जाग लय बेकार

भाऊ दूर नको जाऊ
जग लय बेकार ।
डोळे उघडून पाय
खाऊन पिऊन देते डकार ।
वरून तुले म्हणन
लयच होता तू गा टिकार ।
पायजो बापू अजून कोनी
यक अजून शिकार ।
आमचा त ह्या धंदाच हाये
मातर तू करू नोको नकार ।

Sanjay R.

सागराच्या लाटा

का काहीच कळेना
दूर जातात लाटा ।
येऊनिया काठावर
परत फिरतात वाटा ।

वाटतो जणू अबोला
काठा लाटांचा कसा ।
सागराने कशाला हा
घेतला असा वसा ।

नको काही काठाला
हवा थोडासा संवाद ।
अथांग किती सागर
का कशाचा हा वाद ।

स्वार्थ नाही कसला
उरते काय गाठीला ।
सुटेल साराच गुंता
भरती नि ओहटीला ।
Sanjay R.

मार शक्तीचा

निर्णयच तो असतो
होतो कधी चुकीचा ।
भोगतो मग मात्र
त्रास मात्र दुनियेचा ।
धडपडत असतो सारखा
मार्ग शोधतो मुक्तीचा ।
भोग लागतात भोगावे
फायदा नाही युक्तीचा ।
हळू हळू होतो सराव
मार्ग विसरतो भक्तीचा ।
कधीतरी येते याद
आठवतो मार शक्तीचा ।
Sanjay R.

विचार नको कशाचा

असू दे निर्णय चुकीचा
आता विचार नको कशाचा ।
येऊ दे संकट कितीही
मार्ग तर निघेलच यशाचा ।
हसायचे मस्त जगायचे
भरवसाच कुठे आयुष्याचा ।
कुणासाठी कोण थांबतो
मन्त्र एकच हा जगण्याचा ।
Sanjay R.

रात्र

कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.

रात्र

कशावर मी सांगू हक्क
काहीच इथे उरले नाही ।
अंधार दिसतो काळा
सूर्याचा तर पत्ताच नाही ।
चांदण्याही लुप्त झाल्या
चंद्र तर उगवतच नाही ।
मिणमिणते ते काजवे
का ते रात्री जागत नाही ।
Sanjay R.

चालेना आता माथा

सरले दिवस आता
करू काय जाता जाता ।
बसु द्या ना थोडे तरी
सांगतो मी माझी कथा ।
गाठीला आहेत बांधलेले
त्यात साऱ्याच व्यथा ।
प्रश्न आहे पुढ्यात
चालेना आता माथा ।
Sanjay R.

आनंदाची प्रभात

अंतरातल्या विचारांना
शब्दांची हवी साथ ।
अवतरते मग कविता
घेऊन शब्दांचा हात ।
भावार्थ त्या रचनेचा
दिसे काय या मनात ।
आनंदाची अनुभुती
ती आनंदाची प्रभात ।
Sanjay R.

झाली कशी दशा

छंद नव्हे हा असा
ही तर आहे नशा ।
बघा जरा याची
झाली कशी दशा ।
सदा हाती मोबाईल
जणू झाला तो पिशा ।
कळेना काही कसे
विसरला हो दिशा ।
काळ वेळ नाही काही
चालतात उठा बशा ।
Sanjay R.

कसा हा छंद

कसा हा जगण्याचा छंद
आयुष्यभर दरवळतो गंध ।
कधी हसतो मी दिलखुलास
आणि स्वतःतच होतो धुंद ।
वाट दुःखाची कधी येते
मग श्वास ही होतात मंद ।
सुख दुःख तर येती जाती
वेचतो त्यातून मी आनंद ।
Sanjay R.

लढेल मी हक्कासाठी

लढेल मी हक्कासाठी
नका समजू मज अबला ।
पाळते माया ममता धैर्य
आहेच मी ही स्वयं सबला ।
आहे मी सीता मीच माता
आहे दुर्गेचे अभय मजला ।
नको पाहुस अंत रे माझा
कठोर किती कळेल तुजला ।
Sanjay R.

