज रोज ।
जाऊ द्या विसरा सारं
करतो आज स्वतःलाच
प्रपोज प्रपोज प्रपोज ।
Sanjay R.

🌷🌹🌷