प्रारंभ तू आरंभ तू
धारेचा हा समारंभ तू
सांग कोण मी कोण तू
ज्ञान तू विज्ञान तू
केलेस मज सज्ञान तू
सांग कोण मी कोण तू
मान तू शान तू
केलेस मज महान तू
सांग कोण मी कोण तू
आण तू प्रमाण तू
उंच उंच ते निशाण तू
सांग कोण मी कोण तू
संत तू महंत तू
तपस्येचा स्तंभ तू
सांग कोण मी कोण तू
शांत तू प्रशांत तू
आकांतातला एकांत तू
सांग कोण मी कोण तू
प्रकाश तू अंधार तू
परतीचा एक निर्धार तू
सांग कोण मी कोण तू
गंध तू सुगंध तू
सुखसागरात बेधुंद तू
सांग कोण मी कोण तू
आनंद तू स्वछंद तू
दुःखाचा निर्बंध तू
सांग कोण मी कोण तू
कणात तू गगनात तू
डोळे मिटता साक्षात तू
सांग कोण मी कोण तू
आरूप तू प्रारूप तू
अंतरातले स्वरूप तू
सांग कोण मी कोण तू
एक तू अनंत तू
दिलास मज का अंत तू
सांग कोण मी कोण तू
Sanjay R.
