” बुरखा घुंघट “

बुरखा घुंगट
हवा कशाला ।
उन्हापासून
सौरक्षणाला ।

खवखवणार्या
नजरा किती ।
त्यांच्यापासून
कशी ही भीती ।

पूर्वा पारची
ही पद्धत कशी ।
स्त्री ला झाकून
ठेवायचे जशी ।
Sanjay R.

” कथा भावनांची “

करू कविता मी कशाची
हास्याची की आसवांची ।

शब्द जोडुनी होते कविता
मनातल्या विचारांची ।

मन होते व्यथित जेव्हा
होते बरसात अश्रूंची ।

सरसावतात पुसण्या हात
व्यथा काय ओल्या गालांची ।

आनंदाची किमयाच न्यारी
गाली लकीर हास्याची ।

मन सांगे मनास कसे ते
कथा सारी या भावनांची ।
Sanjay R.

” नदीला पूर “

घेऊन मिठीत तुला
चुंबन ओठांचे घेईल ।

ये ना सखे जवळ
सर्वस्व तुलाच देईल ।

जाऊ नकोस दूर
तू तर माझी हूर ।

बघ डोळ्यात जरा
आहे एकच सूर ।

बघ भेटीसाठी
मन किती आतुर ।

चंद्रापासून सूर्य
आहेच कितीसा दूर ।

पडू दे पाऊस कितीही
येऊ दे नदीला पूर ।

नभात असते पाणी
पाण्यासाठी नदी आतुर ।
Sanjay R.

” चाफा होईल बेधुंद “

फुलला आज गुलाब
पाकळ्यांना नाही गंध ।

मोगराही रुसलेला का
नाही पसरला सुगंध ।

गारवा थोडा हवेत
वाटे मनास धुंद ।

सोड रुसवा सखे तू
नेहमीचाच तुझा हा छंद ।

कोमेजला किती बघ
फुललेला निशिगंध ।

हसून बघ ना जरा
चाफा होईल बेधुंद ।
Sanjay R.

” लागली संचारबंदी “

लागली आज संचारबंदी
कमी झाली मनातली रुंदी ।

नाही ही कुठली धुंदी
अंतरात अंतरालाच बंदी ।

वाटे जणू हृदयावर बंदी
ओठांवर शब्दांची मंदी ।

काढून सोने लावली चांदी
हलते मान जसा हा नंदी ।
Sanjay R.

” साम्राज्य धुक्याचे “

सूर्य सकाळी आज
उगवलाच नाही ।
साम्राज्य धुक्याचे
झाले दिशा दाही ।

आले भरून किती
आभाळ काळे काळे ।
प्रकाश झाला मंद
दिसेना आकाश निळे ।

धारा पावसाच्या
गेल्या येऊन चार ।
भिजला गुलाब चिंब
पाकळ्यांवर प्रहार ।
Sanjay R.

” काळोख दाटून आला “

झाले सारेच शांत
मन तरीही अशांत ।

शोधू कुठे तुला मी
क्षितिजास नाही अंत ।

लोपला सूर्य त्या कडेला
झाला प्रकाश निवांत ।

काळोख दाटून आला
नाही कुणास खंत ।

आकाश भरून आले
चांदण्या तिथे अनंत ।

हळूच मग चंद्र आला
होऊन एक संत ।
Sanjay R.

” थांबला आज वारा “

थांबला आज वारा
स्तब्ध आसमंत सारा ।

बघ डोळ्यात तुझ्या
का बरसताहेत धारा ।

वाहते ओसंडून नदी
नाही तिला किनारा ।

काळोख दाटला आकाशी
त्यात निस्तेज एक तारा ।

रातराणी उदास झाली
करू कसा मी इशारा ।
Sanjay R.

” कुठे अग्नी कुठे चाक “

शोधले चाक मानवा
वेग प्रवासाला आला ।
शेकड्याने दूर अंतर
प्रवास क्षणाचा झाला ।

जळत होतो मनात किती
प्रवास आयुष्याचा झाला ।
अंत आला जवळ जेव्हा
बघा अग्नीचा जाळ झाला ।

कुठे अग्नी कुठे चाक
मनात कुठे उरला धाक ।
चकावरती प्रवास होतो
विझता अग्नी उरते राख ।
Sanjay R.