गुलाब मोगरा

फुलांचा रंग आणि काट्यांचा संग
गुलाबालाच जमतो ।
मोगरा बिचारा देऊन सुगन्ध
स्वतःच दमतो ।
बाकी फुलांची व्यथाच वेगळी
कोण कुणात कसा रमतो ।
गळ्यातला होऊनही हार तुरा
तोही शेवटी जागीच सरतो ।
Sanjay R.

कसा रे तू माणसा

कसा रे तू माणसा
करशील किती लोभ ।
नको वागू असा
दिसेल तुलाही क्षोभ ।
जोर ज्याच्या हाती
दाखवितो तो रोब ।
साधा सरळ कुठे चाले
म्हणतात त्याला डूब ।
Sanjay R.

फुल जिथे तिथे काटे

फुल जिथे तिथे काटे
सुखाला का दुःख वाटे ।
वाट प्रेमाची ही कठीण
वाटे सारे जग हे खोटे ।
होई अंतराला यातना
आसवे डोळ्यात दाटे ।
आशा तरीही सुटेना
हवे क्षण आनंदाचे छोटे ।

Sanjay R.

मुखवटा मायानगरीचा

कशी ही मायानगरी
सारे जीवन किती वेगळे ।
चेहऱ्यावर लावून मुखवटा
करतात अभिनय सगळे ।

श्रीमंतीचा चढवून साज
कोणी होतो इथला हिरो ।
दारिद्र्याची ओढून चादर
दाखवितो किती तो झिरो ।

प्रेमाचा पडतो कधी पाऊस
कधी द्वेषाची जळते आग ।
कधी आसवे लपवून हसतात
सारेच इथले आहेत महाभाग ।
Sanjay R.

घेऊ नको तू विसावा

येरे येरे तू पावसा
केलास किती उशीर ।
वाट होतो पाहात
केलेस किती अधीर ।

पड आता आरामात
घेऊ नको तू विसावा ।
सगळे लागलेत कामाला
सोडू नकोस ओलावा ।

खूप तापला रे सूर्य यंदा
कर म्हणा थोडा आराम ।
बोलव ढगांना मदतीला
घेऊ नकोस तू विराम ।

शेत होऊ दे हिरवे छान
डोलतील सारी पिकं ।
बळीराजा होईल खुश
संपेल घरातलं धुकं ।
Sanjay R.

वेडा गणपा

गणपा आमचा लय भारी
सिनेमा साठी करायचा चोरी
पहिला दिवस पहिला शो
शाळेला मग बुट्टी मारी ।
पिक्चरचा नेहमी ध्यास त्याला
हिरो बनून मारायचा फेरी ।
स्टाईल शिवाय जमायचे नाही
म्हणायचा नेहमी ओ तेरी ।
देखना एकदिन तुम भी सारे
आयेगी एक दिन पिक्चर मेरी ।
बघतोय आता सारेच आम्ही
गणपा फिरतो दारो दारी ।
Sanjay R.

रात्र परतून आली

सरला दिवस आता
रात्र परतून आली ।

चमचम करते चांदणी
राणी चंद्राची झाली ।

अंधार काळा त्यात मी
शोधतो सूर्याची सावली ।

चन्द्र बघतो दुरून सारे
हास्य चांदणीच्या गाली ।
Sanjay R.

बंध प्रेमाचा अतूट

बदल विचार थोडे
करू नको राजकारण ।
असह्य झाला अबोला
का केलास तू धारण ।
कान झालेत अधीर
सांगुन टाक तू कारण ।
आठवतात शब्द तुझे
ठेवलेत तेच मी तारण ।
बांध प्रेमाचा अतूट
करू नकोस तू हरण ।
Sanjay R.

राजकारण

साधा सरळ मी असा
कुठे जमते राजकारण ।

वेडे वाकडे मार्ग इथले
होतो मनस्ताप विनाकारण ।

हाजी हाजी इथे करायची
दहा वेळा पकडा चरण ।

साध्या सुध्यास कोण जुमनतो
त्याचे फक्त होते मरण ।
Sanjay R.