” न्हाई दिसत कावळा “

श्राद्धाचा मैना ह्या
न्हाई दिसत कावळा ।
मायबापाले तळपवलं
तुयासारखा तूच बावळा ।

कराची होती सेवा जवा
निस्ता खाल्ला तुन मेवा ।
मरून गेले तुया पायी
करशींन किती आता देवा ।

ल्हान जवा तू होता
केली किती तुयी फिकीर ।
तुया वानी गा औलाद झाली
चुकली किती हाताची लकीर ।

माय बाप देवावानी
थोडीशी तं कदर करा ।
मंग पायजा येईन कावळा
विच्छा त्यायची करन पुरा ।
Sanjay R.

” तू राधा “

स्तब्ध होतो मी
का बघताच तुला ।
कसे सांगू मी ग
डोळे खुणावतात मला ।

बोलताना ओठ तुझे
सांगून सारच जातात ।
कहाणी तुझी माझी
कानामध्ये गातात ।

मन घेतं वेध तुझा
भाव खोल अंतरात ।
सांगू कसे तुला मी
तूच माझ्या श्वासात ।

विसरतो सारेच मी
असतेस तू पुढ्यात ।
असताना तू समोर
बोलू कसा कोड्यात ।

मी कृष्ण तू राधा
वाजे बासरी गोकुळात ।
आठवांची आठवण
वसते माझ्या मनात ।
Sanjay R.

” माणुसकी “

भाव भक्ती माझ्या
जीवनाचा हिस्सा ।
सांगू कसा सांग
आयुष्याचा किस्सा ।

धर्म आणि कर्म
बांधलेला रस्सा ।
जीवन सरते तेव्हा
उरतो कुठे गुस्सा ।

माणूस हा असा
नाही, दिसतो जसा ।
स्वार्थ आणी लोभ
यात गुरफटला कसा ।

मरतो कोणी इथे
जगता जगता असा ।
मरून उरतो कोणी
घ्यावा तोच वसा ।

वाटे नकोच जगणे
का हे असे मरणे ।
हो माणूस थोडा
हवे माणसात बसणे ।
Sanjay R.

” नजाने दिलको क्या हुवा “

न जाने दिलको
क्या हुवा ।
देखे बिनाही उनसे
प्यार हुवा ।
झोका हवाका आया
और इकरार हुवा ।
दिलमे जागी उमंग
नजाने क्या हुवा ।
रुकी कुछ सासे,
तेज हुई धडकने
और प्यार हुवा ।
नही देखा उनको
और प्यार हुवा ।
Sanjay R.

” याद “

कैसे रखु मै तुमको
करीब दिलके ।
ज्यो याद बार बार
आती हो ।।
अबतो तुम्हे दिलही
बना डाला ।
और याद दिलको
आती हो ।।

लागता था एक सपना
खोने का डर ।
और भुलनेकीं जो
आदत थी मेरी ।।
अब सपना ही मैने
सजया दिलमे ।
न तुटता, न भुलता हु
और तुम हो मेरी ।।
Sanjay R.

” ध्यास “

मनात एक ध्यास
डोळ्यात आभास ।
आठवण आली की
थांबतो मधेच श्वास ।
वेध घेतात मग कान
असतो एक प्रयास ।
यावा हळूच वारा आणी
पूर्ववत व्हावा श्वास ।
Sanjay R.

” निघालं आज ऊन “

निघालं आज ऊन
झालं का सगळं धून ।
आला सूर्य डोक्यावर
दिसते आभाळ अजून ।
मधेच लपतो सूर्य
झाला थंड थोडा लाजून ।
जा बाबा पावसा थोडा
पडलो आजारी भिजून ।
जगू दे आता तरी
सांग राहायचं किती निजून ।
Sanjay R.